
कालच्या ब्रेकनंतर आज शुक्रवारी झाली ७ नव्या रुग्णांची नोंद!
नागपूर: गुरुवारी एका दिवसाचा ब्रेक घेतल्यानंतर शुक्रवारी मात्र नागपूरात करोना बाधितांच्या संख्येत ७ नी भर पडली आणि शहरात करोना बाधितांची संख्या ही १०५ वर पोहोचली.रात्री उशिरा आणखी एका रुग्णाचा अहवाल हा पॉझिटीव्ह आल्यामुळे शुक्रवारी एकूण ७ नव्या रुग्णांची भर पडली.
गुरुवार दि. २३ एप्रिल रोजी करोनाचा एक ही रुग्णाचा अहवाल हा पॉझिटीव्ह आला नसल्यामुळे नागपूरकरांना थोडा दिलासा मिळाला होता आणि बाधितांची संख्या ही ९९ वर थांबली होती. मात्र शुक्रवारी एकूण ७ रुग्णांचा अहवाल हा पॉझिटीव्ह आला आणि आता शहरात करोना बाधितांची संख्या ही १०५ वर पोहोचली आहे.यामुळे नागरिकांमध्ये चांगलीच धास्ती वाढली आहे. शहरात ११ मार्च रोजी पहीला करोनाबाधित रुग्ण आढळला होता. ११ मार्च ते २२ एप्रिल दरम्यान बाधितांची संख्या ही ९८ वर पोहोचली. मात्र १६ ते २२ एप्रिल या आठवड्याभरात ४२ रुग्णांची नोंद झाली. सात दिवसात या वाढलेल्या आकडेवारीने प्रशासनाची चांगलीच चिंता वाढवली असून हे सर्व रुग्ण एप्रिलच्या पहील्या आठवड्यात मृत पावलेल्या सतरंजीपुरा येथील करोना बाधिताच्या संपर्कातील आहेत.
विशेष म्हणजे मृत करोना बाधिताच्या संपर्कातील त्यांच्या मुलाचा व मुलीचा अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून आज शुक्रवारी सुटी देण्यात आली आहे मात्र त्यांना पुढील १४ दिवस घरीच विलगीकरणात राहणे गरजेचे आहे.करोनातून बरे होऊन घरी सुखरुप जाणारे यांची संख्या आज शुक्रवारी ही १७ झाली आहे.मात्र त्याच मृत करोना बाधितामुळे त्याच्या संपर्कात आल्यामुळे एकूण २३५ रुग्णांवर करोनाचं संकट ओढवलं असल्याची माहीती ही प्रशासनाकडूनच प्राप्त झाली आहे.
पुढील मे महिन्यात चाचण्या वाढतील त्याप्रमाणात बाधितांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता गृहीत धरुनच मनपा प्रशासनाने आता संशयितांच्या विलगीकरणासाठी शहराबाहेर देखील विलगीकरण केंद्र शोधण्याची मोहीमच उघडली आहे. सध्या आमदार निवासात २४५, रविभवन येथे ६९, सिम्बॉयसिस येथे ७०, वनामती मध्ये ९८ तर लोणारा येथे ३१ तर वानाडोंगरी येथे १२६ संशयितांना ठेवण्यात आले आहे.
वानाडोंगरी येथील संशयित हलवणार-
सतरंजीपुरा येथील मृत करोना बाधिताच्या संपर्कात आलेल्या १२६ संशयितांना गुरुवारी वानाडोंगरी येथील विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले होते मात्र परिसरातील नागरिकांनी याचा तीव्र विरोध केला. स्थानिक आमदार तसेच विविध राजकीय पक्ष्ाच्या नेत्यांनी या विरोधात जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांना निवेदन सादर केले. ठाकरे यांनी निवेदन मंजूर करुन येथील संशयितांना इतरत्र हलविल्या जाईल असे आश्वासन दिले आहे. ज्या शासकीय वास्तूत त्यांना ठेवण्यात आले त्यात अद्याप पुरेशा सोयी नाहीत तसेच संपूर्ण वानाडोंगरीला पाणी पुरवठा करणारी विहीर देखील याच ठिकाणी असल्यामुळे येथील नागरिक हे संतप्त झाले आहेत.या ठिकाणी विलगीकरणात ठेवण्यात आलेल्या संशयितांपैकी एकही करोना बाधित निघाल्यास वानाडोंगरी येथील संपूर्ण नागरिकांचेच आरोग्य धोक्यात येणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. जिल्हाधिकारी यांनी नागरिकांचे निवेदन मान्य केल्याने येथील नेते मंडळी तसेच नागरिकांनी जिल्हाधिकारी यांचे आभार मानले आहेत.
पुढील काळ ‘कसौटीचाच’-
मे महिना हा नागपूरकरांसाठी अत्यंत कसौटीचाच राहणार असल्याची झलक एप्रिलच्या या शेवटच्या आठवड्यात वाढत जाणा-या रुग्ण संख्येवरुन मिळाली आहे. प्रशासनासमोर वैद्यकीय उपचारांपेक्ष्ा ही गंभीर समस्या ही विलगीकरण केंद्राची व्यवस्था करणे याची निर्माण झाली आहे. प्रशासनातर्फे सातत्याने शहर व शहराबाहेर विलगीकरण केंद्र हे शाेधले जात आहे. करोना बाधित रुग्णांची संख्या ही जसजशी वाढत जाईल तशीच त्यांच्या संपर्कात येणा-या सशंयितांची देखील संख्या ही लक्ष् णीय राहणार आहे. शहरातील नागरिकांना त्यांच्या पासून सुरक्ष्ति ठेवण्यासाठी बाधितांच्या संपर्कात येणा-यांना विलगीकरण केंद्रात ठेवणे ही प्रशासनाची मोठी डोकेदूखी बनणार आहे. नुकतेच वानाडोंगरी येथील प्रकरण प्रशासनाच्या चांगलेच अंगलगट आले आहे. शहरातील कोणत्याही भागात नागरिक करोनाच्या अत्यधिक भीतीने आपल्या परिसरात,आपल्या प्रभागात करोना संशयितांना ठेवण्यास तीव्र विरोध करीत आहे. आमदार निवास परिसरातील नागरिकांनी देखील असाच तीव्र आक्ष्ेप सुरवातीलाच नोंदवला होता मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.
नागपूरचा समावेश शंभरच्या वर करोनाबाधित शहरांमध्ये-
देशातील तीस शहरांमध्ये सध्या शंभरच्या वर करोना बाधितांची लक्ष् णीय संख्या आहे. यात आता ‘नागपूर’शहराची देखील शुक्रवारी भर पडली . शंभराहून अधिक करोना रुग्ण असलेल्या या ३० शहरांनी सरकारची चिंता चांगलीच वाढवली असून यात देशाची राजधानी दिल्ली शिवाय पुणे,मुंबई आणि ठाण्याचाही समावेश आहे.
या शिवाय जयपूर,जोधपूर, अहमदाबाद, बडोदा,सुरत,आग्रा,लखनऊ, इंदूर,भोपाल, कोलकता, गुुंटूर,करनूल,हैदराबाद, चेन्नई, कोईमतूर इ.शिवाय शुक्रवारी महाराष्ट्राची उपराजधानी ‘नागपूर‘चा देखील यात समावेश झाल्याने शहरातील नागरिक हे चांगलेच निराश झाले आहे.
‘नीरीत’ही होणार करोना चाचणी-
शहरातील ’नीरी’ या संशोधन संस्थेत लवकरच करोना चाचणी सुरु हाणार असल्याचे संकेत मिळाले आहे. यामुळे शहरातील कोरोना तपासणीच्या प्रयोगशाळांची संख्या ही ५ होणार आहे.मेयो,मेडीकल व एम्सशिवाय पशु व मतस्य विज्ञान विद्यापीठात(माफसू) येथे सध्या करोना चाचणी केली जात आहे. आज शुक्रवारी पॉझिटीव्ह म्हणून सापडलेल्या दोन रुग्णांच्या घश्यातील द्रव्याची चाचणी ही माफसू मध्ये करण्यात आली होती तर ४ रुग्णांचा पॉझिटीव्ह अहवाल हा एम्समधून आला आहे.
मेयाेमध्ये नागपूर शहर व ग्रामीणचा भार अाहे. मेडीकलमध्ये नागपूरसह गोंदिया,भंडारा जिल्ह्यातील नमुने तपासले जात आहे.यानंतर एम्समध्येही अधून-मधून नागपूरचे नमूने पाठवले जात आहेत.आता माफसूमध्ये देखील करोनाची चाचणी केली जात आहे.या चारही प्रयोगशाळांमध्ये दररोज ४०० ते ४५० नमूने दररोज तपासले जात असून यात आता ’नीरी’चा देखील हातभार लागल्यास चाचणीचे प्रमाण हे झपाट्याने वाढेल व करोनाची लागण याबाबतचा निकालही लवकर लागण्याची शक्यता आहे.

आमचे चॅनल subscribe करा