फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजआजच्या काळात डिजिटल माध्यमांचे महत्व सर्वाधिक: ब्रिजेश सिंग

आजच्या काळात डिजिटल माध्यमांचे महत्व सर्वाधिक: ब्रिजेश सिंग

Advertisements
राज्याचे मुख्य माहिती संचालकंची डिजिटल माध्यमकर्मींनी घेतली भेट
नागपूर,ता.२१ डिसेंबर २०२४: जागतिक पातळीवर काळाच्या ओघात परंपरागत मुद्रित माध्यमे ही मागे पडत असून डिजिटल माध्यमांचे महत्व ठलकपणे अधोरेखित झाले आहे.अश्‍या वेळी भारतासारख्या देशात मात्र डिजिटल माध्यमांसाठी गेल्या दीड दशकातही कोणतेही कायदेशीर प्रारुप केंद्र सरकारला निर्धारित करता आले नसल्याने, भारतातील अनेक शहरात डिजिटल माध्यमकर्मींना,मुद्रित व इलेक्ट्रोनिक माध्यमांच्या तुलनेत कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ होताना दिसत नाही.डिजिटल माध्यम, मुद्रित माध्यमांतून अनेक अनुभवी पत्रकारांनी अंगिकारले असून,पत्रकार म्हणून त्यांनाही इतर माध्यमांसारखी शासनाकडून वागणूक व संधी मिळावी,असे निवेदन आज दिनांक २१ डिसेंबर रोजी विधान सभा परिसरातील कक्षात मुख्य राज्य माहिती संचालक ब्रिजेश सिंग यांना डिजिटल प्रतिनिधिंनी दिले.
या निवेदनावर नागपूर तसेच विदर्भातील अनेक डिजिटल माध्यमकर्मींनी स्वाक्षरी केली असून जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांच्याकडून सातत्याने मिळणा-या दुय्यम वागणूकीविषयी देखील सिंग यांच्याकडे तक्रार करण्यात आली.
एकीकडे महाराष्ट्र राज्य मंत्रालय सचिवालयातून मुद्रित,इलेक्ट्रॉनिक माध्यमांसोबतच डिजिटल माध्यमातील वेब न्यूज पोर्टलचे संपादक,संचालक,यूट्यूबर्स पत्रकार यांच्यासाठी विधी मंडळाच्या अधिवेशनासंदर्भात, विधान भवनात प्रवेशासाठी रिसतर शासकीय प्रवेश पत्रे बहाल केली जातात,त्यासाठी रिसतर अर्ज मागवले जातात मात्र,दूसरीकडे जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार हे शहरातील कोणत्याही शासकीय व अशासकीय कार्यक्रमात डिजिटल माध्यमकर्मींना डावलण्याचे काम करीत असल्याची तक्रार सिंग यांच्याकडे नोंदवण्यात आली.
यावर,सिंग यांनी आज सर्वाधिक महत्वाचे प्रचार माध्यम हे डिजिटल माध्यम असल्याचे मान्य केले.राजभवनात नुकत्याच पार पडलेल्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमात मुद्रित तसेच इलेक्ट्रोनिक माध्यमांसोबत काही जागा डिजिटल माध्यमकर्मींसाठी देखील राखीव ठेवण्याचा मी प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले मात्र,जागे अभावी शक्य झाले नाही.परंतू,डिजिटल माध्यमांचे महत्व ओळखून लवकरच शासनाच्या जाहीराती या माध्यमांना देखील मिळाव्या व शासनाच्या विविध योजनांचा जलद् प्रचार व्हावा यासाठी धोरण निश्‍चित करीत असल्याचे ते म्हणाले.आज संपूर्ण मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमे देखील डिजिटल प्लॅटफॉर्मचाही उपयोग करीत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.नागपूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून डिजिटल माध्यमकर्मींनी यासाठी माहिती संचालनाच्या ई-मेलवर सूचना पाठवाव्या,असे आवाहन त्यांनी केले.
आजच्या काळात डिजिटल माध्यमांचे महत्व डावलले जाऊ शकत नसल्याचे ते म्हणाले.आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो व मोबाईलवरील वृत्ते तसेच व्हायरल होणारे यूट्यूबवरील माहितीचे व्हिडीयोज हे क्षणार्धात लाखो लोकांपर्यंत सहज पोहोचतात.त्यामुळे शासनाच्या विविध योजना तत्परतेने डिजिटल माध्यमांच्या पत्रकारांकडून लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी याचा उपयोग शासनस्तरावर व्हावा,यासाठी लवकरच धोरण निश्‍चित केले जाईल व डिजिटल माध्यमकर्मींनाही इतर माध्यमकर्मीसारखा योग्य तो सन्मान व शासकीय जाहीरातीतून निधी प्राप्त करुन दिला जाईल,असे आश्‍वासन त्यांनी दिले.
डिजिटल माध्यमकर्मींना अधिस्वीकृती पत्र मिळण्याबाबत विचारले असता, शासकीय स्तरावर प्रारुप निश्‍चित नसल्याने सर्वांच्या सूचना संकलित करुन धोरण ठरविण्याचा विचार करता येईल,असे सांगून डिजिटल माध्यमकर्मींसाठी संख्येचाही विचार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.एकेका शहरातच दोनशे ते तीनशे डिजिटल माध्यमकर्मी असल्याने प्रत्येकाला शासकीयस्तरावर लाभ देणे शक्य नसल्याचे वास्तव मांडत,यासाठीच आधी निकष ठरवले जाईल,असे त्यांनी सांगितले.

रापतवार यांच्याकडून सापत्न व भेदभावपूर्ण वागणूक,वारंवार डावलणे,डिजिटलमध्यकर्मींसोबत बोलताना तुच्छतेचा भाव तसेच भाषेचा लहजा अवमानकारक असणे,यावर नाराजी प्रकट केली असता,याची योग्य दखल घेतली जाईल,असे आश्‍वासन त्यांनी दिले.

याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार डॉ.ममता खांडेकर,भीमराव लोणारे,विजय खवसे,अमित वानखेडे,प्रा.गजेंद्र गवई,भास्कर अतकरी,प्रेम मुंदाफळे, डॉ.अतुल लामसोंगे,मुकुल सुर्यवंशी,नावेद आझमी,ज्ञानेश्‍वर गुरव,तहसीन अंसारी,विकास जुमरे,रियाज शेख,चांदनी पाठक,तारीक.एच,दूर्गा प्रसाद,श्रीकांत सहारे,अशोक ,सुनील साळवे,मनीषा श्रीनिवास,शीतल नंदनवार आदी उपस्थित होते.
…………………..
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या