
मनपाच्या इतिहासात घडला नवा इतिहास
नागपूर: महापालिकेच्या इतिहासात पहील्यांदा नवा इतिहास घडला! आयुक्तांच्या भेटीला शिष्टमंडळाच्या ऐवजी संपूर्ण सत्ता पक्षच महापालिकेत पोहोचला. मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता सत्तापक्ष आयुक्तांच्या भेटीला गेला असता आयुक्तांनी आधी दहा मिनिटांचा अवधी सत्ता पक्षाला दिला होता यांनतर त्यांनी पंधरा मिनिटांचा अवधी केला. यावरच आक्ष्ेप नोंदवित सत्ता पक्ष् नेते संदीप जाधव यांनी आयुक्तांना धारेवर धरले. सत्ता पक्षाचे १०८ सदस्य असताना फक्त पंधरा मिनिटात बोलणे होणार आहे का? यावर आयुक्तांनी भेटीची ‘पद्धत’सत्तापक्षाला शिकवताना,साधारणत: आयुक्तांच्या भेटीसाठी ‘शिष्टमंडळ’येत असतं असे म्हणाले. यावर संदीप जाधव यांनी आयुक्तांना ‘तुम्हाला माहिती होतं शिष्टमंडळ नाही संपूर्ण सदस्य येणार आहेत तरी तुमही बसण्याची व्यवस्था केली नाही,असा आक्ष्ेप नोंदवला.यावर पुन्हा आयुक्तांनी या सभागृहात २०-२२ खूरर्च्या आहेत,शिष्टमंडळ धेऊन आले असते तर एवढ्या खूरर्च्या पर्याप्त होत्या,असे उत्तर दिलेे. यावर पुन्हा संदीप जाधव यांनी मनपा मुख्यालयात पंजाबराव देशमुख सभागृहात संपूर्ण सदस्य मावले असते तुम्ही तिथे देखील भेट देण्यास नकार दिला.नागपूर मनपाच्या इतिहासात हे पहील्यांदा घडले,सत्ता पक्षाला अशी वागणूक मिळाली असल्याचे ते म्हणाले.
मला शिष्टमंडळ अपेक्षित होतं,प्रतिनिधी मंडळासोबत चर्चा केली असती,असे आयुक्त म्हणाले.तुम्ही नगरसवेकांना भेटीची वेळच देत नसल्याचा आरोप संदीप जाधव यांनी केला म्हणून आम्ही एकत्रित आलो,असो खुलासा त्यांनी केला.तुम्ही ‘जनता दरबार’साठी तासिका ठरवली तशी किमान नगरसेवकांच्या भेटीसाठी का ठरविली नाही?असा प्रश्न केला.माजी महापौर प्रवीण दटके यांनी देखील आयुक्तांना धारेवर धरत,बाहेर चर्चा आहे तुम्ही कामे थांबवली.जी आवश्यक कामे आहेत जी विभागाकडून आम्हाला परवानगी मिळाली ती कामे तुम्ही थांबवलीत. आता कर्मचार-यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये पैसेच नाहीत हे कारण गैरलागू आहे,यात प्रशासनाची चूक आहे.नगरसेवकांची नाही.जे आवश्यक प्रकल्प आहेत ते ही तुम्ही थांबवले. जे चुकीचे असतील ते तुम्ही निश्चित थांबवा मात्र कमीत कमी प्रकल्पांना प्रत्यक्ष् भेट तर द्या. नगरसेवकांंनी काढलेली कामे समजून घ्या.त्या विकास कामांच्या ‘नसत्या’ तयार झाल्या आहेत ते ही तुम्ही थांवबले.आपल्या स्वाक्ष् री साठी कामे खोळंबलीत असल्याचे दटके म्हणाले.
शहराची जनता ही स्वत:खूप हूशार आहे. पारदर्शक कामे जनतेला कळतात. सोशल मिडीयामुळे जनतेला प्रत्येक घडोमाेडीची माहिती असते. निधी नाही हे कारण योग्य नाही. आयुक्तांनी मनपातील प्रशासकीय अधिका-यांशी चर्चा करावी, स्थायी समिती अध्यक्ष्ांची चर्चा करावी,अशी विनंती करायला आलो असल्याचे सांगितले.
यावर आयुक्तांनी पुन्हा तीच भूमिका स्पष्ट करत,ज्या कामांचे वर्क ऑर्डर नाही निघाले किवा ज्यांचे वर्क ऑर्डर निघाले मात्र कामे सुरु झाली नाही अशीच कामे थांबवली असल्याचे सांगितले,कारण मनपाकडे पैसाच नाही.मागील अनेक बिल हे पेंडिंग आहेत त्यांचाही चूकारा करणे गरजेचे आहे. वेळोवेळी भविष्य निर्वाह निधीचा पैसा भरल्या गेला असता तर विश्वासहर्ता राहीली असती,अश्या कठोर शब्दात आयुक्तांनी स्पष्टीकरण दिले. तुमच्यामुळे भविष्य निर्वाह निधीचा घोळ झाला,असे वक्तव्य मी कधीही केले नसल्याचे त्यांनी सांगितले. यावर दटके यांनी विकास कामे थांबवणे योग्य नसल्याचे म्हटले.यावर मुंडे यांनी, माझी विश्वासहर्ता मी अव्हेरु शकत नाही,मनपा कर्मचायांच्या भविष्य निर्वाह निधीत जवळपास पावणे दोनशे कोटी मनपाला भरणे क्रमप्राप्त असल्याचे सांगितले.
‘माझ्याकडे पैसे असते तर भुगतान केले असते नसतील तर होणार नाही,’असे मुंडे यांनी खडे बोल सत्ताधारी यांंना सुनावले.
यंदाचे बजेट हे देखील १८०० कोटींचा असणार असल्याचा सूतोवाच मुंडेंनी केला. सत्ताधा-यांची अपेक्ष्ा २४०० कोटींची असली तरी ते शक्य नसल्याचे मुंडे यांनी सांगितले. गेल्या पाच वर्षांचा मी अभ्यास केला आहे. यावर दटके यांनी ‘जी कामे सुरु झाली त्याचे काय?हा प्रतिप्रश्न केला.यावर आयुक्तांनी ‘मी तुम्हाला जी आर्थिक परिस्थिती आहे ती सांगितली’यावर संदीप जाधव यांनी मालमत्ता वाढवण्याची जवाबदारी ही मनपाचीच आहे याची जाणीव करुन दिली. मुंडे यांनी ‘करु ना’असे उत्तर दिले.
आयुक्तांवर हल्ला बोल करताना नगरसेवकांनी खासदार निधी,मुख्यमंत्र्यांच्या निधीतून होणारी कामे देखील कोणत्या अधिकाराने थांबवली असा प्रश्न उपस्थित केला.यावर मुंडे यांनी ‘मी दररोज आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतोय’असे उत्तर देताच दटके यांनी ‘किती दिवस लागतील?’अशी विचारणा केली. ‘३१ मार्च’असे उत्तर आयुक्तांनी दिले.इंग्रजी शाळांसाठीच्या योजनेवर देखील आयुक्तांनी फूली मारली असल्याचा आक्ष्ेप नगरसेवकांनी नोंदवताच आयुक्त हे ‘फक्त इंग्रजी कशाला मी सीबीएसीसाठी प्रयत्न करतोय’असे उत्तर दिले,यावर ’हे कधी सांगणार?’असे नगरसेवक म्हणाले.जनतेला आम्हाला उत्तर द्यावी लागतात असा टोला ही हाणला.
यावर दटके यांनी सर्वात महत्वाची समस्या आहे ती आयुक्त हे समन्वयच ठेवीत नसल्याचे सांगितले. ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी एलबीटीचा मुद्दा उपस्थित करीत, सभागृहात निगम सचिव यांनी आश्वासन दिले होते,एलबीटी लागू होणार नाही, आमच्यासाठी ते पद मोठे आहे, व्यक्ति नाही,निगम सचिव यांनी सभागृहाला दिलेला शब्द हा पाळलाच पाहीजे,असे ठणकावले.नगरसेवक जनतेमध्ये जाऊन काय सांगणार?आमची जवाबदारी फक्त पगार देण्याची आहे, विकास कामांची नाही,असे सांगणार का?पूर्वीचे आयुक्त हे स्वत: दीड फूट नाल्यात उतरुन पाहणी करीत होते,स्वत:पाहणी करुन काम संमत करीत होते. संवाद सुरु झाल्यास तर या गोष्टी घडू शकतील.अनेकसी कामांचे भूमीपूजन झाले,आता नगरसेवक कोणता चेहरा घेऊन मतदारांसमोर जातील?असा प्रश्न त्यांनी विचारला. नगरसेवक ही विकास कामे स्वत:साठी करीत नसून शेवटी जनतेसाठीच करीत आहेत.जी कामे गरजेची आहेत वाटल्यास त्याचा तपशील फोटोंसह मिळवा,असा सल्ला देखील दयाशंकर तिवारी यांनी दिला.सीवर,ड्रेनेज,नाले,रस्ते यांची ही कामे तुम्ही थांववली.नगरसेवकांनी प्रशासकीय अधिका-यांसोबत गल्लोगल्ली फिरुन कामे संमत करुन घेतली,ही आता त्यांचीच अवमानना करणारी बाब ठरेल.पाच नाही तुम्ही मागच्या पंधरा वर्षांचा अहवाल मागवा,तुम्ही या पूर्वी देखील आयुक्त पद भूषवले आहे तुम्हाला सगळ कळतं,असा टोला दयाशंकर तिवारी यांनी हाणला.हे ‘नाशिक पॅटर्न’काय आहे, कोणत्याही अधिकारी याला कोणतीही बाब विचारली असता ‘या कामाला नाशिक पॅटर्न’मध्ये पाठवण्याचा तुम्ही त्यांना सांगितले असल्याचे आम्हाला कळाले आहे,याचा खुलासा ही त्यांनी मागितली.
शेवटी आयुक्तांनी भेटण्यासाठी दिलेली पंधरा मिनिटांची वेळ ही संपली असून आता आयुक्तांनीच काय ते स्पष्टीकरण द्याचे असे दटसके म्हणाले.यावर आयुक्तांनी ‘मी योग्य-अयोग्य,अावश्यक-अनावश्यक,चांगले-चुकीचे अशी कोणतेही वक्तव्य केले नसल्याचे सांगितले. फक्त विश्वासहर्ताची दखल घेतली. पैसे किती?त्याचा ताळमेळ कसा बसवावा,हेच मी पाहीले. संपूर्ण कामे मी थांबवली नाहीत.मनपाला या वर्षी आणि गेल्या वर्षी देखील अपेक्ष्ति उत्पन्न मिळाले नाही. पाणी,वीज कुठेच बंद केली नाही.उत्पन्न वाढवणे यालाच प्राधान्यक्रम दिला.यात कोणताही गोंधळ नाही. यावर ‘गोंधळ येथे आहे,यावरच चर्चा करावी,सहयोगानेच मनपा समोर जाईल,अडचणी निर्माण होत असतील तर याचा दुष्परिणाम मनपावर होईल,असं आमचं मत असल्याचे स्पष्ट केले.
यानंतर आयुक्तांनी त्यांच्या कक्ष्ाचा रस्ता घरला आणि निघून गेले.
पोलीसांना बाहेर थांबवा-
अविश्वासाची गोष्ट न करता विश्वासाची गोष्ट करण्याचा सल्ला सत्तापक्ष्ाने आयुक्तांना देत, आधी आयुक्तांच्या भोवती पेालीस कर्मींचा जो गराडा आहे त्यांना बाहेर पाठवा,अशी मागणी केली.मनपा आणि प्रशासन हे एकाच गाडीची दोन चाके आहेत, मात्र आयुक्तांची संपूर्ण वर्तवणूक ही त्यांना प्रशासनाची कामे करताना ‘दुस-या चाकाचे कामच नाही’अशी असल्याचे संदीप जाधव म्हणाले. हे माझे मत बिल्कूल नाही तर जनतेमध्येच आयुक्तांंची प्रतिमा अशी झाली असल्याचे आरोप त्यांनी केला. सुरवातीला आयुक्तांच्या कक्ष्ाच्या प्रवेश दारावरच नगरसेवकांना सुरक्ष्ा रक्ष् कांनी थांबवताच एकच हलकल्ळोेल झाला. सत्ता पक्ष् नगरसेवकांनी सुरक्ष्ेसाठी तैनात पोलीस कर्मींची बाचाबाची ही केली. मनपाच्या इतिहासात अशी वर्तवणूक सत्तापक्ष्ाला मिळतेय,हे इतिहासात पहील्यांंदाज घडले असल्याचा आक्ष्ेप त्यांनी पहील्याच वाक्यात नोंदवला.




आमचे चॅनल subscribe करा
