

दीड वर्षाच्या चिमूरडीला करोनाची बाधा:नागपूरात बाधितांची संख्या झाली १२७
नागपूर,२६ मार्च: सतरंजीपु-याशी संबधित करोना बाधितांची संख्या उपराजधानीत कमी होण्याचे नाव घेत नाही उलट दररोज बाधितांचा आकडा हा वाढत आहे. काल शनिवार दि.२५ एप्रिल रोजी एकाच दिवशी १९ करोना बाधितांचा अहवाल हा पॉझिटीव्ह आला होता.आज रविवार दि. २६ एप्रिल रोजी जरी करोना बाधितांची संख्या ही ३ ने वाढली असली तरी हे तीन बाधित एका गोदामात लपून बसलेल्या १२ लोकांपैकी आहे,हे जास्त चिंताजनक व तेवढेच धोकादायक आहे,असे सांगितले जात आहे.
शुक्रवारी रात्री महापालिकेचे कर्मचारी व पोलीस अधिका-यांनी कळमना येथील एका गाेदामात लपून बसलेल्या १२ करोना संशयितांना धाड टाकून ताब्यात घेतले व आमदार निवासातील विलगीकरण कक्ष्ात त्यांची रवानगी केली. सतरंजीपुरा येथील एका नागरिकाला दोन दिवसांपूर्वीच त्या भागातील आरोग्य कर्मचारी याने त्याच्या कुटुंबियांविषयी माहिती विचारली असता,त्याने त्याचे कुटुंबिय हे बिहारला गेल्याची बतावणी केली होती. आरोग्य विभागाच्या चमूने त्याच्या कुटुंबियांबाबत अधित सखोल विचारणा केली असता,ते नागपूरात कुठेतरी दडून बसल्याची बाब उघडकीस आली.
कळमन्यातील विजयनगरमधील एका नातेवाईकाच्या गोदामामध्ये या १२ लोकांनी आसरा घेतला होता. त्यांचा दिवा रात्रीच्या वेळी सुरु असल्याने या परिसरातील नागरिकांच्या मनात शंका निर्माण झाली.या परिसरातील काही जागरुक नागरिकांनी पोलीसांना याबाबत सूचना दिली.शुक्रवारी रात्री मनपाच्या आरोग्य विभागाचे अधिकारी व पोलीस विभागाने संयुक्तरित्या कारवाई करीत या १२ नागरिकांना ताब्यात घेतले व आमदार निवासात विलगीकरण कक्ष्ात त्यांना पाठवण्यात आले.
या १२ पैकी ३ संशयितांचा अहवाल आज पॉझिटीव्ह आला आहे. एम्समध्ये त्यांच्या घश्याच्या द्रावाची चाचणी घेण्यात आली होती. यातील एक रुग्ण तर फक्त दीड वर्षाची चिमुरडी आहे. एक ५५ तर एक ३७ वर्षीय महिला आहे. कोणत्याही प्रकारच्या सुरक्ष्ेची काळजी न घेता हे १२ नागरिक त्या गोदामात एक साथ वावरत होते. आता नागपूरकरांना धडकी भरली,यातील तिघांचा चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने उर्वरित ९ नागरिकांचा अहवाल देखील पॉझिटीव्ह येण्याचीच शक्यता आहे.यामुळे नागपूरात बाधितांच्या संख्येत आणखी वाढ होणार असून काही नागरिकांच्या अश्या बेजवाबदार वर्तवणूकीमुळे लॉक डाऊनचा कालावधीचा काळ हा आणखी वाढत जाणार आहे.
प्रशासनाचे प्रयत्न ठरतात आहे अपूरे:प्रभावी प्रबोधनाची गरज
सतरंजीपूरा येथील मृत करोना बाधिताच्या संपर्कात आलेल्या संशयितांची संख्या ही दिवसेंदिवस हनुमतांच्या शेपटीसारखी लांबत असून याचा अंतच दिसत नसल्यामुळे नागपूरकर नागरिक हे चांगलेच निराश झाले आहेत. करोनाच्या भीतीने,किंवा अज्ञानातून लहान लहान मुले,बायका, तरुणाई,पुरुष मंडळी ही स्वत:हून बाहेर येण्यास धजत नाही,हे एका अर्थाने प्रशासनाचे अपयशच म्हणावे लागेल. सतरंजीपुरा येथील नागरिकांना प्रभावी प्रबोधनाची अत्यंत गरज असून सर्वात आधी तर त्यांच्याच समुदायातील मौलवींनी त्यांचे समुपदेशन करणे गरजेचे झाले आहे.
ऐरवी कोणत्या ना कोणत्या मुद्दाला घेऊन ‘फतवे’काढणारे ही एवढ्या मोठ्या प्राणांतिक संकटातही गप्पच दिसतात आहे! नागपूरकर नागरिकांना याचाच जास्त संताप आहे. दीड वर्षाची चिमुरडी करोनासारख्या साथीच्या रोगाला बळी पडतेय यावरुन तरी या समुदायातील नागरिकांनी योग्य तो बोध आता तरी घेणे गरजेचे आहे. गेल्या ३१ दिवसांपासून प्रशासनाच्या सर्व सूचनांचे पालन करीत नागपूरकर नागरिक हे घरात लॉक डाऊनमध्ये बसले असताना,सतरंजीपु-यातील नागरिकांना अद्यापही याचे गांर्भीयच नसल्याने नागरिकांचा संताप अनावर झाल्याचे सोशल मिडीयावर दिसून पडतंय.
शुक्रवारी मध्यरात्री तर पाेलीसांनाच सतरंजीपु-यातील दडून बसलेल्या १२ नागरिकांना बाहेर काढून विलगीकरण कक्ष्ात पाठवावे लागले,यावर चांगलीच चीड नागरिक व्यक्त करीत आहेत.प्रशासनाने यांचा योग्य वेळी शोध घेतला नसता व पुढे लॉक डाऊन समाप्तीची घोषणा झाली असती तर हीच करोना पॉझिटीव्ह असणारी मंडळी सरळ स्वस्थ समाजात मिसळली असती व इटली,चीन व अमेरिकासारखी परिस्थिती नागपूरात निर्माण केली असती,असा राग या दडून बसलेल्या नागरिकांवर व्यक्त होत आहे.
नागपूरच्या रणरणत्या उन्हात पोलीसकर्मी हे रस्तोरस्ती पहारा देत आहेत. करोना संशयितांवर देखील कारवाई करताना पोलीसकर्मी हेच आधी संपर्कात येतात.मुंबईमध्ये एकूण ९६ पोलीसकर्मींना करोनाची बाधा झाली असून २ पोलीसकर्मींना करोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. अश्यावेळी पोलीसकर्मी व आरोग्यकर्मी जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत असताना,सतरंजीपु-यातील नागरिकांचे असे वागणे हे अनेकांच्या रोषाचे कारण ठरले आहे.
हल्ली मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार दहा झोनमध्ये भाजी बाजार भरत आहे. मात्र या भाजी बाजारांचा एकंदरीत अभ्यास केला असता हे भाजी बाजारच आता स्वस्थ नागरिकाच्या आरोग्याच्या दृष्टिने खूप संवेदनशील झाले आहेत.एवढी तूफान गर्दी या बाजारांमध्ये उसळली असते. सामाजिक अंतराची अट ही तर या ठिकाणी धाब्यावर बसवलेली दिसते. दूध,औषधे व भाजी विक्रीलाच सूट असल्यामुळे आजवर नागपूरच्या गल्ली बोळयात अनेक लहान-लहान व्यवसाय करणारे यांनीही भाजी विक्रीचा पर्याय निवडला असून त्यामुळेच ग्राहकांपेक्ष्ा फूटकळ विक्रेत्यांचीच तूफान गर्दी अश्या भाजी बाजारात दिसून पडतेय.
मनपाचे प्रशासन शहरातील भाजी बाजारांमध्ये करोनाचा संसर्ग होऊ नये याबाबत खबरदारी घेण्यात,नियमांची अंमलबजावणी करण्यात सपशेल अपयशी ठरल्याची भावना ही प्रत्येक झोनच्या भाजीबाजारा जवळील मंडळी ही व्यक्त करताना दिसतेय.




आमचे चॅनल subscribe करा
