
कहां है वो! महापौरांचे गूढ नागपूरांना कळलेच नाही
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर: महापौर संदीप जोशी यांचा अभिनव उपक्रम सोमवारी अंबाझरी येथील विवेकानंद स्मारकाजवळ पार पडणार होता मात्र महापौर हे वैयक्तिक कारणाने या उपक्रमाला उपस्थित राहू न शकल्याने तरुणाईचा चांगलाच हिरमोड झाला. विवेकानंद स्मारकामागे खास तरुणाईसाठी अभिनव असं गूढ दडलं असल्याचे वृत्त वाचून तरुणाई तसेच अनेक नागरिकांची उत्सुकता चांगलीच ताणल्या गेली होती मात्र महापौर उपस्थित न राहील्याने आयोजन स्थळी उपस्थित मान्यवरांनी ही काढता पाय घेतला व ‘नया है वह....’च्या ऐवजी ‘कहां है वह’म्हणत तरुणाई देखील आपापल्या बाईकवर बसून निघून गेली.
खास ‘वेलेंटाईन’चा मुहुर्त साधून महापालिकेनी विवेकानंद स्मारकाजवळ ‘माय हार्ट माय नागपूर’या इंग्रजीत लिहलेल्या शब्दांचा ‘सेल्फी पॉईंट’तरुणाईसाठी उपलब्ध करुन दिला आणि तरुणाईला सुखद धक्का बसला.मात्र हा फक्त ‘सेल्फी पॉईंट’ नसून यामागे काही तरी दडले आहे,ते नेमके काय याची घोषणा महापौर संदीप जोशी सोमवारी करणार होते मात्र त्यांच्या अनुपस्थितीमुळे तरुणाईचा चांगलाच हिरमोड झाला.हा आकर्षक सेल्फी पॉईंट निर्माण केल्यावर तरुणाईला अपेक्षा होती याहून खूप काही चांगलं आज महापौर त्यांच्यासाठी उद् घाटित करणार आहेत मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली. ‘कहां है वह’जिसके लिये आये थे,असे म्हणत आपापला रस्ता शेवटी तरुणाईने धरला.
आरजे व ज्येष्ठ नागरिकामध्ये रंगला वैचारिक वाद-
खास तरुणाईसाठी महापालिकेने झाडून शहरातले सर्व ‘आरजे’ यांना या सेल्फी पॉईटवर उपक्रमासाठी निमंत्रण दिले.
तरुण आरजे हे तरुणाईमध्ये ‘माहोल’निर्माण करण्यासाठी दोन तास झटत होते. यातच एका आरजेेनी नागपूर महापालिकेतर्फे सर्वात पहीला सिमेंट रस्ता कोणता निर्माण केला?असा प्रश्न विचारला,एका तरुणाने उत्तर दिले ‘माझ्या घरचा जवळचा!‘एका नागरिकाने सांगितले ‘रामनगर ते शंकरनगर’ आणि लगेच या आरजेने त्याचे उत्तर मान्य करुन हातातील भेटवस्तू त्याला दिली मात्र तिथे उपस्थित ज्येष्ठ नागरिक श्रीकृष्ण मोरोणे यांनी आरजेला सांगितले या शहरात सर्वात पहीला सिमेंट रस्ता हा १९५८ साली कॉटन मार्केट गणपती मंदिराजवळ बांधल्या गेला होता,तेव्हा आरजे हिने मनपाच्या पुस्तकात जे उत्तर दिले तेच खरे असल्याचे सांगून या ‘काकांना’उडवून लावले तेव्हा काकांचा पारा चांगलाच चढला, १९५८ साली रामनगर किंवा शंकरनगर ही वस्तीतरी अस्तित्वात होती का?असा प्रतिप्रश्न केला.कशाला छापता चुकीचे मनपावाले पुस्तकात? आरजेने पुन्हा ‘काकांना’मनपाच्या फेसबूकवर हेच उत्तर बरोबर असल्याचे सांगितले असता,अहो,सुधरवा त्यावरील माहिती असे काकांनी सुनावले.तेव्हा आठाणे लागायचे मी १५ वर्षाचा होतो, आठवीत शिकत होतो,मला खोटे ठरवू नका असा दम दिला! दूसरी आरजे’ हिने नागपूर स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर थूंकणे बंद करणार का?असा तरुणाईला प्रश्न करताच ‘काकांचा’पारा पुन्हा चढला, आता मोठे झाल्यावर काय विचारताय?वय वर्षे १ ते ८ हेच अनुकरणीय असते,बापच जर मुलासमारे सिगारेट ओेढत असेल तर मुलगा पिणारच ना!रस्तयावर थूंकत असेल तर मुले ही तसेच वागतात! याच वयातील सर्व गोष्टी लक्षात राहतात,नाही तर काल भाजी कोणती खालली हे तरी मुलांच्या लक्षात राहते का? काकांचे हे तेवर बघून बिचारी आरजे मग उजव्या बाजूच्या प्रेक्ष् कांकडे फिरकलीच नाही!
विवेकानंद गॅलरी प्रेक्षकांसाठी बंदच-
शहरातील मध्य भागी कुटुंबासाठी छान पिकनिक स्पॉट ठरलेले स्वामी विवेकानंद स्मारक हे त्यांच्या गॅलरीशिवाय अर्धवट वाटत असल्याची प्रतिक्रिया खास ‘सत्ताधीश’कडे काही प्रेक्ष् कांनी दिली. दहा रुपये तिकीट ठेवले असताना स्मारकाखालील गॅलरीचा एवढा गाजावाजा करुन उद् घाटित करण्यात आलेली गॅलरी एवढ्या लवकर बंद करण्यात आली असता अनेकांनी नाराजी व्यक्त केली. लहान मुलांना प्रेरणादायी तसेही दाखण्यासारखे आहेच काय मग या शहरात?फक्त पुतळा?
येथील व्यवस्था सांभाळणारे कंत्राटदार नाना घोटमारे यांना याविषयी विचारले असता सततच्या पाण्याच्या मा-यामुळे संपूर्ण भिंती खराब होऊन पोपडे निघाले आहेत.लवकरच याची डागडूजी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र दूसरीकडे कंत्राटदारांनी विवेकानंद स्मारकाचे सौंदर्य अबाधित राखण्याचे काम चोखपणेे पार पाडल्याचे दिसून पडते. झाडांची निगा राखायला माळी, सुरक्षा रक्ष् क,दर पंधरा दिवसांनी स्मारकाखालील शेवाळ जमलेल्या पाण्याची स्वच्छता,खाजगी कंत्राटदाराला दिल्यामुळेच प्रेक्ष् णीय राहल्याचे दिसून पडतं.मनपाकडे या स्मारकाच्या रखरखावचे काम असते तर शहरातील इतर बगिच्याप्रमाणेच या स्थळाची देखील दूर्दशा झाली असती,असे एका नागरिकाने सांगितले.दहा रुपये तिकीट असल्याने अवांछीत जोडपे आता या ठिकाणी फिरकतही नाही त्यामुळे कुटुंबासोबत काही क्ष् ण विरंगुळ्याचे निवांत घालवता येतात असे एका कुटुंबाने सांगितले.




आमचे चॅनल subscribe करा
