

केंद्राच्या स्पष्ट सूचनांकडे प्रशासनाच्या
अक्ष्म्य दूर्लक्षाचा आरोप
नागपूर,३० एप्रिल: शहरात आज गुरुवार दि.३० एप्रिल रोजी आणखी तीन संशयित हे कारोनाबाधित निघाले. सतरंजीपु-याशी संबंधित या संशयितांना सिम्बॉयसिस येथे विलगीकरणात ठेवण्यात आले होते. काल बुधवारी देखील सतरंजीपु-याशी संबंधित ३ संशयितांची चाचणी ही पॉझिटीव्ह आली होती.तत्पूर्वी देखील सतरंजीपु-याशी संबधित हे कोरोना बाधित झाल्याने हा आकडा आज गुरुवारी १३९ कोरोना पॉझिटीव्हवर पोहोचला आहे. यामुळे नागपूरकरांमध्ये शहरातील प्रशासन हे बाधितांचेच विलगीकरण करीत आहे का! यावर चांगलीच चर्चा रंगली.
मूळात आधी विलगीकरण नंतर स्वॅब चाचणी,चाचणीचा अहवला व अहवालानंतर बाधितांची आकडेवरी घोषित करणे हा क्रम असताना नागपूरातील सतरंजीपूरा मात्र याला अपवाद असल्याचे अनेकांने म्हणने आहे. केंद्राच्या दिशानिर्देशानुसार ज्या परिसरात एक जरी कोरोना बाधित आढळला तरी त्वरीत तो संपूर्ण भाग सील करण्यात यावा असे स्पष्ट निर्देष असताना व देशातील इतर राज्यांनी या निर्देशाचे तंतोतंत पालन केले असताना महाराष्ट्राच्या उपराजधानीतील सतरंजीपुरा परिसर सील करण्यासाठी ८० च्या वर पॉझिटीव्ह येऊ द्यावे लागले,याचा तीव्र संताप अनेक नागरिक व्यक्त करीत आहेत.
गेल्या तीन दिवसात मनपा प्रशासनाने सतरंजीपु-यातील तब्बल १२०० नागरिकांचे विलगीकरण करुन त्यांना विविध विलगीकरण कक्ष्ात ठेवले.यातील अनेकांच्या स्वॅब चाचणीचा निकाल हा सातत्याने ‘पॉझिटीव्ह’येत असल्याने आता नागपूरकर नागरिक हे मनपा आयुक्तांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत असून,सतरंजीपुरा येथील आधीच बाधित झालेल्यांना आता मनपा प्रशासन विलगीकरणात ठेवीत असल्याची टिका करीत आहे. केंद्राच्या सूचनांचे पालन वेळीच केले असते तर ५ एप्रिल रोजी जेव्हा ७० वर्षीय वृद्धाचे कोरोनाने मृत्यू होताच संपूर्ण सतरंजीपुरा सील करण्याचा निर्णय प्रशासकीयस्तरावर का घेण्यात आला नाही?सक्तीने या भागातील नागरिकांची स्वॅब चाचणी का करण्यात आली नाही?परिसरातून विलगीकरण कक्ष्ात ठेवण्यापेक्ष्ा बाधितांना सरळ रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाणे प्रशासनासाठी सोयीस्कर झाले नसते का?अशा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मूळात मनपा प्रशासनाने या १२०० लोकांची यादी कधी मिळवली?सर्वेक्ष् ण दरम्यान येथील नागरिक मनपाच्या कर्मचा-यांना खरी माहिती देत नसताना प्रशासकीयस्तरावर प्रभावी निर्णय राबविण्यात अक्ष्म्य असा विलंब कसा झाला याचा संताप नागपूरकर नागरिक व्यक्त करीत आहे.
देशातील कोणत्याही संवेदशनशील भागामध्ये प्रशासकीय निर्णय राबविताना जी ‘दूरदृष्टि’असावी लागते त्याचा नितांत अभाव सतरंजीपुरा केसमध्ये बघायला मिळाले.प्रशासनाने आधी एका काेरोना बाधितांपासून आधी २५ बाधित होण्याची वाट बघितली,२५ नंतर ८० बाधितांपर्यंत आकडा पोहोचल्यानंतर त्या परिसरातील १२०० लाेकांना सक्तीने उचलून विलगीकरणाचा
निर्णय याला ‘उशिरा सूचलेले शहाणपण’असेच म्हटल्या जाऊ शकते,असे टोकाचे आणि टिकेचे मत सोशल मिडीयावर व्यक्त होत आहे.
मनपा आयुक्तांकडे शहरावर ओढवलेल्या एवढ्या गंभीर संकटावर मात करण्यासाठी कोणतीही ‘मायक्रो प्लानिंग’ नसल्याची टिका देखील ऐकायला मिळाली.येथील नागरिकांनी माहिती दडवल्याचे प्रशासनच कबूल करीत आहे,मग हे कोणाचे अपयश आहे?गेल्या ३६ दिवसांपासून संपूर्णत: लॉक डाऊनमध्ये राहणा-या नागपूरकर नागरिकांचे कि प्रशासकीय अदूरदर्शीपणाचे?असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. कारण गेल्या काही दिवसात ५० रुग्ण हे हे ३७ दिवसात तर दूसरे ५० रुग्ण हे फक्त १० दिवसात वाढले असल्याची आकडेवारी मनपा प्रशासनच देत आहे.
नागपूर पोलीसांचा ताण अत्याधिक वाढल्याने तसेच कारोना बाधितांचा आकडा हा सातत्याने वाढल्यानंतर सीआरपीएफ जवानांच्या तुकडीला या ठिकाणी तैनात करण्यात आले हेच पाऊल एक महिन्याअाधी उचलले असते तर याचे अधिक चांगले परिणाम नागपूरकर नागरिकांना बघायला मिळाले असते तसेच दिलासा देणारे ठरले असते,असे आता म्हटल्या जात आहे.
भालदारपूरा येथील रुग्णाचे सतरंजीपुरा कनेक्शन आहे का?
शहरात आता जेव्हा कधी,कुठे तरी नव्या भागात कोरोना पॉझिटिव्ह सापडतो तेव्हा नागपूरकरांना प्रश्न पडतो,याला बाधा कुठुन झाली?गांधीबाग महाल झोन अंतर्गत भालदारपूरा येथे नुकताच २२ एप्रिल रोजी कोराेना पॉझिटीव्ह सापडताच नागपूरकर नागरिकांनी त्याचे कोरोना कनेक्शन सतरंजीपु-याशी संबधित आहे किवा नाही यावर बरीच चर्चा केली मात्र प्रशासनाकडून नागरिकांना नेमकी माहिती देण्यात आली नसल्याचे सांगितले जात आहे.स्वत: मनपा प्रशासनच कबूल करीत आहे की सतरंजीपुरा येथील कोरोना बाधितांच्या संपर्कातील अनेक अद्याप ‘संपर्काबाहेरच’ आहेत.यामुळे आता शहरातील कोणत्याही भागात कोरोना पॉझिटीव्ह आढळताच ते सतरंजीपुरा येथून पळून येऊन या भागात लपून बसले आहेत का,अशी अनामिक भीती आता नागरिकांच्या मनात बसली असून,प्रशासनाला मात्र याचे कोणतेही सोयरसूतक नसल्याचे दिसून पडतंय. नुकतेच कळमना येथील गोदामात तब्बल १२ सतरंजीपुरा येथील संशयित लपून बसल्याची घटना ताजी असताना यातील तीन जणांची चाचणी नुकतीच कोरोना पॉझिटीव्ह आली आहे,त्यामुळे नागपूरकर नागरिकांची ही भीती अनाठायी असल्याचे म्हणू शकत नाही. मनपा अायुक्तांनीच आता नागरिकांच्या या शंकांचे निरसन करणे गरजेचे आहे.
महापौर संदीप जोशी यांनी देखील मनपातर्फे शहरात राबविण्यात येणा-या विलगीकरणाच्या धोरणावर कठोर टिका केली होती. काल बुधवारी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी पालकमंत्री नितीन राऊत यांच्यासोबत विभागीय आयुक्तांच्या कक्ष्ात शहरातील मुस्लीम समाजातील विचारवंत,धार्मिक प्रमुख व प्रतिनिधींसोबत सखोल चर्चा केली,यावरुन देखील या प्रश्नाचे गांर्भीय किती तीव्र आहे याचीच प्रचिती नागपूरकरांना आली.रमजान उत्सवाच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाची काळजी यावर सखोल चर्चा या बैठकीत करण्यात आली.
वैद्यकीय प्रशासनाची माहिती देण्यास ना!
सिम्बॉयसिसमध्ये विलगीकरणात असलेल्या सतरंजीपुरा येथील संशयितांचे किती नमुने कोणत्या दिवशी तपासणीस आले,याची माहिती विचारली असता,अशी माहिती देता येत नसल्याचे मेडीकलचे वैद्यकीय अधिक्ष् क डॉ.गावंडे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार दरदरोज ४०० च्या वर चाचण्या मेडीकलमध्ये होत असून,दरराेज घेतल्या जाणा-या स्वॅब पैकी कोणाच्या चाचण्या आधी कराव्या याचे दिशानिर्देश जिल्हाधिकारी ठरवित असल्याचे ते म्हणाले.कधी कधी आधी घेण्यात आलेल्या चाचण्या बाजूला ठेऊन नव्या आलेल्या स्वॅबच्या चाचण्यांना जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार प्राधान्य देण्यात आले असल्याची माहिती ही त्यांनी ‘सत्ताधीश’ला दिली.
थोडक्यात मनपा प्रशसानाने आपल्या ढिसाळ कारभारामुळे संपूर्ण सतरंजीपुराच नव्हे तर संपूर्ण शहरालाच ‘रेड झोन’मध्ये आणल्याचा संताप नागपूरकर नागरिक व्यक्त करीत असतानाच,आधी बाधित होऊ द्यायचे नंतर विलगीकरण करायचे,असा ’अजब आयुक्तांचा गजब कारभार’सुरु असल्याची टिका सोशल मिडीयावर चांगलीच रंगली आहे.




आमचे चॅनल subscribe करा
