डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
२६ जानेवरी २०२६: आपल्या देशात पावणे पाचशेच्या जवळपास संपूर्ण राज्यात, बहूतांश भाषेतील वृत्त वाहिन्यात आहेत परंतू,यातील चार वृत्त वाहिन्या सोडून सर्व वृत्त वाहीन्या आर्थिक डबघाईस आल्या आहेत.त्यांचा संपूर्ण डोलारा केंद्रातील मोदी सरकारच्या जाहीरातींवर तग धरुन उभा आहे तर,ज्या चार वृत्त वाहिन्या आहेत त्यांचाही महसूलीचा सर्वात मोठा भाग मोदी सरकारच्या जाहीरातींवर निर्भर आहे.यामुळे गणतंत्रातील पत्रकारिता ही ‘तथ्यविरहीत’झाली असल्याचा दावा हा खरा वाटू लागतो.आणि गणतंत्र देशातील पत्रकारिता ही ‘दीन’वाटू लागते.
हल्ली सोशल मिडीयावर तथ्यांचा भडीमार असल्याचा ’भास’होतो मात्र,ते देखील दोनच परदेशी कंपन्यांच्या अधीन आहे,मेटा आणि गूगल.या दोन्ही कंपन्यांच्या भारतातील प्रतिनिधींना केंद्र सरकारचे प्रसारण मंत्रालय केव्हा ही ’तलब’करताना दिसून पडतात,त्यामुळे या प्लॅटफॉर्मवर देखील ‘तथ्य‘कधीचेच संपुष्टात आले आहे.‘सत्य’हाच आज देशात रुग्णावस्थेत पोहोचला आहे.
देशातील विविध वृत्त वाहिन्यांचे अँकर यांना कोट्यावधीचे पॅकेजेस मिळतात,त्यांचे सामान्य ज्ञान कितीही ‘सामान्य ’असले तरी सरकारला जे हवे ते दर्शकांच्या गळी उतरविण्यात ते ‘तरबेज’असतात आणि हीच त्यांची ‘गुणवत्ता’ठरते.सकाळ,संध्याकाळ सरकारच्या हितासाठीच कंठशोष करने,त्या अनुषगांने चर्चेचा सूर आवळणे,डिबेटचे विषय ठेवणे, देशात ‘सत्ता विरोधी’कोणी राहूच नये यासाठी या वृत्त वाहिन्या अगदी तळमळीने व सरकारप्रती प्रामाणिकपणे काम करताना दिसून पडतात.एका वृत्त वाहिनीवर एका अँकरने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘मोदी जी’न करता ‘मोदी’असा केला अन्…त्या अँकरची नोकरी गेली….!भारतातील मुख्य धारेतील सगळ्याच वृत्त वाहिन्या या फक्त मोदी सरकारच्या नीतीवर चालण्यात धन्यता मानत आहेत,किंबहूना चालण्यास ‘बाध्य’झाल्या आहेत…!
गेल्याच वर्षी वृत्त वाहिन्यांच्या हातातून पत्रकारिता पूर्णपणे ‘निसटली’आहे.ती आता सोशल मिडीयाकडे वळली आहे.भारतात आता पत्रकारिता शिल्लक उरली नाही.खूप..खूप..खूपच कमी अशी जागा उरली आहे जिथे ‘सत्य’धडपडत,चाचपडत आहे.मात्र,ती इतकी कमी आहे की,उल्लेखासाठी शब्द ही शोधावे लागतात….!मात्र,या ही माध्यमात ‘तथ्य’मांडणा-यांना बखुबी वेगळं करण्यात आलं आहे…!निव्वळ नफा कमविण्यासाठी भारत सरकारच्या हातातील खेळणे बनलेल्या सोशल मिडीया चालविण्या-या कंपन्यांनी ’तथ्य’मांडणारे,सांगणारे यांचे ’रिच’ आकुंचित करुन ठेवले आहे.त्यांनी मांडलेले ‘तथ्य’हे कोट्यावधी व्यूअर्सपर्यंत पोहोचू शकत नाही,ज्यांना ते ऐकायचे नाही त्यांच्यापर्यंत तर पोहोचूच शकत नाही..!त्यांचे तथ्य त्यांच्याच विचारसरणीच्या एका समूहापर्यंत,गटापर्यंत पोहोचत असतात.हा प्लॅटफॉर्म अफाट,अमर्याद असल्याच्या ‘भ्रमात’तथ्य मांडणारा असतो मात्र,त्याचे तथ्य हे एका चौकटीच्या बाहेर पोहोचू शकत नाहीत…!
तथ्य मांडणारे,तथ्य सांगणारे देशातील सरकारच्या नीतीला प्रभावित करण्याची ताकद असून देखील ते करु शकत नाही कारण त्यांचे तथ्य,मेटा किंव गुगलसारख्या कंपन्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचूच देत नाही.देशात तथ्य मांडणारी,सत्य सांगणारी जी अगदी छोटीशी जागा आहे ती आहे ‘इंटरनेट’च्या आधाराने ‘स्वखर्चाने’ स्वत:चे ॲप आणि न्यूज वेबसाईट्सद्वारे तथ्यांची मांडणी करणारा वर्ग,जे सरकार किंवा कोणाच्याही पैशांवर निर्भर नाही.तथ्य फक्त याच छोट्याशा जागेत जिवंत राहण्यासाठी धडपडताना दिसून पडतो कारण यांची ‘रिच’ही फार कमी असते.मोठमोठ्या नामांकित वृत्तपत्रांच्या व वृत्त वाहिन्यांच्याही ॲप्स आणि न्यूज वेबसाईट्स असतात मात्र,हेच धोरण या ही प्लॅटफॉर्मवर या वृत्तपत्र व वृत्त वाहिन्यांचे मालक स्वीकारताना दिसतात,‘तथ्य’मांडायचे नाही..तथ्य सांगायचे नाही,कारण…जाहीरातीतून बक्कळ पैसा कमावणे आणि सरकारी यंत्रणांचा ससेमिरा चुकवणे….!पत्रकारितेशी बांधिलकी नाही..सत्य गुदमरले तरी..व्यवसायिकता आणि सत्ते पुढील शरणागती महत्वाची ठरते.
आज समाज माध्यमांवर किमान ३८ टक्के हे सरकार समर्थक असले तरी ६२ टक्के हे सरकारी धोरणांच्या विरोधात आहेत मात्र,ते वेगवेगळे विखुरलेले आहेत.ते सरकारचे समर्थक नाहीत तरी देखील अलीकडच्या काळात सरकार त्यांच्यात ही सोशल मिडीयाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात‘ शिरकाव’ करु पहाते आहे.लाखो रिच असलेले इंन्फ्लूअर्स आदी यांच्याद्वारे सरकारने या उर्वरित ६८ टक्क्यांमध्ये शिरकाव करण्यासाठी जोर लावला असून त्यांना ३८ टक्क्यांवरुन आणखी पुढे जायचे आहे…! किमान ५० टक्के तरी…! त्यामुळेच बहूतांश केंद्रीय मंत्री हे मुलाखती देण्यासाठी वृत्त वाहिन्यांशिवाय युट्यूबर्स,इन्फ्लूअर्सकडे जाताना दिसून पडतात….! इन्सटाग्रामर्संना स्वत:च्या पॅनलमध्ये बोलावले जात आहे.हे ही नसे थोडके तर मोदी समर्थक व संरक्षक उद्योगपती मुकेश अंबानी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात पोहोचलेले दिसून पडतात…!तंत्रज्ञान आणि ज्ञानाच्या बाबतीत आजचे सत्ताधारी देशातील विरोधी पक्षांच्या तुलनेत फार-फार पुढे असतात.त्यांच्याकडे संसाधने आहेत,धन आहे,उच्च विद्याभूषित वर्ग त्यांच्या मागे आहे,हाच त्यांचा राजकीय आधार आहे.राहूल गांधींपेक्षा आठ वर्षां आधीच मोदी ट्टीटर व फेसबुकवर आले होते…!
२०१४ च्या लोकसभा निवडणूकीपूर्वी तर फेसबुकवरची ‘वेळ’स्वत: त्यांनी किंवा त्यांच्यासाठी इतरांनी विकत घेतली होती,२०१४ ची निवडणूक ही पूर्णत: भारतातील जनमानसावर समाज माध्यमांच्या प्रभावात लढली गेली होती,ती निवडणूक ‘समाज माध्यम प्रायोजित’ होती….असा आरोप ही होत असतो,ज्याला जनता भूलली...मोदी व भाजपचे चरित्र निर्माण फेसबुकने फूकट केले नाही…यासाठी बक्कळ रक्कम फेसबुकला देण्यात आली,ती धनाढ्य उद्योगपतींनी दिली…या आरोपाच्या चौकशीची मागणी क्षीण आवाजात दबली…!२०१४ ची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने सगळ्या टूल्सचा प्रभावी वापर केला..!
यानंतर स्वत:चा राजकीय पक्ष चालविण्यासाठी त्यांनी फक्त अकरा वर्षात देशाच्या जवळपास सर्वच शहरात पक्ष कार्यालयांची निर्मिती केली.जमिनी विकत घेतल्या आहेत.तालुकास्तरावर देखील या राजकीय पक्षाची स्वत:ची पक्ष कार्यालये दिसतात.काँग्रेसला ही किमया सत्तेच्या पंचावन वर्षातही साधता आली नाही.३०० ठिकाणी तर भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची देखील कार्यालये बनली आहे.दिल्लीच्या मुख्य कार्यालयासह ज्याची किमतच हजार कोटींच्या वर आहे.फक्त ११ वर्षात ५० हजार कोटींंपेक्षा जास्त मालमत्ता या राजकीय पक्षाकडे आहे.राहूल गांधींची खासदारकी काही काळासाठी गेल्यानंतर दिल्लीत त्यांचे स्वत:चे घर ही नव्हते,हे देखील देशातील जनतेला ते बेघर झाल्यावर कळले.त्यांच्या क़ुटूंबियांकडे एक फॉर्म हाऊस आहे मात्र,घर नव्हते.चिंदंबरम पासून तर शीला दीक्षीत सगळ्या काँग्रेसच्या नेत्यांकडे दिल्लीत स्वत:चे बंगले होते.हरियाणाच्या काँग्रेस नेत्यांचे तर दिल्लीत एक नव्हे तर अनेक बंगले आहेत मात्र,राहूल गांधीला दिल्लीत स्वत:चे घर घेणे सूचले नाही.तरी ही ,सोशल मिडीयामध्ये सोनिया गांधी जगातील चौथी श्रीमंत महिला असल्याचा ’भ्रम’ सुनियोजितपणे पसरविण्यास ‘त्यांना’यश मिळाले आहे.यालाच म्हणतात आपापली ’तथ्ये!’
‘पत्रकारिता’ही गणतंत्र भारतात ’आदर्श’कधीही राहीली नाही…!सत्ता विरोधी कोणी राहू शकत नाही,राहील्यास नोकरी मिळणार नाही,टिकणार ही नाही.मात्र,काँग्रेसच्या काळात ’सरसकट’सगळ्याच वृत्त वाहिन्यांवर कब्जा झाला,सगळ्या राज्यातील,सगळ्या भाषेतील वृत्त वाहिन्यांवर ‘एकसारखाच’मजकूर चालविला जात राहीला,हे गणतंत्र भारतात या पूर्वी कधीही झाले नाही.त्या काळात ही ‘पत्रकारिता’टार्गेट झालीच होती मात्र,असे नाही झाले,संपूर्ण पत्रकारिताच टार्गेटेड करुन टाकली…!
हिंदू-मुस्लिम मत विभाजन यासाठी देशात यशस्वी आहेत कारण त्यांच्याकडे ‘तथ्य‘ पोहोचत नाही,पोहोचू शकत नाही,मात्र,त्यांच्याकडे ते संपूर्ण ‘असत्य‘आहे जे बघून,ऐकून ते राक्षस बनू शकतात,राक्षस बनताना दिसून ही पडतात. ‘एकच’राजकीय विचारधारा देशाच्या मानसिकतेत खूप-खूप खोलवर रुजत चालली आहे,खोलवर रुजली आहे.
सर्व्हेच सांगतो,जे ‘त्या’विचारधारेच्या विरोधात बोलतात,पोटतिकडीने सांगतात,त्यांना लोकं ओळखतसुद्धा नाही…!कारण…सोशल मिडीयाच्या मालकांनी त्यांचे म्हणने..खूप मोठ्या क्षेत्रापर्यंत पोहोचूच दिले नाही..!ध्रुव राठी जरी १०-११ कोटी लोकांपर्यंत पोहोचत असला तरी पवन सिंग,यादव ,मनोज तिवारी सारखे सरकार प्रायोजित गायक यांची रिच ४०० कोटींपर्यंत पोहोचून जाते…!एक भाषा…ते ही भोजपूरीतील गाणे..४०० कोटींपर्यंत पोहोचतात!ते भाजपच्या मंचावर दिसत असतात…!पत्रकार किंवा गायक हा पेशा नसून ‘वृत्ती’झाली आहे.ते आपल्या भाषेत गाणे म्हणत असले तरी मोदी-नितीश कुमारचे महिमामंडन करणारे गाणे ही सादर करतात आणि सहज त्या ‘रिच’पर्यंत पोहोचतात.हा सगळा एक ’पॅकेज’आहेत.
हजारो-हजार लोक समाज माध्यमात हिंदू-मुस्लिम भेदभाव,घृणा गडद करणारे ‘रिल्स‘बनवत आहेत.सगळ्याच प्रातांत,सगळ्याच भाषेत हे घडत आहेत.प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये १०० पैकी ९० अश्या रिल्स येतात जे माणसाला ’जहरी’बनविण्यास पुरेसे आहेत.खरं ‘ज्ञान’मध्य युगात देखील फक्त काही उच्च वर्णीय श्रेणीपर्यंत बंदिस्त ठेवण्यात आले होते,खरं ज्ञान ‘खालपर्यंत’झिरपू दिले गेले नव्हते.त्याचेच आधुनिक वर्झन सध्या भारतातच नव्हे तर संपूर्ण यूरोपात घडत आहे.फिलिस्तानवरील इस्त्राईलचा हल्ला,त्यात तार-तार झालेली माणूसकी याचे खरे चित्र तिथे ही समाज माध्यमात उमटत नाहीत…!
या सरकारने पंतप्रधान कार्यालयात पत्रकारांनी येणे तर सोडा एक मंत्री दुस-या मंत्र्यांच्या कार्यालयात देखील जाणे प्रतिबंधित केले आहे…!पत्रकारांचे पासेस बंद करण्यात आले आहे.सेंट्रल हॉल,संसदेच्या लॉबीमध्येही पत्रकारांना बातमी मिळत होती जी देशातील जनतेपर्यंत जात होती. जनतेपर्यंत सरळ जात असलेल्या तथ्यांना बंदिस्त करुन ठेवण्याची नीती सर्वात आधी मोदी-शहाने गुजरातमध्ये अवलंबली.यानंतर केंद्रात सत्ता आल्यावर याचीच कठोर अंमलबजावणी केली.भाजपने ज्या पद्धतीने पक्षाचा अध्यक्ष नितीन नवीन यांची नियुक्ती केली,हे त्याचेच एक उदाहरण आहे.भाजपच्या एकनिष्ठांना देखील याची कल्पना नव्हती.मंत्री मंडळातील मंत्र्यांना देखील मोदी-शहांचे निर्णय माहिती नसतात,पत्रकारांना तर सोडूनच द्या.नोटबंदी याचे उत्तम उदाहरण आहे.देशाच्या रिझर्व बँकेला देखील देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम करणा-या इतक्या महत्वाच्या निर्णयाची माहिती नव्हती….!आधी निर्णय,घोषणा नंतर रिझर्व बँकेच्या गव्हर्नरची या घोषित निर्णयावर स्वाक्षरी….!समाज माध्यमात मात्र,या निर्णयाच्या समर्थनाची लाखो माहिती विविध प्लॅटफॉर्म्सवर धबाधबा कोसळली….!
तथ्यांवर पत्रकारांचा आता कोणताही प्रभाव राहीला नाही,अनेकांनी तर भौतिक आणि क्षणभंगूर लाभासाठी सरकारचीच ‘दलाली’स्वीकारली आहे.जे दलाली स्वीकारत नाहीत,त्यांची रिच,त्यांचा आवाज तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दाबला जात आहे.आज गरज तथ्य सांगणा-या नव्या फेसबुक,ट्टीटरची आहे…जे कोणी बनवू शकत नाही,खरेदी करु शकत नाही…!भारत हा..चायना नाही,चायनाचे स्वत:चे फेसबुक,ट्टीटर आहे ते जरी सरकारी नियंत्रणात असले तरी चायना मार्क जुबेर किंवा एलन मस्कचा गुलाम नाही.युट्यूब देखील फ्री स्पेस नाही.निवडणूक आयोगावर कोणताही भाग केल्यास तो दर्शकांसाठी उपलब्ध नसतो!अनेक युट्यूबर्सनी ही तक्रार केली निवडणूक आयोगावरील त्यांचे एपिसोड हटवून टाकण्यात आले,ब्लॉक करण्यात आले,..‘त्यांना’ वाटेल,ते तथ्य कोंडू शकण्याचे सामर्थ्य आजच्या काळात त्यांच्यात आहे….!
बीबीसीने मोदींवर जी डॉक्यूमेंट्री बनवली ती भारतात प्रसारित होऊच शकली नाही…!
काही ज्येष्ठ युट्यूबर्स पत्रकार म्हणतात,आम्हाला जर आमचा स्वाभिमान विकायचाच असता तर सरकारला विकला असता,आम्ही तर उघडपणे ‘तथ्य‘मांडत आहेत मात्र,त्यांनीही आपला स्वाभिमान विकलाच आहे तो आहे ‘व्यूज’साठी.लाखो व्यूज त्यांना पैसा कमविण्याचे सरळ-सोपे साधन झाले आहे.व्यूजसाठी ते ही खोटे बोलतात.व्यूजसाठी ते पंधरा वेळा नितीशकुमार यांना लालू यादवांसोबत भेट देते झाले,चंद्रबाबू नायडूंचे अनेकवेळा मोदी सरकारमधून समर्थन परत घेताना दाखवून चूकले आहे.ज्या मोदी-शहांच्या कृती व निर्णयांविषयी त्यांच्याच जवळच्या मंत्र्यांना माहिती नसते,ती माहिती हे पत्रकार युट्यूबर्स, व्यूजसाठी प्रेक्षकांना सांगतान दिसून पडतात.ज्या काही निवडक सूचना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ‘बाहेर’येतात,त्या सूचनांच्या आधारे मनगढंत व खोटे ऐपिसोड्स युट्यूबवर टाकत असतात आणि ते सुद्धा ‘तथ्यांचा’गळा घोटण्यात फार मोठा हातभार लावण्याचे काम करीत आहेत….!
समाज माध्यमात जी एक लहानशी स्पेस वाचली होती,ज्यामुळे या देशात लोकशाहीचा श्वास चालत आहे,ते त्याचेच नुकसान करीत आहेत.लोक दु:खी आहेत,निराश आहेत त्यामुळे लोक या पत्रकार युट्यूबर्सचे एपिसोड्स बघतात,त्यांच्या खोट्या नेरेटीव्हमध्येही निराश,हताश जनता स्वत:साठी समाधान,शांती शोधत असते,हे युट्यूबर्स या निराश लोकांना तथ्य सांगण्या ऐवजी खोट्या माहितीतून संतुष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत.यामुळे या माध्यमात देखील जे फार-फार थोडे पत्रकार जे पत्रकारितेच्या आणि जिवनाच्या नीतीमूल्यांवर काम करीत आहेत,त्यांच्या विश्वासहर्तेचाही गळा घोटण्याचे काम हे पत्रकार युट्यूबर्स व्यूजमधून लाखो कमविण्यासाठी करताना दिसून पडत आहेत.मोदी-शहाची जोडी तुटतेय..योगी-मोदींवरील एपिसोड्स हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
दूर्देवाने समाज माध्यमांवरील पत्रकार युट्यूबर्सचे जे अंदाज खोटे ठरलेत,ते व्हीडीयोज हटविण्याचे काम देखील ते करीत नाहीत….!स्वीकारत का नाही?मात्र,जे विकल्या जातंय त्यावर आणखी एक खोटा व्हिडीयो व्हायरल करण्यास ते सज्ज होतात.चुकीच्या माहितीवर चूकून व्हिडीयो टाकला असेल तर व्यूज आणि लाखो रुपयांच्या हव्यासापायी हटवण्याचे धारिष्ट जे युट्यूबर्स पत्रकार दाखवित नाही,त्यांना इतरांना ‘अनैतिक‘म्हणण्याचा अधिकार पोहोचत नाही….!
सत्तेसाठी ‘विभाजन’गरजेचे आहे जनतेसाठी ’संगठीत ’होणे हेच त्यावर एकमेव उत्तर आहे.राहीला प्रश्न तथ्ये कुठून मिळवायची?तर इंटरनेटच्या माध्यमातून जी एक फार छोटीशी जागा शिल्लक राहीली आहे,ती आहे न्यूज वेबसाईट्स.यावर सध्या तरी सरकारचे सरळ नियंत्रण नाही.मात्र,या तथ्यासाठी वेबवाईट्स संपादकाना पैसा द्यावा लागतो,डोमेनसाठी आणि सर्व्हरवर जागा घेतल्यामुळे त्याचे मासिक भाडे द्यावे लागते.या लोकांनीही सरकारकडून जाहीराती घेतल्या तर त्यांना सरकारची बाजू मांडावी लागेल.बाजू मांडण्याची नैतिकता यात दडली असली तरी विरोधात लिहण्याचे स्वातंत्र्यही अद्याप तरी न्यूज वेबसाईट्स संपादकांची शाबूत आहे.हल्ली पत्रकारितेतील तथ्यांसाठी इतकीच स्पेस उरली आहे.
खरी गरज आहे अश्या तथ्यांची मांडणी करणारे संगठीत होण्याची.लोकांनी अश्या ॲप्सला पाठींबा देण्याची देखील गरज आहे. निदान आज तरी अश्या एप्सवरील बातम्यांवर लोकांचा विश्वास अढळ आहे की ही बातमी सरकारी पैशातून किंवा दबवातून आली नाही.यावरील बातम्या त्या-त्या पत्रकारांच्या योग्यतेवर,बौद्धीक क्षमतेवर अवलंबित असून निदान सत्य शोधण्याच्या प्रयत्न करणारी आहे.या न्यूज वेबसाईट्स तसेच तत्सम ऍप्सवरील बातम्यांमधील नैतिकता ही शाबूत राहीली पाहिजे….!
‘हमारे खर्चे पर आजाद है खबरे’हीच गणतंत्र देशातील पत्रकारिता आता शिल्लक राहीली आहे.
(भाग-२ मध्ये वाचा गणतंत्र देशात काँग्रेसी पत्रकारितेचा काळ)
………………………………………………….
परिणामी,देशातील सामान्य माणूस ‘तथ्य’म्हणजे ख-या बातमीच्या शोधात नेमके कुठे जाऊ,या ‘दयनीय‘अवस्थेपर्यंत पोहोचले आहेत.गणतंत्राच्या काळात देशातील पत्रकारिता ‘तथ्य विरहीत समाज घडविण्याचा प्रयत्न करताना दिसून पडते.
Advertisements

Advertisements

Advertisements
