

आमदार कृष्णा खोपडे यांनी प्रशासनाला आधीच केले होते सावध
नागपूर,२७ एप्रिल: कोरोना विषाणूच्या प्रसारामध्ये नागपूरात ‘हॉट स्पाट’ ठरलेल्या सतरंजीपुरा परिसरातील नागरिक अद्यापही माहिती लपवित असल्याने तेथील बहूतांश नागरिकांना आता विलगीकरण कक्ष्ात घेऊन जाण्याची प्रक्रिया सुरु झाली असून उद्या मंगळवार दि. २८ एप्रिल पर्यंत ही संख्या १२०० पर्यंत जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या जनसंपर्क विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.मात्र या भागाचे प्रतिनिधीत्व करणारे भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी एप्रिलच्या दुस-या आठवड्यातच हा संपूर्ण परिसर सैन्य दलाच्या स्वाधीन करावा व वाढत जाणा-या करोना बाधितांची संख्या रोखावी असे निवेदन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना दिले होते. त्यांच्या निवेदनाची योग्य ती दखल न घेतल्यामुळेच आज या प्रभागातील परिस्थिती ही आयुक्तांच्या हाता बाहेर गेल्याची चर्चा आहे.
खोपडे यांनी हेच निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील पाठवले होते मात्र राज्य शासनाने मुंढे हे नागपूरात कोरोनाचा प्रसार रोखण्यात चांगले कार्य करीत असल्याच्या अर्हिभावात त्या पत्रातील सूचनांची कोणतीही दखल घेतली नाही. काल रविवार दि.२६ एप्रिल रोजी नागपूरात करोना बाधितांचा आकडा हा १२७ पर्यंत पोहोचल्यावर मनपा प्रशासन खडबडून जागे झाले.शहरातील एका हेव्हीवेट मंत्री यांनीच राज्य शासनाला सांगून या प्रभागातील सर्वच संशयितांचे सक्तीने विलगीकरण करण्यात यावे,अशी सूचना केल्याचे सांगितले जात आहे. जे मुुंढेंना नाही सूचले ते या हेव्हीवेट मंत्र्यांना मध्यस्थी करुन नागपूरकर नागरिकांच्या सुरक्ष्ेसाठी करावे लागले,अशी चर्चा आता रंगली आहे.
नुकतेच मनपा प्रशासनाने सतरंजीपुरा भागातील ११६ हून अधिक नागरिकांना ताब्यात घेऊन वानाडोंगरी येथे विलगीकरण कक्ष्ात ठेवले होते, स्थानिकांच्या विरोधानंतर त्यांना पाचपावली भागात ठेवण्यात आले. एकसाथ एकाच भागातून एवढे नागरिक उचलून विलगीकरणात ठेवण्यात आल्यामुळे या भागात कोरोनाचा प्रसार किती झपाट्याने होत होता याची प्रचिती येते.सतरंजीपुरा येथील एक व्यक्ती मृत पावल्यानंतर तो कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले होते.त्याच्या संपर्कात २३५ पेक्ष्ा जास्त नागरिक हे संपर्कात आले होते. प्रशासनाने मृत व्यक्तिच्या आसपास राहणा-या लोकांचे विलगीकरण सुरु केले मात्र अनेकांनी त्यांना विरोध केला.सर्व्हे करणा-यांना हाकलून लावले. अनेकांनी खोटी माहिती दिली,अनेकांनी माहिती दडवली, तर अनेक हे शहरातची विविध ठिकाणी जाऊन दडलेत.परिणामी या एकाच प्रभागात कोरोना बाधितांची संख्या ही लक्ष् णीय ठरली.
या भागातील बाधितांमुळे नागपूर हे रेड झोनमध्ये आले. महापालिकेच्या झोन क्र. ६ व ७ अंर्तगत हा भाग येतो.महापालिकेच्या सर्वेक्ष् णाच्या वेळीच जर या प्रभागातील नागरिकांनी सहकार्य केले असते तर इतकी भीषण स्थिती उद् भवली नसती. आमदार कृष्णा खोपडे या भागाचे प्रतिनिधित्व करीत असल्यामुळे त्यांना मतदारांची नाळ चांगल्यारितीने माहित आहे.या भागातील नागरिकांनी प्रशासनाशी सहकार्य तर केलेच नाही उलट लॉक डाऊनच्या नियमांचे सर्रास उल्लंघन केले.मध्यरात्रीपर्यंत घोळके जमलेले असायचे.तेलंगीपुरा आखाडा, डॉ.अकबानी दवाखाना, माता मंदिर, अत्तरवाले मशीद, मामा मेडीकल, जुना मोटार स्टॅण्ड, हबीब टिम्बर, बौद्धपुरा आदी संवेदनशील भागांची यादी खोपडे यांनी पोलीस ठाण्यातही दिली होती. प्रशासनाने उच्च पातळीवर तातडीने सूत्र हलवली असती तर आज ही वेळ आली नसती,असे सांगितले जात आहे.
या ठिकाणी मनपा प्रशासनातर्फे घरोघरी केलेला सर्व्हे हा निव्वळ फास ठरला. याचा कोणताही उपयोग झाला नाही उलट खोटी माहिती देणे,लक्ष् णे दिसत असताना आजारी माणसांना घरातच दडवून ठेवणे असा प्रकार वाढला. मुुंढे यांनी या परिसराला कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात धन्यता मानली.हा परिसर प्रभाग क्र.२१ व प्रभाग क्र.२२ अशा दोन प्रभागात विभागला गेला.या परिसरात तेलीपुरा, बैरागीपुरा, कुंभारपुरा, गंगा-जमुना, खाटीकपुरा, आझमशहा चौक, टेलिफोन एक्सचेंज चौकचा मागील भाग,सुनील हॉटेल परिसर,मारवाडी चौक इ.चा समावेश होतो.
या प्रतिबंधित क्ष्ेत्रात दोन झोन म्हणजे गांधीबाग व सतरंजीपुरा झोनमधील परिसर येतो. सतरंजीपुरा येथील ३० हजार तर गांधीबाग झोनमधील ९,५०० लोकसंख्या या प्रतिबंधित क्ष्ेत्रात येतात.सतरंजीपुरा भागातील ३० हजार लोकसंख्येपैकी १२०० नागरिकांचे विलगीकरण उद्या मंगळवारपर्यंत होणार असून,मोमिनपूरा भागात जे कारोना बाधित सापडले ते दिल्लीतील मरकजशी संबधित होते व एका मजिदीमध्ये लपून बसले होते असे सांगितले जाते. मात्र भालदारपूर,टिमकी हा हिंदू बहूल भाग असून एक विशिष्ट समुदाय एका छोट्याश्या भागात वास्तव्यास अाहे.असे असताना कोरोनाचा प्रसार हिंदू बहूल भागात वाढविण्यास विशिष्ट बहूल समुदायाने महत्वाची भूमिका निभावली असती,असे सतरंजीपु-यातील एका स्थानिक नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
यासंदर्भात अधिक माहिती देताना महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, सतरंजीपुरा परिसर नागपूरसाठी कोरोनाच्या दृष्टीने हॉटस्पॉट ठरला आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेची चमू दररोज या परिसरात सर्व्हेक्षण करीत आहे. नागरिकांना त्यांची इत्यंभूत माहिती विचारीत आहेत. परंतु अद्यापही नागरिक संपूर्ण माहिती देत नसल्याची बाब सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून लक्षात आली. कोरोनामुळे मृत पावलेल्या नागरिकांच्या संपर्कातील सुमारे २०० वर नागरिकांनीही अशीच माहिती लपविली होती. त्यांना वेळीच विलगीकरण कक्षात पाठविल्याने मोठा संसर्ग टळला. त्यातीलच पॉझिटिव्ह असलेल्यांचा आकडा ८० पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी खरी माहिती लपविली तर तेथून अनेक नागरिक पॉझिटिव्ह निघू शकतात, ही शक्यता नाकारता येत नाही. आताच उपाययोजना केल्या नाही तर संसर्गाचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही. म्हणूनच तेथील नागरिकांना तातडीने विलगीकरण कक्षात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी १००, आजच्या तारखेत ४५० नागरिकांची रवानगी विलगीकरण कक्षात करण्यात आली असून उद्यापर्यंत हा आकडा १२०० च्या घरात जाईल, असेही त्यांनी सांगितले.
त्यामुळे नागपूर महानगरपालिकेच्या चमूला खरी माहिती पुरवा. समाजाचे शत्रू बनू नका. मानवतेचे दूत बना, असे आवाहन पुन्हा एकदा नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
ज्यावेळी या भागातील कोरोना बाधितांचा आकडा हा २०-२५ वर पाेहोचला तेव्हाच मुंढे यांनी आज जी पावले उचलली आहेत,ती उचलली असती तर नागपूरात एवढी संख्या बाधितांची वाढलीच नसती,असा आरोप त्यांनी केला. मुंढे यांना नागपूरात रुजू होऊन फक्त अडीच महिने झाले.शहरातील संवेदनशील भाग, त्या भागातील मतदारांची मानसिकता,याची जाणीव जनप्रतिनिधींना कोणत्याही प्रशासकीय अधिका-यांपेक्ष्ा जास्त असते. तरीही मुंढे यांनी या क्ष्ेत्रातील आमदार,नगरसेवक,स्थानिक नेते यांना विश्वासात न घेता,कार्यभार रेटला.याचे परिणाम संपूर्ण नागपूरकरांनाच भोगावे लागत असून,आता हिंदू बहूल क्ष्ेत्रातील छोट्याश्या भागांमध्ये राहणा-या विशिष्ट समुदायातील नागरिकांना सक्तीने विलगीकरणात ठेवण्याचे शहाणपण हे ‘उशिरा सुचलेले शहाणपण’असल्याची बोचरी टिकाही त्या स्थानिक नेत्याने केली.
सोमवारी हे भाग देखील झाले प्रतिबंधित क्ष्ेत्र घोषित-
मनपा आयुक्त यांनी सोमवारी शहरातील आणखी काही भाग हे प्रतिबंधित क्ष्ेत्र म्हणून घोषित केले,ते पुढील प्रमाणे आहेत-
दक्ष्णि-पश्चिममधील इटाभट्टी चौक
दक्ष्णिेतील पिवळी नदी,वांजरा पूल
उत्तर पश्चिमेतील नंदी चौक, रिंग रोड
उत्तरेतील पिवळी नदी,यशोधरा नगर मनपा शाळा
वरील भागातील येणारे-जाणारे मार्ग तात्काळ प्रभावाने बंद करण्यात आले असून या भागातील नागरिकांना प्रतिबंधित क्ष्ेत्राबाहेर जाण्यासाठी प्रतिबंध करण्यात आले आहे.




आमचे चॅनल subscribe करा
