

शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी करणार प्रयत्न
नागपूर: शिवसेना हा प्रखर हिंदूत्वादी पक्ष् म्हणून ओळखल्या जातो मात्र महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधान सभा निवडणूकीत अचानक राजकीय चित्र पालटलं आणि भारतीय जनता पक्ष् व शिवसेना हे दोन्ही समान विचारधारेच्या पक्षात पराकोटीचे मतभेद उद् भवले,राज्यातील सत्ता स्थापनेचे गणित बिघडले परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष् शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस,राष्ट्रवादी व शिवसेना मिळून आता सत्तास्थापनेचा दावा करीत आहे,यावर राष्ट्रवादीने आता शिवसेनेचे हिंदूत्व मान्य केले का?असा प्रश्न शरद पवार यांना विचारला असता,हिंदूत्व मुद्दा असो किंवा इतर अनेक मुद्दे यावर पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांची बैठक मुंबईत सुरु असून त्या बैठकीतील मुद्दे मला लवकरच कळतील मात्र राष्ट्रवादी असो किवा काँग्रेस पक्ष् या दोन्ही पक्षांची विचारधारणा ही ‘धर्मनिरपेक्ष्’ असून दोन्ही पक्षाच्या जाहीरनाम्यात देखील आमचे सरकार आले तर धर्मनिरपक्ष् तेने ते चालविले जातील असा स्पष्ट उल्लेख असल्याचे पवार हे म्हणाले.
ते शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर रोजी नागपूर प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.याप्रसंगी मंचावर काटोलचे आमदार अनिल देशमुख, प्रेस क्लबचे अध्यक्ष् प्रदीप मैत्र, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष् शिरीष बोरकर, महासचिव ब्रम्हशंकर त्रिपाठी, आ. प्रकाश गजभिये,नागपूर शहराध्यक्ष् अनिल अहिरकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.पुढे बोलताना ते म्हणाले,की मुंबईतील तिन्ही पक्षाच्या बैठकीत ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’वर चर्चा होत असून ही बैठक पूर्ण झाल्यावरच पुढील नकाशा हा स्पष्ट होईल. नुकतेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांच्या बैठकीत राज्यात भाजपचीच सत्ता येईल असा दावा केला,याकडे पवार यांचे लक्ष् वेधले असता,एवढंच माझ्या डोक्यात ‘मी पुन्हा येणार…मी पुन्हा येणार…मी पुन्हा येणार’अशी मिश्कीली केली आणि पत्र परिषदेत एकच हास्य फूलले.राज्यात सत्ता स्थापनेसाठी तिन्ही पक्ष् हे गंभीर असून चर्चा करण्यासाठीच दिल्लीवरुन काँग्रेसचे अहमद पटेल,वेणूगोपाल आणि मल्लिकार्जून खरगे हे पदाधिकारी आले होते, दोन-तीन दिवसात दिल्लीला पुन्हा त्यांच्यासोबत बैठक घेणार असून तेव्हा पुन्हा अनेक मुद्दांवर बोलू,असे ते म्हणाले. उद्या शनिवार दि.१६ नोव्हेंबर रोजी दूपारी ३ वा. तिन्ही पक्षांनी राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांच्याकडे वेळ मागितला असल्याचे पवार यांना सांगितले असता,या विषयी मला कल्पना नसल्याचे ते म्हणाले. पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विषय पत्रकारांनी छेडल असता, मी मागील काही वर्षांपासून देवेंद्र यांना ओळखतो मात्र ते ज्योतिषशास्त्राचे देखील अभ्यासू आहेत ते आता कळले,असा टोला त्यांनी हाणला. तिन्ही पक्षात सत्ता वाटपाचा फॉर्मूला जवळपास ठरला असल्याचे ते म्हणाले, राज्यापालांनी तसा ही सहा महिन्यांचा वेळ दिला असल्याचे ते म्हणाले.
राष्ट्रवादी ही येत्या काळात भाजपसोबत जाऊ शकते का?या प्रश्नावर बोलताना,सध्यातरी राष्ट्रवादीची चर्चा ही काँग्रेस व शिवसेनेशी सुरु असल्याचे सांगून हा प्रश्न त्यांनी आपल्या नेहमीच्या राजकीय कौशल्याने टाेलवला. राज्यात स्थिर सरकार यावं हीच आमची ईच्छा असल्याचे ते म्हणाले. हे सरकार बनेल व पाच वर्षे चालेलही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.तिन्ही पक्षाचे सरकार बनले तरी मुख्यमंत्री कोण राहील?यावर भाष्य करताना,मुख्यमंत्री पदाची कोणाची मागणी असेल तर त्यावर विचार करु, महाराष्ट्राच्या जनतेने संपूर्ण बहूमत दिलं असतं तर अशी राजकीय परिस्थिती उद् भवली नसती,असे ते म्हणाले.
केंद्र सरकारने तात्काळ अर्थसहाय्य द्यावे-
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष् शरद पवार हे सध्या विदर्भाच्या दौर्यावर आहेत. गुरुवारी त्यांनी काटोल,नरखेड इ.अनेक भागाचा दौरा करुन अतिवृष्टिमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली होती.महाराष्ट्रातील इतर भागाप्रमाणेच विदर्भात देखील शेतकऱ्यांचे अभूतपूर्व असे नुकसान झाल्याचे ते म्हणाले.निसर्गाच्या अवकळेमुळे विदर्भातला शेतकरी हा किती हवालदिल झाला आहे त्यांची व्यथा कळली.महत्वाचे पिक,फळबागा,संत्रा,मोसंबी,धान,कापूस,सोयाबिन,तूर याचे अतोनात नुकसान झाले आहे. खरे तर विदर्भात तातडीने येण्याची ईच्छा होती मात्र राज्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडींमुळे येता नाही आले. संत्र्यांच्या दोन वार पैकी एक वार पूर्णपणे नष्ट झाला.अतिवृष्टिच्या गळामुळे ७०० हेक्टरवरची संत्री गळून पडली.वेचून काढायलाही शेतकऱ्यांला आता पैसे पडतात आहेत.संत्रा,मोसंबीवर डायबागचा प्रादुर्भावही जडला.धानामध्येतर दाणाच उतपन्न झाला नाही.कपाशीच्या झाडांची वाढ चांगली झाली मात्र ज्या कपाशीला ४० ते ६० किंवा ८० पर्यंत बोंड येत होती त्याला ५ ते १० बोंड लटकतात आहेत,सोयाबिनच्या शेंगाही सडल्या आहेत, जिल्हाधिकारी कार्यालयातून मागवलेल्या माहितीप्रमोण ३३ टक्क्यांच्या वर नुकसान झालेल्यांनाच नुकसान भरपाई मिळणार. हा निकष योग्य नसल्याचे ते म्हणाले.
जिल्ह््यातील ४४,२१३ हेक्टर शेती ही बाधित झाली.४४ हजार २४३ शेतकरी हे प्रभावित झाले आहेत,प्रत्येक शेतकर्याला ६,८०० ची मदत द्यावी लागणार आहे.सरकारचा आकडा हा २२ हजार ७८८ शेतकरी तर ७,३४३ हेक्टर शेती बाधित झाली असल्याचा आहे मात्र वस्तूस्थिती ही वेगळी असल्याचे पवार हे म्हणाले.बुलढाणा,वाशिम,अकोला इ.ठिकाणी मी गेलो नसलो तरी तिथेही शेतकऱ्यांची इथल्यापेक्षा ही गंभीर अवस्था असल्याचे कळले.अश्या वेळी सरकारचे नुकसान भरपाईचे निकष हे अयोग्य ठरतात.६० हजारपेक्षा जास्त हेक्टरचे शेतीचे नुकसान झाले असून जवळपास सर्वच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही द्यावी लागणार आहे.येत्या १८ डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे त्यात हा प्रश्न उपस्थित करणार असल्याचे ते म्हणाले.केंद्र सरकारच्या कृषि मंत्रालयाने त्वरीत एक बैठक बोलवावी.राज्य सरकारनेही यंत्रणा उभारावी.शेतकरी यांनी बँकेचे कर्ज घेतले आहे मात्र आता पीक हातात नाही कर्ज मात्र तसंच आहे यामुळे संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. पुढील हंगामात पीक घेण्यासाठी केंद्राकडून शून्य व्याजदराने शेतकर्र्यांना कर्ज मिळायला पाहिजे.केंद्राच्या अर्थ मंत्रालयात बैठक घेऊन हा मुद्दा उचलू.
तुमचं सरकार आलं तर दहा हजार हेक्टरी मदत मिळेल का?असा प्रश्न विचारता, कुठुन मदत मिळेल हे मला माहिती नाही मात्र सरकारने नुकसानाकडे लक्ष् घालून मदत करावी,मी केंद्रिय कृषि व अर्थमंत्रालयाशी निश्चितच बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. ३३ टक्क्यांचा निकष काढून टाकावा तसेच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. औरंगाबाद,जालन्यातही असेच नुकसान झाले आहे.प्रश्न सुटायला जिथून मदत होईल ते महत्वाचे.२०१२ साली आमच्या सरकारने हेक्टरी ३५ हजाराची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली असल्याचे ते म्हणाले.केंद्राने अर्थ सहाय्य राज्य सरकारला दिल्यास लवकरात लवकर मदत मिळू शकेल.नुकसानीचे पंचनामे सरसकट करण्याची मागणी ही पवार यांनी यावेळी केली.




आमचे चॅनल subscribe करा
