

पुढचा लढा मुख्यमंत्र्यांसोबत नसणार असल्याची खात्री
डॉ.ममता खांडेकर
(Seniour Journalist)
नागपूर: विधान सभा निवडणूकीची धामधूम नुकतीच संपली असली तरी अनेक पराभूत उमेदवारांसाठी अद्याप ही लढाई संपलेली नाही. आतापासूनच पुढील निवडणूकीसाठी मतदार संघ बांधण्यासाठी अनेकांनी कंबर कसली आहे यात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात दंड थोपटणारे काँग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख यांचाही समावेश आहे. सोमवारी त्यांनी प्रेस क्लब येथे पत्र परिषद घेऊन ५ वर्ष लोकलढे लढणार असल्याची भविष्यवाणी केली. पुढील निवडणूक ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात नसून मनपा सत्ता पक्ष् नेते संदीप जोशी यांच्यासोबत लढली जाईल अशी त्यांना खात्री असल्याचे बोलले जात आहे.. पुढील निवडणूक डोळ्यासमोर ठेऊनच त्यांनी विजयाची कोणतीही खात्री नसताना दक्षिण-पश्चिममधून काँग्रेसची उमेदवारी स्वीकारली,या मागे पुढील निवडणूकीचीच चाचपणी होती,असे खाजगीत सांगितले जात आहे.
सोमवारी पत्र परिषदेत ते दिलखुलास बोलले,गंभीर मुद्दांवर बोलले, मनापासून बालेले, अनेक विषयांवर बाेललेत. यात मुख्य मुद्दा होता गटबाजीत उर्जा घालवण्याचा. या पुढे जनतेच्या प्रश्नावर ५ वर्ष लोकलढा देणार असल्याचा हुंकार त्यांनी भरला. देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांचे मताधिक्य अर्ध्यावर आणले. मतदानाच्या फक्त १३ दिवस आधी त्यांना उमेदवारी घोषित झाली. या तेरा दिवसात त्यांनी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला. ६० हजारच्या वर मते मिळवली यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. मुख्यमंत्र्यांच्या ऐवजी भारतीय जनता पक्ष्ाचा इतर कोणी त्यांना ‘तुल्यबळ’ उमेदवार असता ही जागा ते सहज जिंकू शकले असते असा विश्वास त्यांना मिळणारी मते यामुळे जागृत झाला. पुढील निवडणूकीत मुख्यमंत्री हे ‘दिल्लीश्वर’ झालेले असतील तेव्हा या मतदार संघावर डोळा असणारे मनपा सत्ता पक्ष् नेते संदीप जोशी यांना उमेदवारी जाहीर झाल्यास आशिष देशमुख यांची त्यांच्याशी तुल्यबळ लढत होईल या आशेवर त्यांनी सोमवारी पत्र परिषद घेऊन पुढील पाच वर्षांची दिशा स्पष्ट केली. नुकत्याच पार पडलेल्या निवडणूकीत काँग्रेसच्या सर्व समावेशक विचारांवर मतदारांनी मोहोर उमटवली असल्याचे ते म्हणाले. सत्ता स्थापनेपूर्ती जागा दिल्या नसल्या तरी भाजप-सेनेसारख्या जातीयवादी व सांप्रदायिक शक्तींनाही मतदारांनी साथ दिली नाही याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
एकूणच विचार केला तर मतदारांचा हा कौल सत्ताधिशांच्या विरोधात असल्याचे ते म्हणाले. आपण विखुरलेलो आणि सैरभैर झालेलो असल्यानेच या पूर्वी आणि आताच्या निवडणूकीत आपण सत्ता मिळवू शकले नसल्याचे ते म्हणाले. असे असले तरी सत्ताधिशांच्या अर्निबंध कारभारावर अंकूश बसावा यासाठी १०० विरोधी पक्ष्ाच्या उमेदवारांनाही मतदारांनी विधान सभेत पाठवले असल्याचे ते म्हणाले. जी जबाबदारी मतदारांनी टाकली आहे त्या विश्वासाला आता जागलो पाहीजे अशी भावनिक साद ही देशमुख यांनी घातली. यात जर चूकलो तर भविष्यात अडचणीत येऊ असा अंदेशाही त्यांनी तळमळीने व्यक्त केला. इतिहासात झालेल्या चूका माफ करुन आणि त्यात सुधारणा करुन जो पुढचे पाऊल टाकतो त्यालाच भविष्य असल्याचे देशमुख म्हणाले,याचा अर्थ त्यांनी इतिहासात भाजपात पक्ष् प्रवेश करुन जी चूक केली होती त्यात सुधारणा करुन पुन्हा ते काँग्रेसवासी झाले याचे कारण भाजपमध्ये त्यांच्यासारख्या महत्वाकांक्ष्ी राजकारणीला कोणतेही स्थान निमार्ण करताच आले नसते याची जाणीव त्यांना चांगल्याने झाली होती,यासाठीच चार वर्षांपेक्ष्ाही जास्त काळ पक्ष्ातच राहून त्यांनी सातत्याने पक्ष् विरोधी भूमिका वठवली. शेवटी पक्ष् त्यागच केला आणि राजकारणाच्या क्ष्ितिजात स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी काँग्रेसची उमेदवारी स्वीकारली, ती ही अगदी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कारण ‘लक्ष्’ही निवडणूक नव्हतीच तर….पुढची तुल्यबळ निवडणूक हेच या मुरलेल्या राजकारण्याचे लक्ष् असल्याचे सांगितले जात आहे. ज्याचा प्रत्यय पत्र परिषदेत आला. केवळ निवडणूक ते निवडणूक मतदारांना भेटल्याने फारसे हाताला लागत नाही,ही उपरतीही त्यांना झाली,या पुढे लोकलढे लढणार असल्याचा ईशारा देऊन त्यांनी सत्ताधारी यांना आतापासूनच तयार राहण्याचा सूतोवाच त्यांनी केला आहे. या निवडणूकीत आशिष देशमुख यांनी अमरावतीमध्ये देखील मतदार संघ शोधून ठेवला होता,असे बोलले जात आहे. मात्र दक्षिण-पश्चिममधून ६० हजारच्या वर मते घेतल्यावर आता त्यांचे संपूर्ण लक्ष् याच मतदार संघावर केंद्रित राहणार असल्याचा सुतोवाच त्यांनी केला आहे.
याच पार्श्वभूमीवर असंख्य मुद्दांवर मंथन करुन आगामी दिशा निश्चित करण्यासाठी रविवार ३ नोव्हेंबर रोजी जयताळा येथील अनुसुया मंगल कार्यालयात सायं ५.३० वा.लढवैय्या पराभूत उमेदवारांचा काँग्रेस,राष्ट्रवादी,रिपाई व अन्य पक्ष्ातील ज्येष्ठ नेत्यांच्या हस्ते सत्काराचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला असल्याचे ते म्हणाले.




आमचे चॅनल subscribe करा
