
आभा पांडे यांनी काढले प्रशासनाचे वाभाडे:महापौरांचे चौकशीचे आदेश
नागपूर: महिला तसेच मुलांच्या समुपदेशनासाठी महापालिकेने झोनस्तरावर दहा समुपदेशन केंद्र सुरु केले होते मात्र मनपाच्या पैशांवर पोसल्या जाणा-या या केंद्रावर कोणतेही नियंत्रण नाही,या समुदपेशन केंद्रांच्या त्रैमासिक अहावालात बरीच तफावत असल्याचा आरोप ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे यांनी मनपाच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी केला.विशेष म्हणजे शहरातील गरीब आणि गरजू जनतेसाठी अत्यंत उपयोगी असणारा ‘फायलेरिया’सारखा विभाग हा कोंडवाड्यात असून सतरंजीपुरा येथील समुपदेशन केंद्र मात्र छान एसी आणि कूलरची हवा घेत असल्याचा घणाघात त्यानी काल सभेत केला.
प्रशासनाने शहरातील दहा झोनमध्ये हे समुपदेशन केंद्र योग्यरित्या काम करतात आहे की नाही, करारात नमूद केल्याप्रमाणे अटी शर्थींची पूर्तता होत आहे की नाही,प्रशासन याची काेणतीही दखल घेत नसल्याचे त्या म्हणाल्या. ३१ अॉक्टोबर २०१२ पासून हे समुपदेशन केंद्र सुरु झाले. हे केंद्र २०१५-१६ पर्यंत कार्यान्वित होते. २०१८ मध्ये पुन्हा एका वर्षासाठी मुदतवाढ प्रदान करण्यात आली मात्र या केंद्रांनी आपला त्रैवार्षिक अहवाल समाज कल्याण विभागामध्ये जमा केला त्यात अनेक त्रूट्या आणि तफावती आढळल्या.

किती महिलांचे या एवढ्या वर्षात समुपदेशन झाले?किती महिलांवर अत्याचारासंबधी समुपदेशन केले?खाजगीपणाचे कारण देऊन मला याची माहिती ही पुरविण्यात आली नसल्याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष् वेधले. मी देखील एक जनप्रतिनिधी आहे.मला आपल्या जवाबदारीची जाणीव जनप्रतिनिधी आणि एक महिला म्हणूनही आहे तरी देखील मला माहिती पुरविण्यात आली नाही.एका वर्षासाठी देण्यात आलेली मुदतवाढ दर वर्षी वाढवण्यात आली,यामागील कारण त्यांचे कार्य योग्य आहे असे सांगितले जाते मात्र याचा कोणताची पुरावा दिला जात नाही.या केंद्रांना त्यांचा.त्रैमासिक अहवाल मनपाच्या स्थायी समितीला देणे बंधनकारक असताना समितीकडून देखील कोणतीही दखल घेण्यात आली नाही,या मागील कारण काय?
अहवालात फक्त आकडे देण्यात आले आहेत.एकूण प्रकरण.किती, न्यायासाठी पाठवलेले किती,प्रलंबित किती,सल्ला व मार्गदर्शनासाठी अालेले किती,फक्त संख्या नमूद आहे.विशेष म्हणजे ही माहिती खरी की खोटी याची पडताळणी कोण करणार?असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
प्रशासनाचे काम हलगर्जी करण्याचे आहे का?महत्वाचे म्हणजे या केंद्रासोबत करण्यात आलेल्या करारात,अटी व शर्थीमध्ये दूरध्वनी व वीजबिल चे भूगतान संस्थेलाच करावे लागणार असल्याचे नमूद आहे मात्र एवढ्या वर्षात एकाही संस्थेने हे बिल भरले नसल्याच्या वास्तवाकडे आभा पांडे यांनी सभागृहाचे लक्ष् वेधले.यावर प्रशासनाने माहिती देण्याची विनंती त्यांनी महापौरांना केली. महापौरांनी प्रशासनाला माहिती देण्याचे निर्देश दिले असता प्रशासनाने याची माहिती नसल्याचे सांगितले!
यावर संतापून आभा पांडे यांनी माझ्याकडे माहिती असल्याचे सांगितले.यासाठी कोणकोणते अधिकारी जवाबदार आहे त्यांच्यावर जवाबदारी निश्चित व्हावी अशी मागणी त्यांनी केली.
एका समुपदेशन केंद्राला वर्षाला ३ लाख ३० हजार रुपयांचे भूगतान महापालिका करते याचा अर्थ दहा समुपदेशन केद्रांना ३३ लाख ६० हजार रुपये महापालिकेतून भूगतान केली जातात.ही केंद्रे महापालिकेकडून पैसे घेत गेली मात्र प्रशासनात एकाही अधिका-याने याची पडताळणी केली नसल्याचे त्यांनी सांगितले.या सर्व केंद्रात ‘गजब का कारभार’चालत असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.
सभागृहात ही नोटीस लावण्याच्या एका रात्री पूर्वी रात्री ११ वा.या केंद्रात दूरध्वनी लावला कारण माझ्याकडे एका सूनेची तक्रार आली होती जिच्या सासूने तिच्यावर शारिरीक हल्ला केला होता.अटी आणि शर्थीमध्ये दिवसाला आठ तास समुपदेशन केद्रात तर २४ तास दूरध्वनीवर उपलब्ध राहण्याची अट असताना एका गरजू महिलेला वेळेवर योग्य समुपदेशन रात्रीच्या ११ वा.मिळाले नसल्याकडे आभा पांडे यांनी सभागृहाचे लक्ष् वेधले.जर त्या सुनेनी जीवाचे काही बरे वाईट केले असते तर याला जवाबदार ही समुपदेशन केंद्रे राहीली नसती का?फूकटचं केंद्रातर्फे मग महिला अत्याचारांवरील समुपदेशनाच्या गोष्टी का केल्या जातात?असा संताप त्यांनी व्यक्त केला.
समुदेशन केंद्रांच्या निर्मितीचा उद्देश्य हा अत्यंत चांगला असला तरी शहरातील महिलांना खरेच या केंद्रात समुपदेशनाचा लाभ मिळतोय का?एकंदरीत समुपदेशन केंद्राच्या एकूण कार्यप्रणालीवर बोट ठेऊन त्यांनी आयुक्तांकडून चौकशीची मागणी केली यावर महापौर संदीप जोशी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे तसेच अहवाल सभागृहात ठेवण्याचे निर्देश दिले.
दहनघाटातील शोकसभागृह देखील पालकतत्वावर संस्थेला!
उन्नती फाऊंडेशनला गंगाबाई घाट शोक सभागृह देण्यात येण्यासंबधीचा प्रस्ताव जो आज सभागृहात आला आहे,त्या संस्थेचा कारभार देखील याच केंद्रांसारखा राहणार नाही याची हमी कोण देईल?या शोक सभागृहाचे कोणतेही शुल्क हे फाऊंडेशन घेणार नाही,सभागृह व्यतीरिक्त परिसरातील जागेचा उपयोग करणार नाही,शोक सभागृहाचा गैर वापर करणार नाही,शोकसभागृहाच्या नूतनीकरणासाठी २२ लक्ष् ५३ हजार १०१ रुपयेांचा खर्च उन्नती फाऊंडेशन कोणत्या हेतूने स्वत: वहन करण्यासाठी उत्सूक आहे?हे शोकसभागृह या किवा इतर कोणत्याही संस्थेला पालकतत्वावर देण्याऐवजी मनपाच या शोकसभागृहाचे नूतनीकरण करण्यास सक्ष् म नाही का?मूळात हे शोकसभागृह या संस्थेला देण्यापूर्वी शहरातील इतर संस्थांना संधी दिली होती का?याची वृत्तपत्रात जाहीरात काढली होती का?
अश्या प्रश्नांची सरबत्ती करुन आभा पांडे यांनी गंगाबाई घाट शोक सभागृह ५ वर्षांसाठी पालकतत्वावर चालवण्यासाठी उन्नती फाऊंडेशनला देण्यास प्रखर विरोध दर्शवला.
.




आमचे चॅनल subscribe करा
