

नागपूर: शहरातील बार वाईन शॉप क्लब आणि पब 31 मार्च पर्यंत बंद राहणार आहेत कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने हा निर्णय आज घेतल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले. कलम 144 लागू झाल्यानंतरही लोक पाच पेक्षा जास्त संख्येने एकत्र येत आहे हे चुकीचे आहे त्यामुळे लोकांमध्ये सामाजिक अंतर सुरक्षित राखण्यास प्रशासनाला अडचणी येत आहेत लोकांनी काम नसताना घरीच थांबले पाहिजे पण याचा अवलंब होत असताना दिसत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली लोकांनी कुठल्याही ठिकाणी गर्दी करू नये म्हणून बार वाईन शॉप क्लब आणि पब बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे जिल्हाधिकारी ठाकरे म्हणाले.
लोकांनी स्वतः परिस्थितीचे गांभीर्य ओळखून घरीच राहायचे आणि ठराविक वेळाने हात धुण्यास सह सर्व खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. करोनाशी तेव्हाच आपण यशस्वीपणे लढा देऊ शकू. आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांना सुद्धा बंदी घालण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. रवींद्र ठाकरे म्हणाले की लोकांना जिल्हाधिकारी कार्यालयात येण्यास बंदी जरी घातली असली तरी त्यांची कामे खोळंबून जाणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाणार आहे.
लोकांनी आपले म्हणणे, तक्रारी कार्यालयाच्या ईमेल आयडीवर पाठवाव्यात याशिवाय कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाला फोन वरून कळवाव्या प्रत्येक तक्रारीची दखल घेऊन कार्यवाही केली जाईल खबरदारी हाच त्याचा इलाज असल्याचे ते म्हणाले याचे भान ठेवून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे नाहीतर जगातल्या काही देशात करोनाचा अनुभव लोकांनी घेतला आहे तोच आपल्याही वाट्याला येण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे असे आव्हान जिल्हाधिकारी यांनी केले.
बऱ्याच प्रमाणात नागरिकांचे सहकार्य प्रशासनाला मिळू लागले आहे. उद्या आयोजित असलेले लग्नसोहळे लोकांनी सामंजस्याची भूमिका घेऊन पुढे ढकलले तर काही परिवारांनी नातेवाईकांना एकत्रित न करता अगदी साध्या पद्धतीने घरच्या घरी लग्नकार्य करण्याचे ठरवले आहे, ही अतिशय अभिनंदनीय बाब आहे करोना विषाणूने बाधित एकही व्यक्ती चुकीने शहरात फिरला तर अनेकांचा जीव धोक्यात येणार आहे. त्यामुळे एकत्र येणे आणि गर्दी करणे प्रत्येक नागरिकाने टाळावे असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी जनतेला केले




आमचे चॅनल subscribe करा
