

नागपूर: जनतेच्या कौलाचा मान ठेवत नवे सरकार स्थापण्यासाठी थोडा वेळ मिळणे गरजेचे होते. काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी बोलावल्या गेले नाही. महाराष्ट्राच्या जनतेला नवे सरकार हवे आहे, राष्ट्रपती राजवट नको आहे. राष्ट्रपती राजवट ही राज्याच्या प्रगतीसाठी व लोकशाहीसाठी मारक असून ही केंद्रातील भाजपचीच खेळी आहे. या राष्ट्रपती राजवटीमध्ये घोडेबाजारांना उत येऊन कर्नाटक, गोवा व मणिपूर प्रमाणेच भाजप इतर पक्षातील आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करेल,असा आरोप काँग्रेसचे दक्षिण-पश्चिमचे उमेदवार डॉ.आशिष देशमुख यांनी केला.
परंतु, हा त्यांचा प्रयत्न सगळे आमदार हाणून पडतील व राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेचे सरकार बनेल. आपण या असंवैधानिक व अलोकतांत्रिक राष्ट्रपती राजवटीचा निषेध करतो, अशी प्रतिक्रिया माजी आमदार व काँग्रेसचे नेते डॉ. आशिष देशमुख यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रात एक मजबूत सरकार स्थापन व्हावं म्हणून जनतेने भरघोस मतदान केलं.भाजपेतर पक्षांना भरभरून मतदान करून जनतेने परिवर्तनासाठी कौल दिला. सरकार स्थापण्यास अहंकारी भाजप असमर्थ असल्यामुळे केंद्र सरकारच्या सांगण्यावरून,आघाडीला सरकार स्थापण्यासाठी जो वेळ दिल्या गेला तो अपुरा होता,असे ते म्हणाले.




आमचे चॅनल subscribe करा
