

नागपूर,२ में: २९ एप्रिल रोजी आमदार कृष्णा खोपडे यांनी मला राज्याच्या बाहेर जाणाऱ्या लोकांचे दोन पत्र घेऊन उपजिल्हाधिकारी खजांची यांचेकडे पाठविले होते. खजांची यांनी शेरा मारून परवानगीसाठी विभागात पत्र पाठविले. दुपारी ३.२० वा. प्रशांत वासनिक यांना कॅबिनमध्ये भेटले असता परवानगीसाठी किती वाजता येऊ?, असे विचारले. त्यावेळी प्रशांत वासनिक जोराने ओरडला. ‘मले हेच काम आहे काय?मले वेळ नाही.’ अशा शब्दाचा उपयोग करून बोलण्यास सुरुवात केली. त्यावेळी सर्व लोक ते ऐकत होते. त्यावेळी त्यांचा मॅडम अनुपस्थित होत्या.
झालेल्या परवानगीसाठी मी त्या ठिकाणी गेलो असता जे काही आरोप माझ्यावर लावण्यात आले ते एक हजार पट खोटे असून माझ्या विरोधात करण्यात आलेल्या पोलीस तक्रारीमध्ये दूरदूरपर्यंत माझा संबंध नाही. वासनिक यांचेवर दया दाखवून माझ्यासारख्या व्यापाऱ्याला फसविण्याचा हा प्रयत्न आहे. मी व्यापारी असून आजपर्यंत कोणत्याही पोलीस स्टेशन मध्ये माझा गुन्हेगारी रेकॉर्ड नाही.शनिवारे यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले.
परवानगी विभाग हा अनेकाला करतो टार्चर-
या महामारीच्या काळात बाहेरच्या राज्यात अडकलेले नागपूरचे नागरिक अडचणीत असल्यामुळे अनेक लोक जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज घेऊन जातात. परंतु संबंधित विभागात अनेकांना टार्चर करण्यात येत असल्याचा आरोप शनिवारे यांनी केला. त्या विभागात प्रेमाने बोलण्याचा कुणीच प्रयत्न करीत नाही. आगाऊची भाषा ऐकून आधीच नागरिक तणावात आहे ,उलट संकटाच्या या काळात वागणूक चांगल्या प्रकारची पाहिजे, परंतु तसे होत नाही. दुखी माणसाला पुन्हा दुखी करण्याचे काम या ठिकाणी कर्मचारी करीत आहे. तरी जिल्हाधिकाऱ्यांचे मौन समजण्या पलीकडे असल्याचे ते म्हणाले.
दि.२९ एप्रिल रोजी घडलेल्या संपूर्ण विषयासंदर्भात एकूण एक सत्य माहिती मी लिखित स्वरुपात जिल्हाधिकारी यांचेकडे सादर केली असून त्यात संपूर्ण माहिती कशाप्रकारे कर्मचाऱ्यानी दिलेली वागणूक, अपशब्द व घाणेरडे बोलणे. ‘माझे नाव वासनिक आहे, तुम्हाला जे बनते ते करा माझे कुणी काहीच बिघडवू शकत नाही.’ अशा प्रकारचे उच्चार करून या संपूर्ण विषयाची तपासणी करून जिल्हाधिकारी यांनी चौकशीचे आदेश द्यायला पाहिजे होते, जेणेकरून सत्य काय ते बाहेर आले असते.
परंतु दबावाच्या खाली येऊन युनियनच्या माध्यमातून जिल्हाधिकारी शरणागत झाले व खोटी रिपोर्ट सदर पोलीस स्टेशन येथे दाखल केली. झालेल्या विषयात न्याय शंभर टक्के मिळेल. परंतु जिल्हाधिकारी यांनी आपले कर्मचारी जनतेसोबत वागणूक कशाप्रकारे करतात, हे तपासून घेतले पाहिजे. अशी मागणी त्यांनी केली.




आमचे चॅनल subscribe करा
