
मावळत्या महापौरांनी मानले सर्वांचे आभार
नागपूर: गेल्या अडीच वर्षांच्या कारकार्दीत अनेकांचे सहकार्य लाभले,महापौर पदाची शपथ घेतल्यावर खऱ्या अर्थाने अनेक आव्हाने डोळ्यासमोर होते,त्यातील बरेच प्रश्न मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.आयुक्त यांच्यापासून तर महापालिकेतील पदाधिकारी,कर्मचारी,सत्ता पक्ष् नेते, विविध समितींचे सभापती,सर्वच पक्षांचे नगरसेवक, विविध सामाजिक संस्था यांच्या सहकार्यातून एक लोकाभिमूख कारभार चालवण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केल्याचे विधान नागपूर महापालिकेच्या मावळत्या महापौर नंदा जिचकार यांनी केले.
त्या गुरुवार दि. २१ नोव्हेंबर रोजी महापौर पदावरील शेवटच्या दिवसा अखेरीस पत्रकारांचे आभार मानण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्र परिषदेत बोलत होत्या. याप्रसंगी उपमहापौर दीपराज पार्डीकर,सत्ता पक्ष् नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष् नेते तानाती वनवे,आमदार माेहन मते,पिंटू झलके, सुनील अग्रवाल,धर्मपाल मेश्राम आदी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना महापौर म्हणाल्या की,अडीच वर्षांच्या कारकीर्दीत पत्रकारांसह सर्वांचीच भरपूर साथ मिळाली.नव्याने पदावर रुजू झाले तेव्हा दहा झोन,मुख्य कार्यालय,अनेक विभाग एवढा मोठा कारभार बघताना अनेक गोष्टी पत्रकारांनी लक्ष्ात आणून दिल्या.त्यांच्या दक्ष् तेमुळे अनेक चांगल्या गोष्टी शहरात घडवून आणू शकले,याचे समाधान आहे.ज्येष्ठ पदाधिकारी प्रवीण दटके, संदीप जोशी, दयाशंकर तिवारी यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन मिळाले.प्रत्येक समस्येत ते सदैव पाठीशी उभे राहीलेत.विशेष म्हणजे केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता असल्यामुळे नागपूर शहराच्या विकासासाठी अनेक निर्णय घेणे सोपे गेले.केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी शहराच्या विकासासंबंधी कोणतीही फाईल प्रशासकीय कारभारात अटकू दिली नाही. मनपा विरोधी पक्ष् नेते तानाजी वनवे यांचेही मी आभार मानते,माझ्या कारकीर्दीत त्यांचेही मोलाचे सहकार्य मला लाभले. याशिवाय संदीप जाधव, विकी कुकरेजा, प्रदीप पोहोणे,बाल्या बोरकर, वर्षा ठाकरे, दिव्या धुरडे अश्या अनेकांनी अनेक निर्णयात मला मोलाचे सहकार्य केले.
सगळ्याच समितीच्या सभापतींनी अतिशय उत्कृष्ट काम केले असून नागपूर महानगरपालिकेचे नाव महाराष्ट्रात अधिक उंचावण्यात त्यांची मोलाची साथ लाभली. महापौर म्हणून काम करताना अनेक आव्हाने सामोरे आली त्यात सर्वात मोठे आव्हान हे आर्थिक अडचणीचे होते मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जीएसटी वाढवून दिला.सर्वांच्या पाठींब्यामुळेच मार्ग निघत गेले.विविध प्रश्न मार्गी लावतानाच अनेक प्रयोगही करुन बघितले.कर वसूलीबाबत कठोर निर्णय घेण्यात आला.यामुळे मनपाचे उत्पन्न वाढले.माझ्या कार्यकाळात पाच आयुक्तांसोबत मला काम करावे लागले. आयुक्त श्रावण हर्डीकर,अश्विन मुद् गल,वीरेंद्र सिंग, रवींद्र ठाकरे तसेच अभिजित बांगर मात्र कुठेही न डगमगता सर्वांच्या सहकार्याने कार्यकाळ पार पाडला याचे समाधान फार मोठे आहे. स्व-पक्षीयच नव्हे तर विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी देखील महापौर पदाचा नेहमीच सन्मान केला.मला सन्मानजनक वागणूक दिली. याशिवाय मनपाच्या अनेक उपक्रमात अत्यंत मोलाची साथ देणाऱ्या विविध सामाजिक संस्था यांचेही मी ऋणानुबंध मानते.विशेषत: कौस्तूभ चॅटर्जी यांच्या ‘ग्रीन व्हीजल’ या संस्थेने पर्यावरणासाठी मनपाला दिलेली साथ ही अत्यंत मोलाची आहे असे मी मानते. महापौर इनोव्हेशन पर्वासाठी प्रा.कडू यांची मोलाची साथ मिळाली. बाय-डायव्हरसिटी,शहरी सौंदर्यीकरण अश्या अनेक उपक्रमात माझ्यासोबत माझे फक्त दोनच हात नसून हजारो हात जुळले होते,अश्या शब्दात मावळत्या महापौर नंदा जिचकार यांनी सर्वांच्याप्रती आभार व्यक्त केला.




आमचे चॅनल subscribe करा
