

डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यापर्ण करुन शिवरायांच्या आर्शिवादाने होणार सांगता
नागपूर: मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात एकंदरित महाराष्ट्राचाच प्रचार उद्या शनिवारी सायंकाळी ५ वा. संपतोय. संपूर्ण निवडणूकीच्या काळात मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या दक्षिण-पश्चिम मतदार संघात फक्त दोन सभा घेतल्या. १२ ऑक्टोबर रोजी टिंबर मार्केट तर १६ ऑक्टोबर रोजी प्रताप नगर येथे या सभा पार पडल्या.मुख्यमंत्री यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्राचीच जबाबदारी असल्यामुळे त्यांनी त्यांच्या मतदार संघात फार कमी वेळ प्रचार केला मात्र प्रचाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शनिवारी मुख्यमंत्र्यांचा ‘महाजनादेश रोड शो’हा त्यांच्या मतदारसंघात होणार असल्याची माहिती मनपा सत्ता पक्ष् नेते व मुख्यमंत्री यांच्या मतदार संघातील निवडणूक प्रचार प्रतिनिधी संदीपी जोशी यांनी शुक्रवारी प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत दिली.
या रोड शो ची सुरवात सकाळी ८.३० वा. संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यापर्ण करुन होईल. यानंतर माटे चौक,गाेपाल नगर,दूसरा बसस्टॉप,तिसरा बसस्टॉप,एम्पोरियल, पडोळे चौक, दिनदयाल मार्गे भेंढे ले आऊट येथील हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यापर्ण करुन या अभूतपूर्व अश्या रोड शो चा समारोप हाेईल,अशी माहिती त्यांनी दिली. नागपूरमध्ये कधीही झाला नही असा हा रोड शो राहणार असल्याचे संदीप जोशी म्हणाले. या ठिकाणी मुख्यमंत्री हे सभेला संबोधित करतील.ठिकठिकाणी विविध संस्था,संघटना हे रॅलीचे स्वागत करतील.यामध्ये लेझिम पथक,दानपट्टा इ.चे प्रात्यक्ष्ि क सादर करण्यात येईल. रॅलील भाजप कार्यकर्ते, बूथप्रमुख,शक्ती केंद्र प्रमुख, नगरसेवक इ.सह दहा हजार नागरिकांचा समावेश राहील. रॅली दरम्यान मतदानाविषयी जनजागृती केली जाईल. २१ ता. ला जवळपास ६० टक्के मतदान व्हावे असा आमचा प्रयत्न राहील.
अंदाजे एक लाख मतांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विजय संपादन करतील असा विश्वास यावेळी संदीप जोशी यांनी व्यक्त केला. रॅलीत अमृता फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे, महापौर नंदा जिचकार,शहराध्यक्ष् प्रवीण दटके,आठवले गटातील भूपेश थूलकर, सुलेखा कुंभारे इ. मान्यवर सहभागी होतील. दीड किलोमीटरचा रोश शो हा अंदाजे तीन तासात संपेल. प्रचारात मुख्यमंत्री यांची कमतरता भासली का?या प्रश्नाचे उत्तर देताना संदीप जोशी म्हणाले,की मुख्यमंत्री यांची कमतरता कार्यकर्त्यांना जाणवणारच होती मात्र बूथ प्रमुखांपासून तर प्रत्येकाला देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे असे वाटत असल्यामुळे त्यांच्या प्रचारासाठी ‘मी देवेंद्र’चा चेहरा होऊनच कार्यकर्त्यांनी प्रचारात स्वत:ला झोकून दिलं. मुख्यमंत्री यांच्या संपूर्ण मतदारसंघात घरोघरी पोहोचण्यास आम्ही ९९ टक्के यशस्वी झालो असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री यांनी फक्त दक्षिण-पश्चिमध्ये गूंतूण राहू नये यासाठीच ‘मैं भी देवेंद्र’ही संकल्पना आम्ही यशस्वीपणे राबवली. या संपूर्ण प्रचारात मुन्ना यादव, अविनाश ठाकरे, सर्वच नगरसेवकांनी अतिशय मोलाचा हातभार लावला असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधकांच्या प्रचाराविषयी विचारले असता,विरोधकांचे कामच जबरदस्त असल्याची कोटी त्यांनी केली. काटोल,सावनेर आणि आता दक्षिण-पश्चिमध्ये विरोधकांचे जबरदस्त काम दिसतंच असल्याचे विधान त्यांनी केले.




आमचे चॅनल subscribe करा
