
मनपाच्या कोषात आमदार,नगरसेवकही देणार फंड
नागपूर,२३ एप्रिल: करोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे युद्धस्तरावर विविध क्ष्ेत्रात मनपाचे अधिकारी व कर्मचारी हे राबत आहेत. मनपाच्या मुख्यालयात ‘कंट्रोल रुम’तयार करण्यात आली असून शहरातील विविध निवारागृहात स्थानबद्ध असणा-यांसाठी तसेच शहरातील गरजू लोकांसाठी अन्न पुरविण्यासाठी ‘फूड झोन’देखील युद्धपातळीवर कार्यरत आहेत.गुरुवार दि. २३ एप्रिल रोजी महापौर संदीप जोशी हे मनपा मुख्यालयात व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांनी आधी आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतली असल्याचे सांगितले जात आहे.
यावेळी झालेल्या चर्चेत मनपातर्फे ‘करोना’च्या पार्श्वभूमीवर शहरात केल्या जाणा-या विविध प्रकल्पात शहरातील प्रथम नागरिक म्हणून महापौर यांच्या याेगदानासोबतच,शहरातील आमदार व नगरसेवकांचे योगदान याबाबत चर्चा घडली असल्याची चर्चा आहे. याप्रसंगी आयुक्तांनी ‘सध्या माझे अधिकारी व कर्मचारी हे तीन-तीन पाळीमध्ये दिवसरात्र काम करीत असून,मला जर आमदार व नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांचे बळ मिळाले तर त्यांना मी उचित मार्गदर्शन करुन प्रशासकीय कामकाजात सहभागी करुन घेईल,यामुळे माझ्या अधिकारी व कर्मचा-यांवरील ताण निश्चितच कमी होईल व त्यांना तीन ऐवजी दोन पाळीत काम करणे शक्य होईल’असे सांगितल्याची चर्चा मनपात रंगली आहे.
यावर महापौरांकडे कोणतेही उत्तर नसल्याचे सांगितले जाते. महापौरांसोबत याप्रंसगी स्थायी समितीचे अध्यक्ष् पिंटू झलके, आरोग्य समिती सभापती विरेेंद्र कुकरेजा हे देखील उपस्थित होते. सध्या मनपात ‘महापौर विरुद्ध आयुक्त’ यांच्यातील शीतयुद्धाबाबत शहरात बरीच चर्चा आहे. राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा लागू असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शहरातील संपूर्ण जवाबदारी ही आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर सोपवली असून तसे पत्रच त्यांना मार्चच्या पहील्या आठवड्यात देण्यात आले आहे. परिणामी नागपूर शहरातील करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक निर्णय घेण्याचा हक्क आयुक्तांना प्राप्त झाला असून परिणामी महापौरांसह विविध पक्ष्ाचे २८८ जनप्रतिनिधी हे ‘सुप्तावस्थेत’ गेल्याचे दिसून पडतंय!
मनपाच्या कोषात आमदार व नगरसेवकांच्या निधीचेही योगदान-
मनपातर्फे फूड झोनच्या माध्यमातून गरजूंना अन्न वाटप असो किवा इतर सोयी-सुविधा पुरविण्याचे कार्य असो. शासनातर्फे मनपाला प्राप्त झालेल्या कोट््यावधीच्या निधीत नागपूर शहरातील आमदार तसेच नगरसेवक हे देखील भरीव मदत करणार असून या निधीत वाढ करणार असल्याची माहिती सूत्राकडून प्राप्त झाली.निश्चितच हा स्तुत्य निर्णय असून ‘करोना’विरुद्धची लढाई ही नागपूरातील बाधितांचा आकडा बघून सोपी नसल्याचेच दिसून पडतंय. ३ मे नंतर लॉक डाऊनचा अवधी हा आणखी वाढू शकतो.अन्न धान्यासोबतच आरोग्याच्या प्रश्नावर देखील वारेमाप खर्च हाेण्याची शक्यता आहे,अश्यावेळी शासनाच्या निधीत आमदार व नगरसेवकांच्याही निधीची भर पडल्यास याचा लाभ शहरातील नागरिकांनाच होणार,यात दूमत नाही.

आमचे चॅनल subscribe करा