नागपूर,ता.१२ जून २०१४ : जम्मू कश्मीरमध्ये रविवारच्या सायंकाळी शिवखेडी धामचे दर्शन करुन परतणा-या भाविकांच्या दोन बसेसवर उग्रवाद्यांनी हल्ला केला.रस्त्याच्या मधोमध उभे राहून उग्रवाद्यांनी अंधाधुंध बसेसवर गोळ्यांचा वर्षाव केला.यात बसचालकाला गोळी लागल्याने बस अनियंत्रित होऊन दरीत कोसळली.या घटनेत बसचालकासह ९ लोकांचा मृत्यू झाला तर ३७ भाविक जखमी झाले.बस दरीत कोसळ्यानंतर देखील उग्रवादी वरुन ताबडतोब गोळीबार करीत होते जेणेकरुन कोणीही जिवंत राहू नये.या हल्ल्यात चार उग्रवाद्यांचा समावेश होता.यातील दोन जण गोळीबार करीत होते तर दोन जण त्यांना कव्हरिंग करीत होते.महत्वाचे म्हणजे भारतात नव्या सरकारचा शपथविधी सुरु असताना एक्स या सोशल मिडीयावर ’ऑल आइज ऑन रियासी’ ट्रेण्ड करीत होता.
या घटनेच्या विरोधात नागपूरात बजरंग दलाने बडकस चौकात निषेध आंदोलन केले.मात्र,आंदोलनादरम्यान पुतळा पेटवित असताना अचानक त्यावर पेट्रोल टाकण्यात आल्याने उडालेला भडका यातून तीन ते चार जणांचे हात भाजले,तर यातील एकाच्या शर्टाने पेट घेतला.बजरंग दलाच्या इतर कार्यकर्त्यांनी त्यांना वेळीच सावरले.व्हिडीयोमध्ये पुतळा जाळण्याच्या आधीच एकाने त्यावर बाटलीतून पेट्रोल ओतल्याचे स्पष्ट दिसत आहे मात्र,विश्व हिंदू परिषदेचे निरंजन रिसालदार यांनी,आम्ही संपूर्णत: रॉ मटेरियलने तयार करण्यात आलेला पुतळा तयार केला होता जो लवकर पेट घेणारा नव्हता,असे खास ‘सत्ताधीश ’सोबत बोलताना सांगितले.,अचानक त्यावर बाहेरच्या कोणीतरी व्यक्तीने पेट्रोल ओतले व भडका उडाला,असा आरोप केला! ज्यांच्या हातावर ‘टॅटू’होते त्यांच्या हातांना जास्त इजा झाल्याचे त्यांनी सांगितले मात्र,कोणीही गंभीर जखमी नसल्याचे ते सांगतात.जखमींची नावे सांगण्यास त्यांनी नकार दिला.
याप्रसंगी बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जिहादींच्या विरोधात तीव्र नारेबाजी केली.विश्व हिंदू परिषदेचे गोवा आणि महाराष्ट्राचे प्रभारी गोविंद शेंडे यांनी केंद्र सरकारला इशारा देत येत्या २९ जून पासून सुरु होणा-या बाब अमरनाथ यात्रेदरम्यान अशी कोणतीही घटना घडू नये याची संपूर्ण काळजी केंद्र सरकारने घ्यावी ,असे निवेदन आम्ही राज्यपालांना देखी देत आहोत,एक ही हल्ला भाविकांवर होऊ नये,अन्यथा संपूर्ण देशात आंदोलन केले जाईल असे सांगितले. कश्मीरमध्ये तीन दिवसात तीन हल्ले या मागील कारण म्हणजे नुकतेच ज्या निवडणूका देशात पार पडल्या,त्या निवडणूकीत कश्मीरच्या जनतेने जवळपास ६० टक्के मतदान केले.ज्या कश्मीरमध्ये दहा टक्के ही मतदान होत नव्हते तिथे ६० टक्के मतदान झालेले बघून पाकिस्तानी जिहादींनी व कश्मीरमधील त्यांच्या समर्थकांनी हा भयाड हल्ला केला असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.धारा ३७० समाप्त झाल्यानंतर कश्मीरच्या जनतेने भयमुक्त होऊन मतदान केले,ते बघता आपली उपस्थिती दर्शविण्यासाठी व पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी हा भयाड हल्ला करण्यात आल्याचा आरोप शेंडे यांनी केला.
थोडक्यात,कश्मीरमधील हिंसेचा संपूर्ण देशच निषेध करीत आहे मात्र,अश्या स्वरुपाचे निषेध आंदोलन करीत असताना विश्व हिंदू परिषद,बजरंग दलसारख्या संघटनांनी अतिरिक्त काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. अतिशय बेजबाबदारपणे पुतळ्यावर इतक्या वरुन पेट्रोल ओतणारी व्यक्ती ही कोण होती?बाहेरची की संघटनेची,हा प्रश्न दुय्यम ठरतो,ज्यांच्या हातांना गंभीर इजा झाली त्यांच्या कुटूंबियांच्या काळजीचे मोल हे अधिक आहे.
याशिवाय या संघटना ज्या भारतीय जनता पक्षाच्या विचारांचे समर्थन करतात त्या पक्षाने कश्मीरमध्ये आपला एक ही उमेदवार का उभा केला नाही?कलम ३७० हटविल्याचे संपूर्ण श्रेय घेणा-या भाजपला हा सवाल विचारला जाणार का?असा सवाल आता केला जात आहे.