

अखेर सतरंजीपुरा येथे एसआरपीएफचे जवान तैनात
नागपूर: शहराचा ‘हॉट स्पॉट’ठरलेला तसेच उपराजधानीला ‘रेड झोन’च्या श्रेणीत बसविणारा प्रभाग म्हणजे सतरंजीपुरा येथे सातत्याने वाढत जाणा-या काेरोना बाधितांची संख्या बघता स्थानिक पोलीस बळ हे अपुरे पडत असून या ठिकाणी तातडीने राज्य राखीव पोलीस दलाचे (एसआरपीएफचे) जवान तैनात करण्याची मागणी अपक्ष् नगरसेविका आभा बिज्जू पांडे यांनी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली होती.
शहरात कोरोनाचे वाढते संकट व सतरंजीपुरा येथील संशयित असणा-रा नागरिकांचे असहकार्य लक्ष्ात घेऊन जिल्हाधिकारी यांनी देखील या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत,या ठिकाणी एसआरपीएफ जवानांच्या तैनातीला मंजूरी दिली,सोबतच या ठिकाणी आयआरबीचे पोलिस पथक हे देखील दाखल झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मागील दीड महिन्यापूर्वी शहरात कोरोनाबाधित आढळून येणे सुरु झाले होते. तसेच दिल्लीतील मरकज येथूनही काही नागरिक नागपूरात दडून बसले होते. शहरात संचारबंदी व लॉक डाऊन असतानाही नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या सर्व्हेक्ष् ण करणा-या कर्मचा-यांना तसेच पोलिसांना येथील नागरिक सहकार्य करीत नव्हते. विनाकारण रस्त्यावर फिरणे, कोणतेही कारण सांगून पोलीसांची बाचाबाची करणे किंवा थेट हल्ला करण्यापर्यंतही काहींची मजल गेली होती.
मोमिनपुरा,सतरंजीपुरा भागातील कोरोनाचा संसर्गाने ८० पार संख्या ओलांडल्याने नगरसेविका आभा पांडे यांनी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांना निवेदन सोपवून नागरिकांच्या सुरक्ष्ि तेसाठी या ठिकाणी एसआरपीएफ जवानांची नियुक्ती करण्याबाबत निवेदन सोपवले. प्रशासनाने ही मागणी मान्य करुन राज्य राखीव पाेलिस बल गट १५ जवान परिमंडळ ३ येथे तैनात करण्यात आले.याच परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण होते. त्यानुसार तहसील हद्दीत ६ सेक्शन, लकडगंज,शांतीनगर आणि गणेशपेठ हद्दीतील प्रत्येकी २ सेक्शन तैनात करण्यात आले. या ताफ्यात ४ आधिकारी व ९० जवानांचा समावेश आहे.
कोरोनाचा वाढता प्रभाव बघता तसेच स्थानिक पोलिसांवरील कामाचा ताण कमी करुन नागरिकांकडून नियमांचे कठोरतेने पालन करण्याच्या हेतूने आभा पांडे यांनी हे निवेदन सोपवले होते. या ठिकाणी आता एसआरपीएफच्या जवानांच्या नियुक्तीनंतर येथील रहीवाश्यांनी सुटकेचा श्वास सोडला असून येथील नागरिकांनी नगरसेविका आभा बिज्जू पांडे यांचे विशेष आभार मानले आहे.
आभा पांडे यांनी या ठिकाणी देण्यात आलेल्या विशेष लक्ष् यासाठी पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्येय यांचे देखील आभार मानले आहे. आभा पांडे म्हणाल्या कि,एवढ्या गंभीर संकटात जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्तांनी ज्या संयमाने परिस्थिती हाताळली त्याला नागपूरकर हे आजन्म विसरणार नाहीत.




आमचे चॅनल subscribe करा
