फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजउत्तर प्रदेशचे प्रभारी बसपा पक्ष् बर्बाद करेल-सुरेश साखरे

उत्तर प्रदेशचे प्रभारी बसपा पक्ष् बर्बाद करेल-सुरेश साखरे

Advertisements

शरद पवार यांच्यासोबतची भेट मायावतींच्या सांगण्यावरून: विरोधकांचे बदनामीचे षडयंत्र

नागपूर: पक्ष्ाध्यक्ष्ा मायावती यांच्या सांगण्यावरुन निवडणूकीपूर्वी आचार संहिता लागण्यापूर्वी म्हणजे ११ सप्टेंबर पूर्वीच मी राष्ट्रवादी पक्ष्ाचे अध्यक्ष् शरद पवार यांची मुंबईत गठबंधनाच्या संदर्भात भेट घेतली होती.या भेटी संदर्भात जिल्हा पातळीवरील मेळाव्यातही उघडपणे मी बोललो होतो मात्र फक्त मला बदनाम करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर सातत्याने षडयंत्र रचले जात असून माझी बदनामी करण्यासाठीच माध्यमात शरद पवार यांच्यासोबतचा फोटो माझे विरोधक मुद्दामून व्हायरल करीत असल्याचा आरोप बसपाचे माजी प्रदेशाध्यक्ष् सुरेश साखरे यांनी केला. राज्यसभेचे खासदार ॲड.वीरसिंह यांच्यावर आरोप करीत त्यांना महाराष्ट्राचे राजकारण कळत नसून उत्तर प्रदेशचे हे प्रभारीच बसपा पक्ष् बर्बाद करतील असा आरोप त्यांनी केला.

सुरेश साखरे हे उत्तर नागपूरमधून बहूजन समाज पक्ष्ातर्फे उमेदवार होते मात्र या निवडणूकीत त्यांचा पराभव झाला. पराभवाची नैतिक जबबादारी स्वीकारुन त्यांनी अध्यक्ष् पदाचा राजीनामा दिला होता. मात्र त्याच दिवशी महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी अशोक सिद्धार्थ यांनी पत्र परिषद घेऊन साखरे यांच्यावर इतर पक्ष्ांसोबत संपर्कात असल्याचे व पैसे घेतल्याचे गंभीर आरोप केले होते यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती.नुकतीच ॲड.संदीप ताजने यांच्यावर प्रदेशाध्यक्ष् पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर पक्ष्ाने राज्यसभा खासदार व प्रदेश प्रभारी अशोक सिद्धार्थ यांचीही हकालपट्टी करुन संपूर्ण प्रदेश कार्यकारीणीच बर्खास्त केली.

मायावती यांच्या सांगण्यावरुनच मी शरद पवार यांची भेट घेतली होती असा खुलासा सुरेश साखरे यांनी केला. निवडणूकीपूर्वी शरद पवार यांनी मायावती यांच्याशी भेट घेतली होती. या भेटीनंतर प्रदेशाध्यक्ष् या नात्याने मायावती यांच्या सूचनेवरुनच मी पवार यांना भेटलो. त्यावेळी सोबत रामअचल राजभर हे देखील सोबत होते. त्याच दरम्यान काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष् बाळासाहेब थोरात,वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष् प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर यांचीही भेट झाली मात्र मायावती यांच्या सूचनेवरुन गठबंधनविषयी आम्ही फक्त शरद पवार यांच्याशीच चर्चा केल्याची त्यांनी सांगितले. ही बाब पक्ष्ाच्या राज्य पातळीवरील बैठकीत, जिल्हास्तरावरील बैठकीत, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अनेकदा उघडपणे मी सांगितली आहे. मात्र फक्त माझी बदनामी करण्याकरीता माझे विरोधक निवडणूक संपल्यानंतर आता हा फोटो व्हायरल करीत असल्याचे ते म्हणाले.यापासून कार्यकर्ता,मतदार व माझ्या हितचिंतकांनी सावध राहण्याचेही त्यांनी आवाहन केले.
लवकरच भेटून सत्य परिस्थिती मायावतींना सांगील-
मी पक्ष्ाचा १९८५ पासूनचा कार्यकर्ता आहे. महाराष्ट्रात पक्ष् वाढवण्यासाठी अपार कष्ट घेतले. पोस्टर चिपकावणे या पासून सुरवात केली. वयाच्या १५ व्या वर्षापासून पक्ष्ाच्या विचारधारेशी जुळलो आहे. पक्ष्ानेही भरपूर काही दिले. जिल्हा महासचिव पदापासून तर पाच-सहा राज्यांमध्ये प्रभारी अशी महत्वाची पदे ही मी भूषवली. पक्ष्ाने मला तर मी पक्ष्ाला खूप काह दिले. माझ्या कुटुंबाची वाताहत झाली. भावाचा ह्दयघाताने मृत्यू झाला.पत्नी,मुलगी अपघातात वारले, अनेक दु:खं मी सहन केले. या पक्ष्ाला मी धन दौलत,कुटुंब संगळंच वाहीलं मात्र दुर्देवाने पक्ष्ासाठी घातक असणारी माणसे पक्ष्ात घूसली.लवकरच भेटून मायावतींना मी सत्य परिस्थिती सांगील. २००९ मध्ये देखील विरोधकांचे ऐकून मला पक्ष्ातून काढण्यात आले होते मात्र लवकरच मायावतींनी मला परत पक्ष्ात घेतले.

ॲड.वीरसिंह यांचा ताजनेंना पूर्वीपासूनच पाठींबा-
निवडणूकीसाठी नागपूरात आले असताना आणि हॉटेल रेडिसन ब्ल्यूमध्ये वीरसिंह हे थांबले असतनाच ॲड.वीरसिंह यांनी लवकरच ताजने हे प्रदेशाध्यक्ष् पदी रुजू होतील असे भाकीत केले होते. पूर्वीपासूनच त्यांना प्रदेशाध्यक्ष् पद हे ताजनेंनाच द्यायचे होते मात्र मायावती यांच्यासमोर त्यांचे एक काही चालले नाही. ताजने यांच्या ताजपोशीसाठीच माझ्या विरुद्ध सातत्याने कट कारस्थान रचण्यात आल्याचा आरोप साखरे यांनी केला. ताजने हे पुढचे प्रदेशाध्यक्ष् होतील हे वीरसिंह यांनी ८ आणि ९ ऑक्टोबरला नागपूरला येताच कोणत्या आधारावर भविष्यवाणी केली होती?असा प्रश्‍न साखरे यांनी उपस्थित केला. विशेष म्हणजे पक्ष्ाचे कॅडर असणारे ताजने यांना निवडणूकीच्या तीन महिन्यापूर्वीच हटवले गेले होते आता त्यांच्यावर मायावती यांनी प्रदेशाध्याक्ष्ी जबाबदारी सोपवली आहे हे विशेष!

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या