
वाराप्रमाणे २५ दूकाने रोज उघडण्याची द्यावी परवानगी
नागपूर,ता.३ मे: महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूर शहराच्या संदर्भात लॉक डाऊन फेज-३ करिता आज रविवार दि.३ मे रोजी जो निर्णय जाहीर केला त्या निर्णयाचा फेरविचार करुन मंुढेंनी नागपूरातील सतरंजीपुरा,मोमिनपुरा इ. रेड झोन भाग सोडून उर्वरित नागपूर शहर हे लॉक डाऊन मुक्त करावे,अशी मागणी भारतीय जनता पक्ष्ाचे शहराध्यक्ष् प्रवीण दटके यांनी व्हीडीयोच्या माध्यमातून आज केली.
नागपूरातील लॉक डाऊन फेज-३ करीता मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव भूषणकुमार गदराणी यांनी जे निर्णय आज जाहीर केले त्यावरुन मध्यमवर्गींयाना अपेक्ष्ा होती लॉक डाऊनमधून त्यांना काही सवलत मिळेल.मात्र त्यांच्या निर्णयामुळे मध्यम वर्गीयांची घोर निराशा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाच्या घोषणेनुसार आयुक्त मुंढे यांनी सरसकट पुणे,मंुबईप्रमाणे नागपूरात देखील १८ मे पर्यंत लॉक डाऊन वाढवल्याची आज घोषणा केली आहे.
आधीच गेल्या ४२ दिवसांपासून मध्यमवर्गीय हा आपल्या घरात लॉक डाऊनमध्ये आहे. शहरातील लहान मोठे उद्योग व्यवसायी यांची प्रचंड कोंडी झाली आहे. परिणामी मुंढे यांना विनंती आहे की त्यांनी या परिस्थितीचा सारासार विचार करुन टोकाची भूमिका न घेता,मध्यम मार्ग काढावा,अशी मागणी दटके यांनी केली.
शहरातील रेड झोनमध्ये जिथे संचार बंदी करण्यात आली आहे तिथे आणखी कडक शिस्त राबवून,कॅमरे,ड्रोन इ.चा वापर करुन,सीआरपीएफ,एसआरपीएफ पोलीसांची मदत घेऊन तिथला कोणताही नागरिक बाहेर पडू नये,याची त्यांनी आमच्यासारख्या जनप्रतिनिधींची मदत घेऊन खबरदारी घ्यावी मात्र उर्वरित शहरासाठी,मध्यम वर्गीयांची स्थिती जी खराब होत चालली आहे,त्यांच्या उदरनिर्वाह किवा अर्थाजणाकरीता आवश्यक उपाय योजावे,असे ते म्हणाले.
शहरातील कोणताही, एका वेळी २५ टक्के भाग सुरु ठेवावा,किंवा एखाद्या भागात केवळ २५ दूकानेच सुरु ठेवण्यात यावी,एखाद्या रस्त्यावर १०० दूकाने असतील तर सोमवारी २५,मंगळवरी २५ अशी प्रत्येक दिवशी फक्त २५ दूकाने वाराप्रमाणे सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी. असा कोणतातरी मध्यम मार्ग काढून त्यांनी उर्वरित नागपूर हळूहळू लॉक डाऊन मुक्त करावे. जेणे करुन गरीब,कष्टकरी यांच्यासोबतच मध्यम वर्गीयांनाही दिलासा मिळेल.
भाजप दारुची दूकाने किवा बार सुरु करण्याची मागणी करीत नसून मुंढे यांनी कुठला तरी मध्यम मार्ग काढावा,यासाठी लोकप्रतिनिधींची मदत घ्यावी. प्रशासन,स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. मध्यम वर्गीय, निम्न मध्यम वर्गीय,निम्न वर्ग सर्वांनाच कोव्हीड-१९ ची झळ पोहोचली आहे. गेल्या ४२ दिवसात अर्थाजणाचे सगळे स्त्रोत संपूर्णत: ठप्प पडले आहे.परिणामी कोव्हिड-१९च्या पार्श्वभूमिवर ज्या आयुक्तांना राज्य शासनाने सर्वाधिकार दिले आहे त्यांनी नागपूरच्या संदर्भात निर्णय घेताना,नागपूरकरांच्या भल्यासाठी निर्णय घ्यावा आणि मध्यम मार्ग काढावा,अशी मागणी दटके यांनी केली.
हीच मागणी पालकमंत्री नितीन राऊत यांना देखील करीत असून त्यांनी यात मध्यस्थीची भूमिका स्वीकारुन यातून मार्ग काढावा,असे दटके म्हणाले. एकीकडे कोरोनाचा शहरात कुठेही प्रादुर्भाव पसरु नये दूसरीकडे सामान्य नागपूरकरांच्याही जगण्याचा मार्ग मोकळा व्हावा,असा मार्ग त्यांनी काढावा. शासनाच्या संपूर्ण नियमात राहून,संपूर्ण नियमांचे पालन करुन ,मास्क,सेनिटायझर,सुरक्ष्ति अंतर इ.चा वापर करुन दूकानदार,मध्यम वर्गीय,कारोबारी, लहान मोठे व्यवसायी यांच्या जगण्याचा मार्ग प्रशस्त करावा, अशी विनंती दटके यांनी पालकमंत्री यांना देखील केली.




आमचे चॅनल subscribe करा
