फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर मनपानागरिकत्व सुधारणा कायद्यासाठी मोदी-शहांच्या अभिनंदन प्रस्तावावरुन महापालिकेत खडाजंगी

नागरिकत्व सुधारणा कायद्यासाठी मोदी-शहांच्या अभिनंदन प्रस्तावावरुन महापालिकेत खडाजंगी

नागपूर: महापालिकेच्या शुक्रवार दि. २० डिसेंबर रोजी नगरभवनात पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत अभिनंदनाच्या प्रस्तावात विक्की कुकरेजा यांनी मांडलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्या अभिनंदन प्रस्तावावर महापालिकेत चांगलीच खडाजंगी झाली. ज्येष्ठ नगरसेवक व माजी महापौर प्रवीण दटके तसेच प्रफुल्ल गुडधे पाटील यांच्यात देखील फाळणी कोणी केली?द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत कोणी मांडला यावरुन चांगलीच शाब्दिक चकमक घडली.

सर्वाच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधान सभा अध्यक्ष् नाना पटोले, उपसभापती नीलम गोर्हे,मंत्रीमंडळालील एकनाथ शिंदे, सुभाष देसाई,बाळासाहेब थोरात,जयंत पाटील,नितीन राऊत, विधान सभा विरोधी पक्ष् नेते देवेंद्र फडणवीस,विधान परिषद विरोधी पक्ष् नेते प्रवीण दरेकर,आमदार कृष्णा खाेपडे, मोहन मते, रविंद्र कुंभारे, विकास ठाकरे,टेकचंद सावरकर,हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर,नाट््यमंडळाचे अध्यक्ष् पदी निवड झालेले जब्बार पटेल,ज्येष्ठ चिकित्सक डॉ. विलास डांगरे ,ग्रीन व्हीजलचे कौस्तुभ चटर्जी,खेळाडू हिमाणी फडके,पत्रकार सुमेध वाघमारे, मनीष साेनी,योगेश पांडे,प्रवीण लोणकर,राजु कुशवाहा, इ. यांच्या अभिनंदन प्रस्ताव वाचनानंतर आरोग्य समितीचे सभापती विक्की कुकरेजा यांनी नागरिकत्व कायदा देशात लागू केल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाचे वाचन उपायुक्त व निगम सचिव राजेश मोहिते करीत असतानाच ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी यावर आक्ष्ेप नोंदवला.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या कायद्याचा विरोध दर्शवित असून अश्‍या घटनाबाह्र्य कायद्याचे अभिनंदन नागपूर महापालिकेत करण्यात येऊ नये अशी मागणी त्यांनी महापौर संदीप जोशी यांच्याकडे केली. यावर माजी महापौर प्रवीण दटके यांनी आक्ष्ेप नोंदवित जो कायदा देशाच्या केंद्र सरकारने पारित केला आहे तो घटनाबार्ह्य होऊ शकत नाही त्यामुळे आक्ष्ेपातील घटनाबार्ह्य हा शब्द काढण्यात यावा अशी सूचना केली. प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी अद्याप या कायद्याला सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी मिळाली नसलय्ामुळे याचे वाचन केले जाऊ नये अशी मागणी रेटून धरली तसेच ‘केंद्र सरकार’ हा शब्द काढून ‘भारतीय संसेदने’ हा शब्द टाकण्याची मागणी केली.

या कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी झाली नसल्यामुळे महापालिकेला असा हस्तक्ष्ेप करता येत नसल्याचे सांगितले. यावर ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी देशाच्या लोकसभेने आणि राज्यसभेने हा कायदा संमत केला असून राष्ट्रपती यांची देखील यावर स्वाक्षरी झाली असल्याचे निर्दशनसास आणून दिले तसेच हा कायदा सर्व राज्यात लागू केला आहे किवा नाही याची माहिती प्रशासनाने देण्याची मागणी केली.यावर प्रशासनाने हा कायदा देशातील सर्व राज्यांसाठी पारित झाला असल्याची माहिती दिली. यावर गुडधे पाटील यांनी संसेदत पारित झालेल्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येत असल्याचे सांगितले.हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून असा अभिनंदनाचा ठराव सभागृहात मांडू नये अशी मागणी केली.यावर दयाशंकर तिवारी यांनी संसदेनेच प्रदीर्घ चर्चेनंतर देशासाठी हा कायदा पारित केला असून यावर अद्याप न्यायालयाने स्थगनादेश दिला नसल्याचे महापौरांच्या लक्ष्ात आणून दिले.या प्रस्तावात कायद्यात कोणतेही परिवर्तन महापालिका करीत नसून केवळ अभिनंदन करीत असल्याचे सांगितले.मात्र गुडधे पाटील यांनी हा न्यायालयाच्या अधिकारात हस्तक्ष्ेप असल्याचा आरोप कायम ठेवला.

यानंतर ही या अभिनंदन प्रस्तावाचे वाचन करीत असताना हे प्रस्तावावर वाचन आहे की ग्रंथ वाचन आहे?असा आक्ष्ेप नगरसेवक दुनेश्‍वर पेठे यांनी नोंदवला. या कायद्यामुळे लोकांच्या मनात अविश्‍वास निर्माण झाला असून संपूर्ण देश पेटलेला असल्याचे प्रफुल्ल गुडधे पाटील म्हणाले. असे समाजकंटक आपल्याकडेही असतील,सर्व धर्मियांमध्ये असंतोष निर्माण झाला असताना या कायद्याशी संबंधित अभिनंदन प्रस्ताव महापालिकेने घेणे न्यायोचित होणार नाही असे गुडधे पाटील म्हणाले.विद्यापीठ पेटलेले आहे,विद्यार्थी रस्त्यावर आले आहेत,जो कायदा वादग्रस्त आहे त्याच्या अभिनंदनाचे अभिवाचन करु नये अशी मागणी त्यांनी केली.

यावर विक्की कुकरेजा यांनी देशाच्या विभाजनात १९५१ पर्यत निर्वासितांना देशात येण्याची संधीच मिळाली नसल्यामुळे खूप मोठी त्रासदी भोगावी लागली असल्याचे सांगितले. तेव्हा निर्वासितांची काय परिस्थिती होती हे राजकारण करणारे यांना समजणार नाही.यावर विरोधी पक्ष् नेते तानाजी वनवे यांनी आक्ष्ेप नोंदवित ‘राजकारण’हा शब्द काढून टाकण्याची मागणी केली. बोलण्याच्या ओघात गुडधे पाटील यांनी ‘पॉंईट ऑफ इन्फॉरमेशन देण्याची’ मागणी करताच, दयाशंकर तिवारी यांनी मध्यस्थी करत ‘पाँईट ऑफ इन्फॉरमेशन ही प्रशासनाकडून घेण्यासाठी असते देण्यासाठी नाही’ अशी पुस्ती जोडली यावर ‘मी अजूनही विद्यार्थीच आहे हे मी स्वीकार करतो’असा चिमटा प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी काढला.

अफगानिस्तान,पाकिस्तान आणि बांग्लादेशात सिख,हिंदू, जैन,बौद्ध,पारसी,ईसाई या अल्पसंख्याकांची परिस्थिती दयनीय असून मोदी व अमित शहा तसेच या कायद्याला संमंती देण्यात सहकार्य करणारे समस्त खासदारांचे खूप-खूप अभिनंदन करतो असे विक्की कुकरेजा यांनी म्हटले. गुडधे पाटील यांनी फाळणीचा विषय ही दूर्देवी घटना होती,दु़:खदायक होती असे म्हणताच सभागृहात आवाज उमटला ‘कोणी केली फाळणी?’यावर पुन्हा खडाजंगी होत ‘फाळणीसाठी बीजांकूर कोणी पेरले?’असा उलट सवाल गुडधे पाटील यांनी केला.द्विराष्ट्रवादाचा मुद्दा हा कोणी मांडला?असे विचारताच प्रवीण दटके यांनी महापौरांना विनंती करीत कोणी मांडला,याचा खुलासा गुडधे पाटील यांनी करावा,नाव घ्यावे असा आग्रह धरला,नाव सांगावे ही मागणी लावून धरली.

नागपूरात नागरिकांना नागरिकत्व सिद्ध करावे लागणार आहे,काल नागपूरात मोठे आंदोलन झाले.या शहराचा गौरवशाली इतिहास आहे.हे शहर सर्वसमावेशक असल्याचे गुडधे पाटील म्हणाले. यावर दटके यांनी सभागृहात जर याच विषयावर चर्चा होणार असेल तर विषय पत्रिकेवरील विषय बाजूला सारुन याच विषयापासून चर्चा सुरु करावी का? अशी विचारणा करताच चर्चा करण्याची क्ष् मता सभागृहाची नाही,माझी तर मुळीच नाही,संसद ही दरवेळी देशासाठी नवे कायदे करीत अल्याचे ते म्हणाले.यावर नगरसेवक धर्मपाल मेश्राम यांनी आक्ष्ेप नोंदवत प्रशासनाने सांगावे या कायद्यावर सभागृहात केवळ अभिनंदन आहे की चर्चा?यावर राजेश मोहिते यांनी फक्त अभिनंदन असल्याची माहिती दिली.यानंतर धर्मपाल मेश्राम यांनी विषय पत्रिकेवरील विषय महत्वाचे असून त्यावर चर्चा करण्याची विनंती महापौरांना केली. नगरसेवक मनोज सांगोले यांनी देखील सभागृहाचा वेळ वाया चालला असल्याची ओरड केली. यानंतर महापौर संदीप जोशी यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर झाला असल्याची घोषणा करताच ‘भारत माता की जय’घोषणेने सभागृह दणाणले. यानंतर प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी महापौरांजवळ जाऊन दोन मिनिटे चर्चा करुन सभात्याग करीत असल्याचे सांगत निघून गेले.

विधीमंडळ आधिवेशन नागपूरात सुरु असल्याकारणाने आयुक्त अभिजित बांगर हे बैठकीत व्यस्त असल्याने विषय पत्रिकेवरील विषयांवर चर्चा झाल्याशिवाय निर्णय घेऊ नये अशी विनंती महापौरांना प्रवीण दटके यांनी केली. महापौर संदीप जोशी यांनी परिवहन समितीवर भारतीय जनता पक्ष्ातर्फे बाल्या बोरकर यांची सभापती पदी नियुक्तीला मंजूरी दिली तसेच बहूजन समाज पक्ष्ातर्फे गटनेत्या वैशाली अविनाश नारनवरे यांचे स्मार्ट सिटीमध्ये नामनिर्देशित संचालक म्हणून नियुक्तीला मंजूरी प्रदान करुन सभा अनिश्‍चित काळासाठी स्थगित केली.

आज सभागृहात भारतीय जनता पक्ष्ाचे सर्व नगरसेवक हे ‘मी पण सावरकर’ची टोपी घालूनच सभागृहाच्या कामकाजात सहभागी झाले होते हे विशेष!

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या