फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजकाय म्हणाले काँग्रेसचे पराभूत उमेदवार!

काय म्हणाले काँग्रेसचे पराभूत उमेदवार!

Advertisements

डॉक्टरकी सोडून राजकारणात आले अन् मी माझ्याच थोबाडीत मारुन घेतली

डॉ. ममता खांडेकर
(Seniour Journalist)

नागपूर: तीन पंचवार्षिक निवडणूकांमध्ये काँग्रेस पक्ष्ातर्फे वाशिम मतदार संघात अक्ष् रशहा: अशिक्षित, निरक्ष् र उमेदवार दिला जातोय. मी सक्ष् म महिला असूनही फायदा नाही.आदिवासी बहूल भागातील मतदार तर स्वत:चे डोके अजिबात वापरत नाही. रस्ते,वीज,पाणी,रोजगार हा त्याचा ओरडा सततचा असतो मात्र मतदान करताना हाच मतदार आपले डोके का वापरत नाही? जिल्हा,तालुक्यास्तरावरील दादा,भाऊ,साहेब त्यांना ‘मॉनिटर’करतात,वळवतात. मी गेल्या वीस वर्षांपासून मतदारसंघात पक्षाचे काम करीत आहे,माझ्या तुलनेत पक्ष्ाच्या सिटींग आमदाराला तर बोलताही येत नाही,राजकारणही समजत नाही अशी टिका मतदारच करतात मात्र तरीही त्यांना उमेदवारी मिळते आणि टिका करणारे मतदारच त्यांना निवडूनही देतात.परिवर्तन घडवण्यासाठी मी राजकारणात आले. डॉक्टरी पेशा सोडून मी राजकारणाकडे वळले,आज असं वाटतंय मी माझ्याच थोबाडीत मारुन घेतली!

ही वेदना आहे वाशिम मतदार संघातून काँग्रेसपक्ष्ाकडून उमेदवारी मिळालेल्या व निवडणूकीत फक्त काही हजार मतांनी पराभूत झालेल्या डॉ.रजनी राठोड यांची. दक्षिणपश्‍चिममधून पराभूत उमेदवार डॉ.आशिष देशमुख यांनी जयताळा मार्गावरील अनसूया मंगल कार्यालयात रविवार दि.३ नोव्हेंबर रोजी काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची उमेद वाढविण्यासाठी स्नेहमिलनाचा कार्यक्रम आयोजित  केला होता. या स्नेहमिलनात जिल्ह्यातील काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांनी आपापल्या पराभवाची मर्मस्पर्शी वेदना मांडली. वरील मर्म मांडताना डॉ.रजनी म्हणाल्या की, या वेळी माणिकराव ठाकरे यांच्या प्रयत्नामुळे त्यांना तिकीट मिळाले. मात्र राष्ट्रवादीचे कोणतेही सहकार्य न मिळाले नसल्याची व्यथा त्यांनी मांडली. पराभवाचं दु:खं तर झालं मात्र पराभव ज्यामुळे झाला,त्याचं दु:खं जास्त झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. विधान सभेची ही निवडणूक काँग्रेसने जास्त गांर्भीयाने घेतलीच नसल्याचे त्या म्हणाल्या. पक्षातील ज्येष्ठ मंडळींनी ‘आघाडी‘चा पाठपुरावा केलाच नाही. आघाडी झाली तरी स्थानिक पातळीवर दोन्ही पक्ष्ातील पदाधिकारी यांच्यात अखेरपर्यंत समन्वयच नव्हता. पक्ष् हा वेळेवर उमेदवारी घोषित करतो, प्रचाराला फक्त १२-१३ दिवस मिळतात, त्यातही दोन्ही पक्षातील आधी मूळातली भांडणे मिटवा, त्यानंतर उरलेल्या वेळेत प्रचार करा. इतकं केल्यावरही जि.प.स्तरावरील नेत्यांनी उघडपणे भाजपचा प्रचार केला.रात्रीपर्यंत ‘पंजा को दिया’ म्हणणारे लोकांचं सकाळी ‘पंजाचं कमळ झालं’ बघायला मिळाले!

आमच्या बाप-जाद्यांची शाळा-कॉलेजस् नाहीत- शेखर शेंडे (वर्धा)
२००९ पासून पक्षाने तिकीट दिले. येथे राष्ट्रवादीने बंडखोरांना उभे केले. पक्षाच्याही बंडखोरांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अधिक ताकद दिली. २०१४ च्या निवडणूकीतही तिच पुनरावृत्ती घडली. आशिष देशमुख यांनी पराभूतांसाठी हे मुक्त व्यासपीठ उपलब्ध करुन दिले असल्यामुळे आज मुक्तपणेच बोलणार कारण आमचा पराभूतांचा आवाज हा निवडणूकीनंतर फक्त घरापूरतीच मर्यादीत राहतो.पक्ष् विचारत सुद्धा नाही. का पराभूत झाला?कारणे काय होती? यावर उपाय काय-काय आहेत? नागपूरतील भाजपचा महामंत्री नागपूरमधूनच जिल्ह्यातील बंडखोरीला फोनवरुनच थांबवतो. आपल्या पक्षात असं मॉनिटरींग करणारे कोणीच नाही. जिल्ह्यातील ज्येष्ठ मंडळी ही प्रत्येक निवडणूकीत त्यांच्या मतांनी माणसे नेमतात. खर्च मात्र आमच्या खिशातून होतो. पक्ष् देतो त्यापेक्षा अनेक पटींने उमेदवार हा स्वत:चा खर्च भागवतो. माझ्या विरोधात लढणारा उमेदवार हा स्कॉलरशिप घोटाळ्यामुळे खिशात ४०-५० कोटी घेऊनच फिरतो, आमचा निभाव कसा लागणार? आमच्या बाप-जाद्यांची शाळा-कॉलेजही नाहीत त्यात वेळेवर उमेदवारी देता! आजच सांगतो पुढच्याही कोणत्याही निवडणूकीत काँग्रेसचा उमेदवार हा निवडून येऊ शकत नाही. या निवडणूकीत ७७ हजारच्या वर मते मी घेतली मात्र तालुका संगठनाने थोडी मदत केली असती तर फक्त ५-७ हजार मतांनी पराभूत झालो नसतो. २-४ हजार मते तालुका अध्यक्ष् सहज पलटवू शकतो. आमचा लहान लोकांचा आवाज आता आशिष देशमुखांनीच पक्ष् श्रेष्ठींपर्यंत पोहोचवावे. काँग्रेस पक्ष् हा महाराष्ट्रात ४४-४५ पेक्षा ही डबल सीट्स जिंकू शकतो फक्त पक्षाने उमेदवारी ही पाच वर्षांपूर्वीच जाहीर करावी किवा तसे नियोजन करावे.

केंद्र आणि राज्य तर सोडा जिल्ह्यातील नेतेही फिरकलेच नाही-प्रा.संजय बोडके(आकोट)
महाराष्ट्र राज्याची निवडणूक काँग्रेस पक्षानेच गांर्भीयाने घेतलीच नाही. लोकसभेनंतर सर्व माध्यमांनी एक्झीट पोलमध्ये काँग्रेसला महाराष्ट्रात ५० जागा ही मिळणार नसल्याचे भाकीत केले यामुळे निश्‍चितच काँग्रेसचे मनोबल ढासळले,त्यांचे खच्चीकरण झाले. तन-मन-धनाने काँग्रेसने ही निवडणूक लढली असती तर ४४ मध्ये आणखी २५ जागांची भर नक्कीच पडली असती. केंद्र आणि राज्य तर सोडा तर जिल्ह्यातील नेते हे सुद्धा प्रचारासाठी मतदार संघात फिरकलेच नाहीत. त्यात भाजपने काँग्रेसची वोट बँक फोडली,त्यांना आमिषे दिलीत. मतदानाच्या दोन दिवस आधी चित्र हे वेगळेच असते आणि निकाल मात्र भलताच लागतो. तरी देखील गेल्या निवडणूकीत माझ्या विरोधात लढणारे उमेदवार यांनी ७२ हजारांचे मताधिक्य घेतले होते त्यांना यावेळी फक्त ७ हजार मतांचे मताधिक्य मिळाले,यातच मी माझा विजय मानतो.

‘मेक-इन-गडचिरोली’ची घोषणा देणार्यांनी १० लोकांनाही रोजगार दिले नाहीत- डॉ.चंदा कोडवते
मी ६२ हजार ५७७ मते घेतली. माझा जिल्हा हा आदिवासी बहूल भाग म्हणून मागासलेला आहे. अतिशय दूर्गम भाग मात्र या भागात विरोधी पक्षातील नेत्याने मतदारांना ‘मेक-इन-गडचिरोली’ची जाहीरातबाजीतून भूरळ घातली मात्र प्रत्यक्षात १० लोकांनाही रोजगार मिळाला नाही तरी देखील ते विजयी आहेत आणि मी पराभूत झाले आहे!येथील मतदार भाजपला कंटाळला आहे, हा जिल्हा पुन्हा काँग्रेसचाच होणार याची मला खात्री आहे.

भाजपशी भांडण्यापेक्षा आपापसातच भांडलो- सतीश वारजूरकर(चिमूर)
मी ७५ हजार ६०० मते मिळवली. भाजपचे बंटी भांगडिया यांच्या विरोधात मी पक्षातर्फे लढलो. माझ्या जिल्ह्यात गोसीखूर्दचा मोठा घोटाळा दडला आहे. यावेळी भांगडिया हे फक्त ९ जहार ७५२ मतांनी विजयी झालेत. आपलं काम मी मांडू शकलो नाही हे माझ्या पराभवाचे कारण असावे. याशिवाय काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष् व माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्री राहीलेले रणजीत देशमुख यांच्यासारखा पालकमंत्री मला लाभला नाही.मी लहान असतानापासून रणजीत देशमुख यांचे काम पाहीले आहे. पालकमंत्री म्हणून ठोस निर्णय घेणारे ते नेते होते. आपला पक्ष् हा गोर-गरीबांचा पक्ष् आहे. दलित,आदिवासींचा पक्ष् आहे मात्र भाजपशी भांडण्यापेक्षा आम्ही आपापसातच भांडतो हेच आमच्या पराभवाचे कारण आहे. दहा हजारच्या वर कार्यकर्ता हा बूथवर काम करतो मात्र जिल्हास्तरावरील फक्त ४-५ नेते हे सगळा खेळ बिघडवतात. त्यांना विचारले काँग्रेस पक्षात राहून भाजपची कामे का करता?तर त्यांचे उत्तर असते ‘आमची काय बिसात? वरुन नेते सांगतात म्हणून भाजपच्या जीपमध्ये फिरलो!‘

प्रफूल्ल पटेलनी विरोधात प्रचार केला-अमर वऱ्हाडे
गोंदियामधले सगळे काँग्रेसवासी भाजपमध्ये गेलेत! लोकसभेपासूनच चाहूल लागली होती मात्र पक्ष् श्रेष्ठींनी लक्ष् च दिले नाही.पक्ष् नेतृत्वाने स्थानिक नेतृत्वाकडे काना-डोळा केला.काँग्रेस एवढा मोठा पक्ष्, एवढी मोठी यंत्रणा,मुद्दामून नजरअंदाज केलं का? प्रफूल्ल पटेलने तर गोंदियात विरोधात प्रचार केला,हाच का आघाडीचा धर्म?अपक्षाला त्यांनी मदत केली. आमच्या गोंदिया भंडारामध्ये लगेच जि.परिषदांच्या नगर पंचायतीच्या निवडणूका होणार आहेत.पराभूतांचा असाच सत्कार सोहळा प्रत्येक जिल्ह्यात आशिष देशमुखांनी घ्यावा. दुर्लक्षित उमेदवारांचा नेता म्हणून पराभूतांना उमेद द्यावी. माजी मंत्री वसंत पुरकेंनी याचे नेतृत्व स्वीकारावे.

यावेळी जळगाव जामोदच्या स्वाती वाकेकर यांनीही गदद्ारीचा राग आवळला. आघाडी धर्म पाळला नाही,आपल्याच माणसांनी विरोधी पक्ष्ाचे कसे काम केले याची कुंडलीच उपस्थितांसमोर मांडली.

काँग्रेसचं परिपक्व नेतृत्वच चोरीला गेलं!-वसंत पुरके 

काँग्रेसची तिसरी फळी आज आपण पाहतोय.काँग्रेसचं हे दूर्देव आहे.पहील्या फळीतील महात्मा गांधी, इंदिरा गांधी,राजीव गांधी यांची हत्या झाली. राजेश पायलट,माधवराव सिंधिया,विलासराव देशमुख यांच्यासारखे दूसरया फळीतील नेते हे अकाली निधन पावले तर आज हयातीत असणारे तिसऱ्या फळीतील नेते हे अपरिपक्व असून काँग्रेसचं परिपक्व नेतृत्वच आज चोरीला गेलंय!काही नेते फक्त सत्तेसाठी मरमर करताना दिसतात.ज्या पक्षाने इतकं मोठं बळ दिलं त्यांनीच निष्ठा गहाण टाकली. राधाकृष्ण विखे पाटील, मुके पाटील,हर्षवर्धन पाटील आज कुठे गेले?‘जीव गुदमरला’असे ते बोलतात,सत्ता उपभोगताना नव्हता का जीव गुदमरला? ‘नशा पिलाके गिराना तो सबको आता है मगर गिरतो को थाम लेती है साकी’आशिष देशमुख यांनी पराभूतांचा सत्कार आयोजित करुन हीच भूमिका घेतली आहे या भूमिकेचे मी स्वागत करतो. आजच्या या सोहळ्यात देखील आमचे नेते हे आलेच नाहीत…!

नेहरुंसोबत कायम तत्ववेते राहायचे ज्यांच्याशी ते बौद्धिक चर्चा करीत असत मोदींसोबत अदानी,अंबानी राहतात,हाच फरक आहे काँग्रेस आणि भाजपमध्ये. एक्झीट पोलमुळे नक्कीच निराश झालेा,माणूस वेंटिलेटरवर आहे तर काऊन हात लावायचा बा? मात्र या पुढे नाउमेद होऊ नका, काँग्रेस हा दैवी,पारंगत,सिद्धहस्त,लोकमान्य असणारा नेतृत्वाचा पक्ष् राहीला आहे, मनोनिग्रह जागा करा,सदाफूली ही फूलल्याशिवाय राहणार नाही. आपला पक्ष् हा फार ‘दिलदार’पक्ष् आहे, भाजप,सेनेच्या हातात हात घालून ‘हे विश्‍वची माझे घर’समजून लढतात. मोठे नेते यांनी आता थोडे प्रयोगशील होणे गरजेचे आहे. सोनिया मॅडम तुम्हीही थोडी ताकत लावा, भाजपचा कांऊंटडाऊन सुरु झाला आहे. ‘मीच येणार’ म्हणणारे अजुनही ‘वेंटिलेटरवर’आहेत. २५ वर्षांपासून मी राजकारणात आहे पण ‘मीच येणार’असे एकदाही बोललो नाही. ‘एक लाखाच्या मताधिक्याने जिंकून येईन’सांगणारे मुख्यमंत्री यांनी मात्र एक लाखाच्या मताधिक्याने नाही जिंकून आलो तर ‘राजीनामा’ देईन असे म्हटले नाही,तेवढे ते हूशार आहेत! सोनिया,प्रियंका यांनी छोटासा जरी दौरा केला असता तर अडीच हजार मतांनी पराभव झाला नसता. तेंदूलकर,धोनी,कोहली आऊट झाले तरी आजकाल भारताचा विजय होतोच ना! म्हूणनच आम्ही पराभूत नाही पराक्रमी आहोत आणि पुढल्या वेळी भाजपवाल्यांची जिरवल्याशिवाय राहणार नाही.

‘अजूनही मला पहाटेची स्वप्नं पडत आहे
मी थोड्याश्‍या अंधाराने हताश होत नाही
अजूनही मला वसंताची चाहूल लागली आहे
थोड्याश्‍या पानगळीने मी उदास होत नाही’

निवडून आलो तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनल्याशिवाय राहणार नाही एवढा मी आशावादी आहे. काँग्रेसचे जननेते आता बाहेर काढावे लागतील. अंतर्गत रुसवे,फूगवे, अंहकार हा फार गंभीर प्रश्‍न आहे.भाजपकडून शिका फक्त ‘दोन’जागा होत्या आज ३०० पार गेलेत. दोन जागा होत्या तरी चिवटपणा नाही सोडला. तसा चिवटपणा आज काँग्रेसमध्ये हवा. मात्र भाजपनेही हे समजून घेतले पाहीजे २००० साली काँग्रेस जर सूडबुद्धिने वागली असती तर मोदी आज पंतप्रधान पदी राहीले नसते. माहितीचा अधिकार,शिक्ष् णाचा अधिकार, राईट टू फूड, या सर्व योजना काँग्रेसने आणल्या मात्र काँग्रेसला मुद्दे खपवता आल्या नाहीत. ७ कोटी ६० लाख तरुणाई बेरोजगार आहे,जगातील सर्वाधिक भ्रष्टाचार नोटबंदी नंतर मोदी काळात झाला. ‘वंचित’ला मी ‘संकुचित’आघाडी म्हणतो,काँग्रेसची सर्वाधिक नासाडी वंचतिने केली. एवढंच म्हणेल-
‘है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर
लावण्या तू दिवा येथे काळजाची वात कर’
जिस तन लागे,वो ही तन जाने’ ’ज्याचं जळतं त्यालाच कळतं’
पराभवाचा शल्य हे पराभूतांनाच कळतं. काँग्रेसकडे लाखो कार्यकर्त्यांची फौज,हजारो नेते आहेत तरीही हा असा पराभव का वाटयाला यावा? ‘तूझं आहे तूजपाशी परंतू जागा चुकल्याशी’असे तुकोबाराया सांगून गेलेत. निवडणूक तोंडावर आली असता मला डावीकडचा कार्यकर्ता म्हणाला ’पलटूनच टाकतो मी एकटाच’ उजवीकडचा म्हणाला ‘रेटूनच आणतो’ मधला कार्यकर्ता म्हणाला ‘एकटाच रात्री भेटून निपटूनच टाकतो२४ तारखेला निकाल लागला अन् ‘मी पराभूत झालो होतो!’ पक्ष्,पक्ष् नेता, कार्यकर्ता आणि मायबाप जनता हे लोकशाहीच्या पूजेचे चार स्तंभ मी मानतो. पराभूत झाल्यावर बायकोच म्हणाली ‘तीन वेळा आमदार झाला होता तर लई येल पाडत होता,आता जिरल्यासाखे वाटते ना!’ तिला हेच म्हणालो ‘आय एम नॉट वरिड अबाऊट बस्ट…आय एम वरिड अबाऊट लिकेजस्‌’.
कॉंग्रेसमध्ये हेच फार डेंजरस आहेत..लिकेजस्‌्! काँगेसला पराभूत करण्याची ताकद बाहेरच्यांची नाहीच..
‘हमारे चमन को बहारो ने लृटा
दूल्हन की डोली को कहारो ने लृटा
गैरो ने लृटा तो हमे गम ना होता
मगर सहारा देकर सहारो ने लृटा’
सोनिया,प्रियंका यांनी रोड शो जरी दिला असता,भाषणाची गरज नव्हतीच तरी पराभव वाट्याला आला नसता.
….

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या