फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजना आभार..ना संवाद,कुलगुरु उद्या होणार निवृत्त

ना आभार..ना संवाद,कुलगुरु उद्या होणार निवृत्त

ना आभार..ना संवाद,कुलगुरु उद्या होणार निवृत्त

‘करोना’चा महिमा अपरंपार,डॉ. चांदेकर यांना सोपवतील सत्काराशिवाय कारभार

डॉ.ममता खांडेकर
(Senior journalist)

नागपूर: ‘करोना’या साथीच्या रोगाच्या विषाणूने जगभरात हजारो लोकं मृत्यमुखी पडलेत,दररोज नव्याने हजारो लोकांना याची लागण होत असल्याच्या पार्श्वभूमीवरच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सिद्धार्थविनायक काणे हे उद्या मंगळवार दि. ७ एप्रिेल रोजी निवृत्त होत आहे. विशेष म्हणजे कुलगुरु पदी असताना त्यांनी अनेकांना सत्कारपूर्वक निरोप दिला मात्र त्यांच्या निरोपाच्यावेळी कोणताही सत्कार होणार नसून,विद्यापीठाच्या इतिहासात कुलगुरु पदावरील व्यक्ति निवृत्त होताना त्यांच्या निवृत्तीची ‘ना आभार..ना संवाद’अशी इतिहासात कायमची नोंद होणार आहे,हे विशेष!

‘करोना’आणि त्याचे भयंकर सावट याचे परिणाम शैक्ष् णिक वर्तृळातही खोलवर उमटले आहे. शाळा,महाविद्यालये बंद झालीत , उन्हाळी परिक्ष्ा लांबल्या,पुढील काळ विद्यापीठासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आणखी कठीण असणार आहे,या पार्श्वभूमीवर खंबीरपणे धोरणात्मक निर्णय राबविणारे कुलगुरु डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांचा अनुभव विद्यापीठाला कामी पडला असता,असे सांगितले जात आहे. करोनामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली असताना,विद्यापीठाच्या प्रशासनावर पुढील काळात पडणारा प्रशासकीय व आर्थिक ताण हा आजवरच्या विद्यापीठाच्या इतिहासातील सर्वाधिक गंभीर प्रश्‍न असणार आहे.

आपल्या एकंदर कार्यकीर्दीत अनेक चढ-उतार डॉ. काणे यांनी अनुभवले आहेत. या विद्यापीठाशी त्यांची शैक्ष् णिकच नव्हे तर भावनिक नाळ खोलवर जुळली आहे. आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत विविध पदे भूषवताना त्यांना आलेल्या अडचणी, राजकीय दडपण, न्यायालयातील खटले, कौटूंबिक जिवनावर झालेला परिणाम,निवृत्तीच्या क्ष णाला होणारी मनातील भावनिक आंदोलने,निवृत्ती नंतरची पुढील वाटचाल इत्यादी विषयी कुलगुरु यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता,कॉलच रिसिव्ह झाला नाही. जनसंपर्क प्रमुख श्री. धोंड यांच्याशी संवाद साधला असता,करोनाच्या पार्श्वभूमीवर, मनस्थिती व परिस्थिती दोन्ही गंभीर असल्याकारणाने ते संवाद साधणारच नसल्याचे त्यांनी सांगितले.

प्र.कुलसचिव प्रा.नीरज खटी यांच्याशी संवाद साधला असता,उद्या किंवा परवा अतिशय साध्या पद्धतीने कुलगुरुंना निरोप देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. सध्या शहरात संचारबंदी सुरु आहे. कलम १४४ लागू असल्यामुळे ४ पेक्ष्ा अधिक माणसे एका ठिकाणी जमा होऊ शकत नाही.त्यामुळे सत्काराचा प्रश्‍नच उपस्थित होत नाही. कुलगुरु डॉ.काणे हे फक्त कार्यभार सोपविण्यापूरती विद्यापीठात येतील व अमरावतीचे कुलगुरु डॉ.मुरलीधर चांदेकर यांना रातूम विद्यापीठाचा कार्यभार त्यांना सोपवतील. अद्याप माझ्याकडेही कोणतीही अधिकृत माहिती अाली नसून उद्या मंगळवारी राज्यापालांसोबत महत्वाची बैठक असल्याकारणाने कदाचित परवा डॉ. काणे हे पदभार सोपवू शकतात,अशी माहिती डॉ.खटी यांनी दिली. सध्यातरी कुलगुरु हे फक्त ई-मेल किवा व्हाॅट्स ॲपवरच सूचनांचे आदान-प्रदान करीत असल्याचे ते म्हणाले.

डॉ.काणे यांनी ७ मार्च २०१५ रोजी कुलगुरु पदाचा कार्यभार स्वीकारला होता.तत्पूर्वी ते काही काळ आयक्यूएसीचे संचालक म्हणून कार्यरत होते. त्याच काळात रातूम नागपूर विद्यापीठाला नॅकच्या मानांकनात ‘अ’श्रेणी प्राप्त झाली होती. डॉ.काणे यांनी काही काळ प्रभारी परीक्ष्ा नियंत्रक म्हणून देखील जवाबदारी पार पाडली. मूळात विद्यापीठाच्या स्टॅटीस्टीक विभागात प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले होते.

माजी रजिस्ट्रार डॉ.पूरणचंद्र मेश्राम यांनी कुलगुरुंच्या एकंदरीत कारकीर्द व त्यांचे विद्यापीठाला दिलेले योगदान याबाबत भरभरुन बोलताना डॉ.काणे यांनी विद्यापीठाच्या इतिहासात पहील्यांदा ख-या अर्थाने सोशल इंजिनिअरिंगची रुजवात केली असे ते म्हणाले.विद्यापीठाच्या हिताचा निर्णय घेताना डॉ.काणे यांनी कधीही जात,धर्म,वर्ग,पंथ बघितला नाही. दूसरा सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे त्यांनी विद्यापीठाला फक्त परीक्ष्ा घेणारी तांत्रिक संस्था या चौकटीतून बाहेर काढले व एक ‘सामाजिक चेहरा’ बहाल केला. मी रजिस्ट्रार असताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त अनेक प्रकल्प त्यांच्या मंजूरीसाठी त्यांच्या टेबलावर ठेवले. ते सर्व प्रकल्प त्यांनी फक्त मान्यच केले नाहीत तर त्यासाठीचे अनुदान आधीच अर्थ संकल्पात वेगळे काढून ठेवीत असे. मग ते अांतरराष्ट्रीय बुद्धिस्ट सेंटर असो, डॉ.आंबेडकर लॉ कॉलेजमध्ये संविधान प्रिॲम्बल पार्क असो,’राष्ट्रीय बांधणीमध्ये डॉ.आंबेडकरांचे योगदानाचा ७८० पानांचा ग्रंथ याच्या दहा हजार प्रति छापून आणण्यात आल्या ज्या दोन महिन्यात संपल्या.हा ग्रंथ पुन्हा प्रकाशित करण्यासाठी देखील त्यांनी अर्थ संकल्पात भरीव तजवीज केली.विद्यापीठाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारधारेच्या ग्रंथालयात विस्तीर्ण अश्‍या राष्टीय ग्रंथालयाला देखील डॉ.काणे यांनी त्वरीत मान्यता दिली.

डॉ.काणे यांच्याच काळात राष्ट्रीय अनुदान आयोगाची चमू विद्यापीठात आली असता रातूम नागपूर विद्यापीठाची कॅम्पस जवळील,अमरावती मार्गावरील प्रशस्त ईमारतीला देखील कुलगुरुंच्या प्रयत्नांमुळेच अनुदान मिळाले. जमनालाल बजाज यांच्या सहकार्याने व युजीसीच्या अनुदानातून विद्यापीठाची एक प्रशस्त व अत्याधूनिक,दिमाखदार ईमारत उभी होऊ शकली. जे काम शंभर वर्षात नाही होऊ शकले ते डॉ.काणे यांनी आपल्या खंबीर निर्णयक्ष् मतेतून फक्त ५ वर्षात करुन दाखवले. ही ऐतिहासिक ईमारात डॉ.काणेंच्या कर्तृत्वाची साक्ष् कायम देत राहील. कुलगुरु पद स्वीकारण्या पूर्वी विद्यापीठाची परिक्ष्ा पद्धती अतिशय विस्कळीत होती. परीक्ष्ा पद्धती सुचारु करण्याचे आव्हान कुलगुरुंनी लिलया पेलले व राज्यातील इतर विद्यापीठांसमोर आदर्श प्रस्थापित केला.

सर्वात महत्वाचे योगदान सांगावयाचे झाल्यास नवीन महाराष्ट्र विद्यापीठ कायदा हा राज्यात २०१६ पासून लागू झाला. अतिशय नवीन अश्‍या कायद्याची योग्य ती अंमलबजावणी कुलगुरु डॉ.काणे यांच्या काळातच विद्यापीठाला राबविता आली. या पुढील येणारे अन्य कुलगुरुंना डॉ.काणे यांनी घेतलेले निर्णय हे कायम मार्गदर्शकच ठरणार आहेत.कुलगुरु पदी विराजमान असताना अनेक आव्हाने आलीत मात्र डॉ.काणे हे नेहमी आपल्या पदाधि-यांसोबत सकारात्मक चर्चा घडवून आणीत असत. या चर्चेतून विद्यापीठाच्या हिताचे अनेक निर्णय सामुहिक पद्धतीने घेण्यात आले.आठ दिवसात विविध विभागांच्या १५ नवीन ईमारतींचे उद् घाटन हे देखील ऐतिहासिकच होते.टाईम बॉण्ड प्रोग्राम व प्रकल्पांसाठी आधीच अर्थ संकल्पात नियोजन हे डॉ.काणे यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ठ होते,असे डॉ.मेश्राम सांगतात.

थोडक््यात ‘करोना’या विषाणूनी जगभर घातलेल्या थैमानात,विद्यापीठाच्या दीक्ष्ांत सभागृहाच्या भिंतींना कुलगुरु डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्या भावपूर्ण निरोप समारंभांचा क्ष् णही आता अनुभवता येणार नाही. आपल्या प्रदीर्घ कालावधीत कुलगुरुंना अनेकांचे मिळालेले सहकार्य,सहयोगी पदाधिकारी,कर्मचारी यांच्यासाठी आभाराचे दोन शब्द किवा माध्यम प्रतिनिधींशी साधला जाणारा संवाद याला मात्र विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच गालबोट लागले. निवृत्तीचा असा क्ष् ण आजवर कोणाच्याही वाटेला आला नाही,करोनाने जगाच्या,देशाच्या अर्थ व्यवस्थेसोबतच रातूम नागपूर विद्यापीठाच्या प्रशासकीय परंपरेवर देखील कसे संकट निर्माण केले,याचीच चर्चा आज शहराच्या शैक्ष् णिक वर्तुळात रंगली होती.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या