फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजशरद पवारांनी माफ केलेले ७२ हजार कोटींचे शेतक-यांचे कर्ज पवारांच्याच सहकार बँकेत

शरद पवारांनी माफ केलेले ७२ हजार कोटींचे शेतक-यांचे कर्ज पवारांच्याच सहकार बँकेत

Advertisements

शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणावर लागलेला कलंक

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम यांचा घणाघात

नागपूर,८ मार्च २०२४: देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांचे महाराष्ट्रातील जनतेने ओझे वाहिल्याचे विधान केले. ही बाब पूर्णतः समर्थनीय असल्याचे सांगत शरद पवार हे महाराष्ट्रातील राजकारण व  तेरा कोटी जनतेला लागलेला कलंक आहेत, अशी जहाल टिका भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रवक्ते माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या टिकेचा ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी पत्रकार परिषदेत चांगलाच समाचार घेतला. याप्रसंगी भाजपा प्रवक्ते चंदन गोसावी, महामंत्री रामभाऊ आंबुलकर, माजी नगरसेवक सुनील हिरणवार उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना धर्मपाल मेश्राम म्हणाले,की शरद पवार हे देशाला सर्वाधिक काळ लाभलेले कृषिमंत्री आहेत. २००४ ते २०१४ या दहा वर्षाच्या कृषिमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी एकही शेतकरी हिताचे कार्य केले नसल्याचा आरोप मेश्राम यांनी केला. वेदप्रकाश आर्य यांनी पवारांनी ७२ हजार कोटींची कर्जमाफी केळ्याचे विधान केले. आर्य यांच्या विधानाचा समाचार घेताना ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी ते ७२ हजार कोटी शेतकऱ्यांना मिळाले नसून शरद पवारांच्या अधिपत्याखालील मृतावस्थेत असलेल्या सहकारी बँकांना पुर्नजिवित करण्यासाठी वापरले गेल्याचा घणाघात केला.

१९९३ मध्ये तत्कालीन मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त गो. रा. खैरनार यांनी शरद पवारांचे संबंध दहशतवादी दाऊद इब्राहिम यांच्यासोबत असून त्यांनी सुधाकरराव नाईक यांना खुर्चीवरून खेचण्यासाठी मुंबईत दंगल घडविल्याचा आरोप केला. याउपर मुंबईचे तत्कालीन डीजीपी उल्हास जोशी यांनी शरद पवारांचे संबंध थेट दहशतवादी दाऊद इब्राहिम, हितेंद्र ठाकूर आणि पप्पू कलानी यांच्यासोबत असल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात पुराव्यासह शपथपत्र दाखल केले. गुन्हेगारी प्रवृत्तींना हाताशी घेऊन आपले राजकारण साधून घेण्याचे काम मागील ५० वर्षात शरद पवारांनी केल्याचा देखील आरोप मेश्राम यांनी केला.

१९९० दशकाच्या उत्तरार्धात आपले राजकीय गुरु यशवंतराव चव्हाण यांच्या पाठीत खंजीर खुपसून आमदार फोडून स्वतः मुख्यमंत्री झाले. २३ नोव्हेंबर १९९४ ला गोरगरीब गोवारी बांधवांच्या आंदोलनावर अमानुष गोळीबार करून ११४ गोवारी बांधवांचे हत्याकांड घडले. मुख्यमंत्री असताना गोवारी बांधवांच्या आंदोलनाची साधी दखल घेण्याची तसदी न घेणारे शरद पवार ११४ गोवारी बांधवांच्या हत्येस जबाबदार असल्याची देखील टीका धर्मपाल मेश्राम यांनी केली.

विश्वासघातकी, भ्रष्टाचारी, परिवारवादी, गुन्हेगारी प्रवृत्तीला हाताशी धरून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधणाऱ्या शरद पवार यांची बाजू मांडताना त्यांचे प्रवक्ते व देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करत असतील तर भाजपा हे कदापि सहन करणार नाही, असा इशारा प्रदेश उपाध्यक्ष ॲड.धर्मपाल मेश्राम  यांनी  दिला.
……………………………………

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या