Homeनागपूर मनपाशेतकऱ्यांच्या कॉटन मार्केट ऐवजी श्रीमंतांचे अतिक्रमण पाडा: जय जवान जय किसान संघटनेची...

शेतकऱ्यांच्या कॉटन मार्केट ऐवजी श्रीमंतांचे अतिक्रमण पाडा: जय जवान जय किसान संघटनेची मागणी

नागपूर,२३ एप्रिल: कोरोना विषाणूचा धुमाकूळ सर्व जगात सुरु आहे. सर्व जगामध्ये लोक जीव मुठीत धरून घरात बसलेले आहेत .
शेतकरी बांधव मात्र स्वतःच्या जीवाची चिंता न करता घरात दडून बसलेल्या नागरिकांना अन्न धान्य भाजी पाला फळे व इतर जिवनावश्यक वस्तू पुरवीत आहेत. अश्या असहाय शेतकऱ्यांवर किंवा त्यांच्या प्रतिष्ठानांवर कारवाई करण्यापेक्षा शहरातील श्रीमंतांच्या अनधिकृत अतिक्रमणावर कारवाई करण्याचे धाडस मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दाखवावे असे आवाहन ‘जय जवान जय किसान’ संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी केले आहे.

नागपूर मध्ये तीस लाख नागरीक घरात बसून असून शेतकरी मात्र अत्यंत्य विपरीत परिस्थिती मध्ये नागरीकांना सेवा देत आहेत.
तथापी काही दिवसांआधी कॉटन येथील व्यापार बंद करुण शेतकऱ्यांच्या समस्या वाढविण्याचे काम महानगर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.

इतक्यावरच थांबून त्यांना समाधान झाले नाही त्यांनी कॉटण मार्केट परिसरातील सर्व दुकादारांचे अतिक्रमण हटवले. दुकाने बंद असतांना काहीही व्यवहार सुरू नसतांना ही मोहीम चालविण्यात आली.

शेतकऱ्यांच्या समस्या वाढविणाऱ्या या आयुक्तांना काय समाधान  मिळाले याचा आम्हाला बोध होत नाही त्यामूळे आम्ही अश्या कारवाईचा तिव्र शब्दांमध्ये विरोध करीत असून मुंढे यांना शहरातील श्रीमंत लोकांचेही अनिधीकृत  बांधकामे पाडावी व अवैध अमिक्रमण दूर करावी अशी आम्ही मागणी करीत आहोत.

शहरामधील अनिधिकृत लान्स व मंगल कार्यालयांचा फार मोठा गंभीर विषय आहे. अपुऱ्या व्यवस्था असतांना सुद्धा लान्स व मंगल कार्यालय मनपाच्या भष्ट्र अधिकाऱ्यांच्या सहयोगातून सुरू आहे. सर्व लान्स व मंगल कार्यालये यांना नव्याने परवाणे घेण्याची सक्ती करण्यात यावी कारण कोरोणाचा धोका अजून जवळपास ६  महिने राहणारच आहे.

जर अशी कारवाई झाली नाहीतर ‘जय जवान जय किसान’ संघटना लॉक डाऊन संपल्यावर तीव्र आंदोलन करेल असा इशारा पवार यांनी दिला आहे.

Latest बातम्या