

नाेटाने बिघडवले विजयाचे गणित
नागपूर: पश्चिम नागपूरमधून सुधाकर देशमुख यांना तिसर्यांदा उमेदवारी घोषित झाली आणि तेव्हाच पराभवाचे सावट गडद दाटून आले होते. गेल्या दहा वर्षांपासून देशमुख हे आमदार असले तरी अकार्यक्ष् म आमदार म्हणून त्यांची मतदार संघात ओळख निर्माण झाली होती. ही प्रतिमा पुसण्यासाठी त्यांनी कोणतेही प्रयत्न केले नाही. भाजप पक्ष्ाचे चिन्ह हेच त्यांच्या फाजील आत्मविश्वासला घातक ठरला. मतदार हा मतदान करताना आपल्या उमेदवारने गेल्या पाच वर्षात काय केले?याचा हिशेब मनात ठेवत असतो. मात्र सुधाकर देशमुख यांची कार्यपद्धतीच अशी होती ज्यामुळे ते मतदारांच्या मनाजवळ जाऊ शकले नाहीत,शेवटी गुरुवारी त्यांच्या एकंदरीत कार्यपद्धतीचे,मतदारांना गृहीत धरण्याचे, पक्ष्ा चा बडेजाव मिरवण्याचे पडसाद मतमोजणीत उमटलेच आणि ६,३६२ मतांनी त्यांना धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला.
काँग्रेसचे कद्दावर नेते विकास ठाकरे यांनी त्यांचा परावभ करुन विधान सभेत आमदार म्हणून प्रवेश केला. गेल्या दोन पराभवाचा त्यांनी भाजपकडून चांगलाच वचपाही काढला. दोन पराभवाचे शल्य त्यांनी २०१९ च्या निवडणूकीत भरुन काढले. विकास ठाकरे यांना ८२,९५५ मते मिळाली तर सुधाकर देशमुख यांना ७६,५९३ मतांवर समाधान मानावे लागले.विशेष म्हणजे या मतदार संघात नोटाला मिळालेली ३,७०२ मते यांनी देशमुख यांचे विजयाचे गणित खात्रीलायक बिघडवले कारण नोटा न दाबणारे मतदारही मतदानाला फिरकलेच नाही त्याचाही फटका देशमुख यांना बसला.
या मतदार संघात स्लम भागासोबतच उच्च वर्णीय मतदार बहूसंख्येने राहतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरक्ष् ण धोरणामुळे हा वर्ग चांगलाच दुखावला गेला आहे. परिणामी अनेकांनी देशमुख यांना मत देण्याऐवजी नोटा दाबणे पसंद केले तर भाजपचा पारंपारिक मतदार हा मतदानास फिरकलाच नाही. दुसरीकडे कुंभार टोली, संगमचाळ,फकीरावाडी इ. अनेक स्लम भागातील मतदारांनी लक्ष् णीय प्रमाणात पंजासमाेरचे बटण दाबले. विकास ठाकरे यांनी उमेदवारी मिळताच या मतदारसंघात अतिशय नियोजनबद्ध प्रचार केला. उच्च वर्गीय मतदारांना भाजपच्या पोकळ विकासाचे आकडे हे प्रभावित करणार नाही हे त्यांना माहिती होते,परिणामी त्यांनी प्रचाराचा सर्व भर स्लम भागावर दिला. रोजगार,शिक्ष् ण,उद्योग,भरमसाठ वीज बिल, पाणी बिल असे दैनदिन जिवनाला प्रभावित करणारे मुद्दे त्यांनी प्रचारात घेतले व निम्न वर्गीय मतदारांच्या भावनेला हात घातला. ठाकरे हे मुरलेले राजकारणी असून जनतेची नस त्यांना अचूक माहिती आहे.
मातीतल्या माणसापर्यंत पोहोचणय्ासाठी ते विशेष कष्ट ही घेतात दूसरीकडे सुधाकर देशमुख मात्र आपल्या ‘हवा महल’ यातून खाली उतरलेच नाही. फक्त गळाभर हार घालून उघड्या जीपने प्रचार केल्यास मत मिळत नसतात,याची प्रचितीही त्यांना या पराभवामुळे आली असावी. सर्वसामान्यांनचे उमेदवार ते पूर्वीही वाटले नाही मात्र भाजपला जिंकून देण्यासाठी भाजपचा पारंपारिक मतदार हा हिरीरिने मतदानास बाहरे पडत होता. आपल्या या मतदारांना ‘गृहीत’धरण्याची घोड चूक देशमुख यांनी केल्याचे बोलले जात आहे. देवेंद्र फडणवीस यांचा फाजील आत्मविश्वास हा देखील ही सीट गमावण्यामागे नडला. आपण कोणताही उमेदवार दिला तरी मतदार त्यांना भाजपच्या चिन्हावर निवडून देतील,फडणवीस यांच्या या अपेक्ष्ेलाही चांगलाच ‘धक्का’लागला आहे. केंद्रिय मंत्री नितीन गडकरींचा अनुभवाचा फायदा फडणवीस यांनी घेतला नाही,असे देखील बोलले जात आहे.
शहरात काँग्रेस पक्ष् जरी मृतप्राय झाला असला तरी एकमेव विकास ठाकरे यांनी काँग्रेसला आंदोलनाच्या मार्फत सातत्याने जिवंत ठेवले होते. सत्ताधारी पक्ष्ासोबत परोकोटीचे मतभेद यामुळे भाजप पक्ष् २०१७ च्या मनपाच्या निवडणूकीत विकास ठाकरे यांच्या विरोधात पूर्णपणे एकटवला आणि ठाकरे यांना मनपाच्या प्रवेश द्वारातही प्रवेश करणे निषिद्ध करुन ठेवले. मात्र मुळातच झूजारु असणारे ठाकरे यांनी हार मानली नाही. विधान सभा निवडणूकीत दोन वेळा पराभवाचे शल्य पचवून देखील प्रत्येक निवडणूक प्रतिष्ठेने लढण्याचा त्यांनी प्रयत्न केला.यावेळी मात्र त्यांनी यशश्री खेचून आणली, त्यांच्या या यशात भाजपने दिलेला अकार्यक्ष् म असा ठपका असणारे उमेदवार यांचाही मोलाचा वाटा आहे कारण भाजपने पश्चिममध्ये उमेदवार बदलून तगडा उमेदवार दिला असता तर ठाकरे यांना ही निवडणूकही सोपी गेली नसती.
२०१४ च्या निवडणूकीत नागपूरकर मतदारांनी सहा ही जागा भाजपच्या पदरात घालून मतांचे भरभरुन दान टाकले होते मात्र मतदारांना गृहीत धरुन मुख्यमंत्री यांनी लादलेले उमेदवार शेवटी पराभूत झाले. उत्तर नागपूर आणि पश्चिम भाजपच्या हातातून निसटले तर मध्यमध्ये विकास कुंभारे यांना निसटता विजय मिळाला. मतदारांनी फडणवीस यांना दिलेला हा संदेशच मानला जातो. या मतदानात तरुणाईनेही वैचारिक कारणाने भाजपाला नाकारल्याचे लक्ष्ात येते. रोजगाराचा गंभीर झालेला प्रश्न,बंद पडत चाललेले उद्योग धंधे,व्यापारी वर्गाची नाराजी, प्लास्टिक बंदी, नोटाचे लक्ष् णीय प्रमाण या सर्व गोष्टींचा परिणाम मतदानात उमटला व परिणाम धककादायक लागला.
ठाकरे यांची लढवैय्या वृत्ती, कार्यकर्त्यांची मजबूत फळी, निवडणूकीचे योजनाबद्ध नियोजन या सर्व जमेच्या बाजू ठरल्या व विधान सभेचे दार काँग्रेसच्या या नेत्यासाठी खुले झाले.याचा जल्लोष निकाल जाहीर होताच एसएफएस कॉलेज,सेमिनरी हिल्स वर आला. ‘काँग्रेस का शेर,आ गया शेर’ अशी सिंह गर्जना कार्यकर्त्यांनी करुन अवघा सेमिनरी हिल्स दणाणूक टाकला. २०२१ मध्ये होणारया महापालिकेच्या निवडणूकीत ठाकरे यांना आमदारकीचा निश्चितच फायदा होणार आहे. मनपाच्या निवडणूकीत आपले समर्थक नगरसेवक निवडून आणण्याची ताकद आता वाढली आहे. भाजपच्या एका नगरसेवकाने त्यांना या निवडणूकीत छूपी मदत केल्याची देखील चर्चा आहे.




आमचे चॅनल subscribe करा
