फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजछायाचित्रकारांची मदत केल्याचा फोटो आणि बातमी छापणार का?राजकीय नेत्याचा अजब सवाल

छायाचित्रकारांची मदत केल्याचा फोटो आणि बातमी छापणार का?राजकीय नेत्याचा अजब सवाल

Advertisements

कोरोनाच्या लढाईत मुक्त छायाचित्रकारांचे योगदान दुर्लक्षित!

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,१ मे: योगायोगाने आज महाराष्ट्र दिवस व कामगार दिवसाचे पवित्र पर्व. मात्र हे साजरे करीत असताना लहान-लहान दैनिकांसाठी व न्यूज पोर्टसाठी छायाचित्रण करणारे काही छायाचित्रकारांच्या योगदानाकडेही दूर्लक्ष् करता येत नाही. कोरोनाविरुद्ध मानवतेच्या या लढाईत नागपूर शहरातील अनेक मुक्त छायाचित्रकार हे भयंकर आर्थिक अडचणीत सापडले असल्याचे दृष्य आहे. पोलिस,आरोग्य सेवेतील घटक,प्रशासकीय घटकांसारखेच हे देखील एका अर्थाने ‘कोरोना व्हारियर्स’असताना या घटकाकडे मात्र शहरातील कोणत्याही पत्रकार ांच्या हिताच्या संघटना,राजकीय पक्ष्,प्रतिष्ठित नेते किवा प्रशासकीय व्यवस्थेचे लक्ष् नसल्याचे विदारक चित्र गेल्या दोन महिन्यात उमटले आहे.
२४ मार्च पासून शहरात लॉक डाऊन झाले आणि लहान मोठ्या वृत्तपत्रांसाठी,लोकल चॅनल,न्यूज पोर्टलसाठी छायाचित्रण करणारे अनेक छायाचित्रकार हे भयंकर अडचणीत आलेत. चूळबुळ करीत एप्रिल महिन्यात तरी त्यांनी तग धरली मात्र मे महिना सुरु झाला आणि… अनेकांच्या घरातले धान्य ही संपले. काही मोठ्या व राष्ट्रीय वाहीनींच्या विदर्भ प्रतिनिधींकडून अनेकांनी आर्थिक मदत मागितली. गेल्या दोन महिन्यात राष्ट्रीय वाहीनींचे हे विदर्भ प्रतिनिधी हे देखील मोजक्या आर्थिक परिमाणात असतानाही त्यांनी काही प्रमाणात काहींची मदत केली मात्र ही मदत अगदीच तुटपुंजी होती.

नागपूरात आणखी दोन आठवड्यांसाठी लॉक डाऊन लागू होण्याची शक्यता असून संपूर्ण व्यवहार ठप्प आहेत.दूकाने बंद,उद्योग,व्यवसाय,राजकीय घडामोडी संपूर्णत:बंद असताना या मुक्त छायाचित्रकारांना काम मिळेनासे झाले.परिणामी आर्थिक आवकही पूर्णपणे बंद पडली.

भाजपच्या एका नगरसेवकाच्या कानावर या मुक्त छायाचित्रकारांची विदारक आर्थिक परिस्थिती सांगितली असता,त्याने किती लोकांना मदत हवी?असे विचारले. जवळपास ३० लोकांना अन्न-धान्याची योग्य ती मदत मिळावी,असे सांगितले असता, एवढी मदत तर नाही करु शकणार मात्र १० जणांसाठी थोडी धान्याची व्यवस्था करतो,असे त्यांनी सांगितले. उर्वरित छायाचित्रकारांचे काय!हा प्रश्‍न घेऊन काँग्रेसचे शहरातील एक पराभूत नेते यांच्याकडे परिस्थिती बयाण केली असता,मदत नक्की करतो मात्र…मिडीयातील या छायाचित्रकारांची मदत केल्याची बातमी व फोटो छापून येईल का?असा अजब सवाल त्यांनी केला.

पत्रकारितेच्या क्ष्ेत्रातील कोणताही लहान-मोठा घटक असो,तो मानी आणि स्वाभिमानीच असतो.परिणामी शुद्र प्रसिद्धीचा हव्यास असणा-या त्या काँग्रेस नेत्याची मागणी,आर्थिक विवंचनेत असतानाही या छायाचित्रकारांनी धूडकावून लावली.

शहरातील भाजपच्या एका मोठ्या नेत्याच्या कानी या मुक्त छायाचित्रकारांची .आर्थिक विवंचना टाकली असता,मी तुम्हाला एक फोन नंबर देतो,त्यावर संपर्क करा म्हणून त्यांनी सांगितले. वास्तविकपणे बघता,त्या नेत्यांने स्वत: त्या नंबरवर संपर्क साधणे गरजेचे होते व आवश्‍यक ती मदत करण्याची सूचना द्यायला हवी होती,मात्र असे घडले नाही. या संपर्क क्रमांकावर अनेकदा फोन लावल्यानंतरही फोन उचलला गेला नाही.मात्र छायाचित्रकारांची मदत तर करायचीच,या अट्टहासाने सतत तो क्रमांक ट्राय केला असता,एकदाचा संपर्क झाला. त्यांनी एकंदर परिस्थिती एेकून घेतली आणि….३० कुटुंबे मिळून मी ५० किलो तांदूळ देऊ शकतो…असे उत्तर दिले.
एका कुटुंबात ५ ते ६ तोंडे खाणारी असताना या राष्ट्रीय पक्ष्ाच्या एका नेत्याकडून फक्त ५० किलो तांदूळ देण्याची मदत अर्थातच या छायाचित्रकारांनी नाकारली. मुक्त पत्रकार असो किवा छायाचित्रकार..त्यांना मदत हवी होती…भीक नाही!

शहरातील सुप्रसिद्ध सामाजिक संस्था यांच्याशी संपर्क करण्यात आला. त्यांनी हवी तेवढी मदत करणार असल्याचे सांगून सर्वांना पाठवून दे,असा निरोप दिला. या संस्थेतर्फे सध्या शहरात अन्नधान्य वाटपाचे कौतुकास्पद उपक्रम राबविला जात आहे. याच रांगेत मदतीसाठी हे छायाचित्रकार लागले होते,मात्र त्यांना पाहताच या संस्थेतील त्या कार्यकर्त्यांनी ‘अरे तुम्ही पण रांगेत लागले का?’अशी चूकीची प्रतिक्रिया दिली.त्यांची भावना होती,मिडीया क्ष्ेत्रातील पत्रकार ,छायाचित्रकार हे खाऊ‘न-पिऊन’सुखी आहेत. मंत्र्यांपासून संत्रीपर्यंत उठबस असणा-या मिडीया क्ष्ेत्रातील या घटकांना कोणतीच आर्थिक विवंचना नसते! कोरोनाच्या संकटाने या घटकाला या ‘अर्धसत्याची’ अशी जाणीवच करुन दिली जणू.

व्हेरायटी चौकात प्रशासकीय नोकरदारांनाच पुन्हा संघटनांची मदत-
व्हेरायटी चौकात कर्तव्यावर असणा-या पोलिसांना अनेक सामाजिक संस्था व संघटनेकडून दिवसाला चहा,जेवण,नाश्‍ता देण्यात आल्याचे चित्र गेल्या दीड महिन्यांपासून बघायला मिळतंय.मूळात जिल्हाधिकारी प्रशासनाचे कर्मचारी असो,महापालिकेचे प्रशासकीय कर्मचारी असो किवा पोलीस कर्मचारी असो,हे सर्व एका शासकीय व्यवस्थेचा भाग असून यांच्या खाण्यापिण्याची,आरोग्याची संपूर्ण जवाबदारी त्या त्या विभागावर निश्‍चित झालेली असते. मात्र व्हेरायटी चौकात,नागपूरच्या रणरणत्या उन्हात दिवसभर केवळ एखाद्या छायाचित्रासाठी किवा बातमीसाठी उभ्या असणा-या मिडीयातील या मुक्त घटकांसाठी शहरातील कोणत्याही संस्थेकडे कोणत्याही प्रकारची ‘संवेदनशीलता’ दिसून पडली नाही.

नाव न छापण्याच्या अटीवर संताप व्यक्त करताना एका छायाचित्रकाराचे हे मार्मिक मनोगत होते… शहरातील माध्यमकर्मींचा कैवार घेणारी संस्था यांच्या हस्ते फक्त एकदाच अन्नवाटपाचा ‘समारंभ’ जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पार पडला,५० लाेकांमध्येच अन्न वाटप संपले! जिल्हाधिकारी यांच्या हस्ते या सोहळ्याच्या उद् घाटानाचा फोटो छापून आला.असे समारंभ किवा असे सोहळे शहरातील मुक्त माध्यमकर्मींसाठी आयोजित होत नसतात…..!

मिडीयासाठी कंट्रोल रुमच नाही?

कोरोना’सारखे महाभयंकर साथीच्या रोगाचे संकट संपूर्ण जगावरच कोसळले आहे. देशात व राज्यात देखील या विषाणूने हाहाकार माजवला असता महाराष्ट्राच्या उपराजधानीत कोरोना संबंधित वृत्ताचे किवा छायाचित्राचे संकलन करण्यासाठी एकाच ठिकाणी कंट्रोल रुमची व्यवस्था ना जिल्हाधिकारी कार्यालयाने केली ना मनपा प्रशासनाने. पत्रकार असो किवा छायाचित्रकार त्यांना फक्त पिण्याचे पाणी व सावलीची गरज आहे. सध्या लॉक डाऊनमुळे सर्व चहा टपरी,नाश्‍ता केंद्र बंद आहेत.एकदा घरुन बाहेर पडल्यावर विसावा घ्यावा असे कोणतेही हक्काचे ठिकाण माध्यम प्रतिनिधी व पत्रकारांसाठी या शहरात नाही.
खामल्यातील काही गरजूंनी एका संस्थेकडून पोळी-भाजीचे किट घेण्यास चक्क नकार दिला. एक तर तेच-तेच खाऊन त्यांना कंटाळा आला असावा किवा ते खरे गरजूच नव्हते! आज शहरात अनेक आमदार,नगरसेवक,सामाजिक संस्था,विविध संघटना हे गरजूंपर्यंत अन्न धान्याचे किट वाटप करीत आहेत मात्र…समाजाचा एक अत्यावश्‍यक घटक हा मिडीयाकर्मी हा देखील असतो…त्याला ही पोट असतं…कुटुंब असतं…त्याचेही आतडे भूकेने तेवढेच पिळवटून निघत असतात….हे सत्य आता तरी या शहरातील नेते,सामाजिक संस्था समजून घेतील का?

नाशिकमध्ये ही पत्रकारांची झाली चाचणी-
छगन भूजबळ व एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून मुंबईनंतर नाशिकमध्येही पत्रकार व छायाचित्रकारांची कोरोना चाचणी करण्यात आली. नागपूरात महापौर संदीप जोशी यांनीही पुढाकार घेतला होता. पूर्वी या चाचण्या मेयाे-मेडीकलमध्ये घेण्याचे ठरले मात्र माध्यकर्मींनी त्या ठिकाणी जाण्यास नकार दिल्यावर पत्रकार भवनात या चाचण्या घेण्याचे निश्‍चित झाले.मात्र येथेही माशी शिंकली. माध्यमकर्मींपर्यंत व्हॉट्स ॲपच्या माध्यमातून निरोप पोहोचवण्यात आला,चाचणी झाल्यानंतर निकाल हा पॉझिटीव्ह असो किवा निगेटीव्ह असो,१४ दिवस विलगीकरणात राहवे लागणार!ही अट पगारी नोकर असणा-या कोणत्याही माध्यमकर्मींनी स्वीकारण्यासारखी नव्हतीच.१४ दिवस त्यांना विलगीकरणात राहण्यास परवानगी मिळणे दुरापस्तच होते, वरुन प्रत्येकाचे घर हे काही बंगला नव्हता ज्यात अनेक बेडरुम व दोन न्हाणीघर व शौचालय असतील.

परिणामी महापौर यांनी घेतलेल्या या पुढाकाराला यश मिळू शकले नाही. कोरोना चाचणी करण्यास अनेक माध्यमकर्मी हे तयार असताना १४ दिवसांच्या सक्तीने विलगीकरणाची अट,ही मात्र परिस्थितीनुरुप स्वीकारणे नागपूरकर माध्यमकर्मींना शक्य होऊ शकले नाही.

 

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या