Homeनागपूर मनपागंभीर समस्या दिव्यांगांची...हेल्प लाईन कोणत्या कामाची?

गंभीर समस्या दिव्यांगांची…हेल्प लाईन कोणत्या कामाची?

 मनपातर्फे अपंग कल्याण आयुक्तालयाच्या आदेशांची फक्त खानापूर्ती

नागपूर:संचारबंदीच्या काळात दिव्यांगासाठी घरपोच राशन दय्ावे, त्यांचे मानधन देण्यात यावे आणि दिव्यांगांसाठी या काळात स्वतंत्र हेल्पलाईन सुरु करावी,असे अपंग कल्याण आयुक्तालयाचे आदेश असताना नागपूर महानगरपालिकेच्या प्रशासनातर्फे दिव्यांगांसाठी फक्त हेल्प लाईन सेवा सुरु केली.ही सेवा शनिवार ता.४ मार्च पासून सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सुरु असणार आहे मात्र या हेल्पलाईनसेवेचा कोणताही लाभ नागपूरातील दिव्यांगांना होत नसून कोणत्या दूकानातून, रेशन,औषधे,भाजीपाला घ्यावा तसेच कोणत्या स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी एवढीच माहिती दिव्यांगाना दिली जात असल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे.

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिव्यांगाच्या मदती हेतू संपर्क अधिकारी म्हणून अभिजित राऊत यांची नेमणूक केली आहे. राऊत यांच्याकडून माहिती घेतली असता,रेशन दूकानातून दिव्यांगाना गहूं,तांदूळ आदींचा पुरवठा केला जात असल्याचे सांगितले. नागपूर मनपा ही महाराष्ट्रातील पहीली स्थानिक स्वराज्य संस्था आहे जिने तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांगासाठी हेल्पलाईन सेवा सुर केली असल्याचा टेंभा ही त्यांनी मिरवला मात्र या सेवेमधून दिव्यांगाना नेमकी कोणती सेवा पुरविली जात आहे? किवा फक्त अमूक दूकानांमधून अमूक वस्तू,औषधे किवा भाजी घ्या असा सल्ला पुरविल्या जात आहे?याचे कोणतेही उत्तर त्यांनी दिले नाही.

मनपा प्रशासन सातत्याने दिव्यांगांसाठी विविध योजना राबवित असते असे राऊत यांनी सांगितले यात उदहनिर्वाहसाठी ई-रिक्शा पुरिवण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला मात्र संचारबंदीच्या काळात दिव्यांगांचे ई-रिक्शा देखील अंगणात उभे आहेत,अश्‍यावेळी दोन वेळेच्या खाण्याची भ्रांत निर्माण झाली असताना,मनपा प्रशासनाने तातडीने एकूण कल्याणकारी योजनेतील जो ५ टक्के निधी दिव्यांगांसाठी राखीव ठेवला आहे जो मनपा प्रशानाकडे या वर्षीचा अखर्चित पडला आहे, त्याती दोन हजार रुपये तातडीने दिव्यांगांच्या खात्यात जमा करण्याची मागणी विदर्भ विकलांग संघर्ष समितीतर्फे करण्यात आली आहे.शेवटी मनपा प्रशासन ज्या रेशन दूकानातून दिव्यांगाना स्वस्त दरात गहूं आणि तांदूळ पुरविते ते विकत आणायाल देखील पैशांची गरज असते,असे संस्थेचे अध्यक्ष् गिरीधर भजभुजे यांनी खास ‘सत्ताधीश’ला सांगितले.

साबण,औषधे,तेल,तिखट,मीठ, पेस्ट,दळण ,भाजी आणायला हातात नगदी पैसा असेल तरच दिव्यांग व्यक्तिी ही घरातील इतर कोणालातरी दूकानात पाठवून जीवनावश्‍यक वस्तू मागवू शकतील. मात्र मुंढे यांनी फक्त हेल्प लाईन सेवा सुरु करुन दिव्यांगांची क्रूर थट्टा सुरु केल्याचा आरोप कोषाध्यक्ष् नरेंद्र सोनडवले यांनी केला.

दिव्यांगाची परिस्थिती ही अतिशय गंभीर झाली असून सरकार आणि सामाजिक न्याय खाते ठोस उपाययोजना करण्या ऐवजी केवळ पोकळ घोषणा करतेय,दिव्यांगांपर्यंत कोणतीही योजना पोहोचत नसल्याचे त्यांनी सांगितले.दिव्यांगांच्या पोटापाण्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला असताना संचारबंदीमुळे रस्त्यावर येऊन भीक मागण्याचाही मार्ग त्यांच्यासमोर उरला नसल्याची वेदना त्यांनी बोलून दाखवली.दिव्यांग कल्याण निधी या आणिबाणिच्या काळात तात्काळ दिव्यांगांच्या खात्यात जमा करण्याची तसेच पुढील तीन महिन्याचे राशन त्यांना तात्काळ देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली.

आयुक्त देतात फक्त नंबर पे नंबर….

या करोनाच्या त्रासदीमध्ये मनपा आयुक्तांनी दिव्यांगाना दिलासा देण्याऐवजी दिला तो फक्त एक नंबर ०७१२-२५६७०१९,हा नंबर सतत व्यस्त असतो. या नंबरवर संपर्क केल्यास फक्त सूचना  आणि सल्ला मिळतो.राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्यमंत्री धनंजय मुुंडे यांनी दिव्यांगाना घरपोच रेशन दिले जाईल,अशी घोषणा केली आहे.आगाऊ मानधन,आरोग्य किट,वैद्यकीय सुविधा दिल्या जातील तसेच प्रत्येक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष्ात दिव्यांगांसाठी टोल फ्रि कमांकाची हेल्पलाईन सुविधा सुरु करण्याचे आदेश २६ मार्च रोजी देण्यात आले.या आदेशाची अंमलबजावणी नागपूरात ४ एप्रिल रोजी सुरु झाली हे विशेष! यातही टोल फ्री क्र न देता लॅण्ड लाईन क्रमांक देण्यात आला.

मूकबघिरांची आयुक्तांनी केलेली ही क्रूर थट्टाच असल्याचा संताप संस्थेचे अध्यक्ष् भजभुजे यांनी व्यक्त केला.मोबाईल क्रमांक दिला असता तर मूक-बधिरांनाही या क्रमांकाचा लाभ झाला असता. लॅण्ड लाईनवर मूक-बधिर कसा बोलणार?हे आता आयएएस असणारे मुंढे यांनीच सांगावे,असे ते म्हणाले.

करोनामुळे देशभरात लॉक डाऊन आणि संचारबंदी लागू झाली असताना,या काळात जिवनावश्‍यक वस्तूंची दूकाने उघडली असताना,दिव्यांगांना याचा लाभ तेव्हाच घेता येईल जेव्हा त्याच्या घरातील इतर कोणी व्यक्ति पैसे घेऊन दूकानात जाईल. निदान मनपा प्रशासनाने २१ दिवस पुरेल इतके रेशन तरी दिव्यांगाना उपलब्ध करुन द्यावे. तीव्र दिव्यांगांना आरोग्यविषयक काळजी घेण्यासाठी सॅनेटायझर,मास्क,रुमाल,डॅटोल,फिनाईल इ.साहित्य स्थानिक प्रशासनाने राखवी अपंग निधीतून पुरविण्याची मागणी त्यांनी केली. करोनासारख्या संसर्गजन्य काळात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने स्थानिक प्रशासनाला दिव्यांगांना ‘जगवण्यासाठी’ तातडीने पावले उचलण्याचे आदेश द्यावे,अशी मागणी त्यांनी केली.नागपूर महानगपालिकेने पैठणच्या नगरपालिकेकडून दिव्यांगांची मदत कशी करतात?याचा आदर्श घेण्याचा टोला देखील भजभुजे यांनी मुंढे यांना हाणला.

Latest बातम्या