


‘जय जवान जय किसान’संघटना पुन्हा आंदोलनाच्या तयारीत
नागपूर,ता २७ जानेवरी २०२०: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शपथविधी झाल्यानंतर जनतेचा पैसा हा ज्या-ज्या प्रकल्पात लागला आहे त्याची संपूर्णपणे चौकशी करुन पैशांचा दुरुपयोग जर झाला असेल तर त्यावर ‘श्वेत पत्रिका’काढण्याचे आश्वासन राज्यातील जनतेला दिले होते. नागपूर महामेट्रोमध्ये २५०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार झाला असताना या प्रकल्पाची कोणतीही चौकशी न करता, प्रकल्पाचे उद् घाटन आपल्या हस्ते करणे म्हणजे हा महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात असून ‘जय जवान जय किसान’संघटना याचा तीव्र निषेध व्यक्त करते तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाचे उद् घाटन आपल्या हस्ते करु नये अशी मागणी ‘जय जवान जय किसान’संघटनेचे अध्यक्ष् प्रशांत पवार यांनी सोमवार दि. २७ जानेवारी २०२० रोजी पत्र-परिषदेत केली.
पत्र परिषदेत त्यांनी अारोप केला,की महामेट्रोतर्फे रिच-३चे लोकमान्य नगर ते सीताबर्डी अक्वालाईन्सचे मंगळवार दि.२८ जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हिडयो कान्फरन्सद्वारे उद् घाटन होणार आहे,मूळात या लाईनवरील सर्व दहा स्टेशनचे काम पूर्ण झाले नसून घाईघाईत उद् घाटन करण्यात येत आहे. अश्याप्रकारे उद् घाटन करुन रेल्वेच्या फेर्या सुरु करणे म्हणजे मेट्रो प्रशासनाचा खर्च वाढवणे असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी बोलताना प्रशांत पवार यांनी जमीनीच्या अधिग्रहणाचा देखील मुद्दा उपस्थित केला. सुप्रसिद्ध उद्योजक आशिष शेवाळकर यांनी एलएडी महाविद्यालयाजवळीत मोक्याची जागा मेट्रोने ९५ टक्के खरेदी रक्कम त्यांना दिली असताना अद्याप जागेचे विक्री पत्र करुन दिले नाही कारण आता शेवाळकर यांना त्या मोक्याच्या जागेसाठी वाढीव रक्कम हवी आहे. मेट्रोच्या नावाने जमीन झाली नसताना त्या ठिकाणी स्टेशन उभारण्यात आले आहे. हल्दीराम यांच्या क्रेझी कॅसेलच्या अधिग्रहणाचा प्रश्न अद्याप सुटला नसून सुमारे १६० कोटी रुपयांची हल्दीरामची मागणी शासनाकडून पूर्ण झाली नाही. या सर्व प्रकारामध्ये प्रकल्पाचा खर्च सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढला असून महामेट्रोतील भ्रष्टाचार, आर्थिक अपहार व जमीनीच्या अधिग्रहणाचा प्रश्न या विविध प्रश्नांवर शासनाने लक्ष् देण्याऐवजी शासनच विधिवत या प्रकल्पाचे उद् घाटन करतेय याचा ‘जय जवान जय किसान’संघटना विरोध करते.
महामेट्रोच्या या प्रकल्पातील सर्वाधिक महत्वाचा मुद्दा हा सुरक्ष्ेचा असून महामेट्रो मार्गावर जे ओव्हरहेड लाईन्स टाकण्यात आले त्याच्या २०० मीटरच्या पोलमध्ये कोणतेही इतर उपकरणे लावण्यात येऊ नये असा नियम असताना मेट्रोने याच हायटेंशन लाईनच्या खाली मेट्रोच्या दिशादर्शक यंत्र बसवले असल्याचा आरोप त्यांनी केला. हायटेंशनच्या खाली लो -टेंशनचे यंत्र बसवता येत नाही. मेट्रोने टेंडरमध्ये हे उपकरण बसवण्यासाठीची वेगळी अट टाकली असताना त्याच पोलवर हे उपकरण बसवण्यात आले यामुळे प्रवाश्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याचा आरोप प्रशांत पवार यांनी केला.
वरील सर्व बाबींची तक्रार संघटनेने विधान सभा अध्यक्ष् नाना पटोले यांच्याजवळ केली असून त्यांना संपूर्ण कागदपत्रे सोपवण्यात आली आहे. पुढील अधिवेशनात हा विषय उपस्थित करण्याचे आश्वासन नाना पटोले यांनी दिले आहे,अशी माहिती त्यांनी दिली. याशिवाय पालकमंत्री नितीन राऊत यांचीही भेट घेऊन त्यांना देखील पत्र देण्यात येईल व त्यांनी या प्रकल्पाच्या उद् घाटनाचा भाग होऊ नये अशी विनंती करण्यात येईल. ज्याप्रमाणे पुणे महामेट्रोतील कामांची दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गांर्भीयाने घेतली त्याचप्रमाणे अजित पवार यांनी नागपूर महामेट्रोच्या देखील कामांची फाईल तपासावी अशी मागणी पवार यांनी केली.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाला हिरवी झेंडी दाखवू नये यासाठी संघटनेने त्यांना मेल पाठवले असून महामेट्रोच्या ८ हजार कोटींच्या प्रकल्पातील भ्रष्टाचाराचा आमची संघटना सातत्याने पाठपुरावा करीत आहे.
मागच्या सरकारने आमच्या कोणत्याही तक्रारींची दखल घेतली नाही,भ्रष्टाचाराशी चौकशी केली नाही कारण मागच्या सरकारचाच या संपूर्ण भ्रष्टाचारात सहभाग होता असा आमचा आरोप आहे,या सरकारकडून आम्हाला अपेक्ष्ा होती ते भ्रष्टाचारासोबत उभे राहणार नाही, म्हणूनच मुख्यमंत्री यांनी ते उद् घाटन करणार नसल्याचे घोषित करावे,अशी मागणी पवार यांनी केली. संघटनेतर्फे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांना निवेदन सोपवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.मुख्यमंत्री हे आमचे असल्यामुळे त्यांना आम्ही काळे झंडे दाखवू नाही मात्र हातात निषेधाचे फलक घेऊन आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्र परिषदेला अरुण वनकर, मिलिंद महादेवकर, माहिती कार्यकर्ते हरिश नायडू, उत्तम सुळके, रविंद्र इटकेलवार उपस्थित होते.
कुठलेही उपकरण लावण्यात आले नाही-महामेट्रोचा खुलासा
महामेट्रोवर करण्यात आलेले आरोप धाधांत खोटे असून मेट्रोतर्फे असे कोणतेही उपकरण ओव्हर हेड लाईन्सवर लावण्यात आले नाही असा खुलासा मेट्राेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अखिलेश हळवे यांनी केला.मूळात सीएमआरएस यांनी या मार्गाची संपूर्ण तपासणी केली. संपूर्ण तपासणी नंतरच त्यांनी महामेट्रोला या मार्गावर मेट्रो चालवण्याची परवानगी प्रदान केल्यानंतरच मंगळवारी या मार्गाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते विधिवत उद् घाटन केले जात आहे.
शेवाळकर यांच्याबाबत घेतलेला आक्ष्ेप देखील मेट्रोला मान्य नाही.जमीन अधिग्रहणाची बाब हे जिल्हाकिधारी कार्यालय सांभाळते.मेट्रोचा जमीन अधिग्रहणाशी कोणताही संबंध नाही. महामेट्रोचं काम अधिग्रहीत करुन दिलेल्या जमीनीवर प्रकल्प उभा करणे एवढेच आहे. शेवाळकर यांच्याकडून जमीनीच्या वाढीव दराबाबत कोणतीही मागणी आली किवा तक्रार किवा आक्ष्ेप नोंदवण्यात आल्याची माहिती ही खोटी आहे.
दहा पैकी सहा स्टेशनचे काम हे पूर्ण झाले असून उर्वरित स्टेशनचे काम देखील महामेट्रो हे तातडीने पूर्ण करीत आहे. महामेट्रोच्या कामाचे स्वरुप हे शासकीय असून लवकरात लवकर जनतेच्या सेवेकरीता मेट्रोची सुविधा उपलब्ध करुन देणे हक महामेट्रोचे प्राथमिक उद्देश्य आहे. या मार्गावर लवकरात लवकर मेट्रो सुरु करावी ही जनतेचीच मागणी होती. हजारो प्रवाशी याबाबत दररोज चौकशी करीत होते.जनतेच्या सुविधेसाठी व प्रवाश्यांची गरज लक्ष्ात घेऊन जे स्टेशन पूर्ण झालेत त्यात मार्गावर मेट्रो सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. मार्ग पूर्ण झाले व स्टेशन पूर्ण झाले असताना उगाच प्रवाश्यांना उर्वरित स्टेशन व मार्गाचे काम पूर्ण झाले नसल्याच्या सबबीखाली आणखी वाट बघायला लावणे हे धोरण उचित नसल्याचे हळवे यांनी सांगितले.
(बातमीशी संबंधित व्हिडीयो Sattadheesh official you tube वर बघू शकता)




आमचे चॅनल subscribe करा
