फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजनिवडणूक आयोगाचा निर्णय योग्यच:प्रशांत पवार

निवडणूक आयोगाचा निर्णय योग्यच:प्रशांत पवार

Advertisements

सर्वाधिक आमदार,खासदार,संघटना,पदाधिकारी अजित पवार गटाकडे

संविधानाचा खून नाही निवडणूक आयोगाकडून संविधानाचे रक्षण:प्रशांत पवारांचा दावा

नागपूरात राष्ट्रवादी कार्यालयासमोर जल्लोष

नागपूर,ता.७ फेब्रुवारी २०२४: निवडणूक आयोगाने अजित पवार पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला खरा राष्ट्रवादी पक्ष मानून पक्षासह घड्याळ हे निवडणूक चिन्हही या गटाकडे दिले,निवडणूक आयोगाचा हा निर्णय योग्यच असल्याचे विधान, राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते व शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी केले.बजाज नगर येथील पक्ष कार्यालयात जल्लोषा नंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

निवडणूक आयोगाने संपूर्ण कागदपत्रांची छानणी करुनच निर्णय दिला असल्याचे त्यांनी सांगितले.निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष म्हणून अजितदादा पवार तसेच कार्याध्यक्ष म्हणून प्रफूल्ल पटेल यांना मान्यता दिली आहे.निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर अनेक वृत्त वाहीन्यांवर निवडणूक आयोगावर टिका केली जात आहे.मात्र,निवडणूक आयोग देशातील एक स्वायत्त संस्था असून या संस्थेत उच्च विद्याभूषित अधिकारी कार्य करतात.अशी टिका योग्य नसल्याचे ते म्हणाले.

आज ४१ आमदार ५ विधान परिषेतील आमदार,२ लोकसभेतील खासदार,१ राज्यसभेतील खासदार,नागालॅण्डमधील ७ तर झारखंडमधील एका आमदाराने अजित पवार यांना पाठींबा दिला आहे.याशिवाय राज्यातील सर्वाधिक संघटना व पदाधिका-यांचे समर्थन अजितदादा पवार यांना मिळाले आहे.या सर्व पार्श्वभूमीवर तसेच पक्षाची घटना तपासून निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे सोपविले असल्याचे प्रशांत पवार यांनी सांगितले.अजित पवारांकडे पक्ष आणि चिन्ह येताच अनेक इच्छूकांनी राष्ट्रवादी पक्षात येण्याची तयारी दाखवली असल्याचे ते म्हणाले.

निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर विरोधक,एक माजी मंत्री हे संविधानाची हत्या झाली असल्याची ओरड करीत आहेत मात्र,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहले आहे, उलट त्या संविधानाच्या रक्षणाचे कार्य भारताच्या निवडणूक आयोगाने केले असल्याचे प्रशांत पवार यांनी सांगितले.

एका प्रश्‍नाच्या उत्तरात प्रशांत पवार यांनी सांगितले की जनतेचे प्रश्‍न साेडविणे हे अजित पवार आधीपासूनच करत आले आहे याशिवाय नागरी उड्डाण मंत्री असताना प्रफूल्ल पटेल यांनी भारतातील अनेक विमानतळांच्या निर्मितीला चालना दिली आहे.त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला अविरत काम करणारे तसेच विकासासाठी झटणारे अजित पवार व प्रफूल्ल पटेल यांच्या कामाचा झपाटा माहिती असल्याचे प्रशांत पवार यांनी सांगितले.

एका पक्षाचे दोन गट झाले असल्याचा प्रश्‍नावर,गट कुठे झाले?असा प्रतिप्रश्‍न त्यांनी केला.पक्ष हा आमचाच आहे उलट यावर आता शिक्कामोर्तब झाले.ज्यांना आमचा पक्ष गट वाटतो त्यांना प्रश्‍न करावा हे गट कुठून आणले?ज्यांना आमचा पक्ष गट वाटतो त्यांनी न्यायालयात दाद मागावी,असे आवाहन प्रशांत पवार यांनी याप्रसंगी केले.

पक्षाचे वरीष्ठ नेते शरद पवार यांचे पक्ष कार्यालयावर लावण्यात आलेले छायाचित्र झाकणे,याविषयी छेडले असता,शरद पवार यांनीच आव्हान केले होते की त्यांचे छायाचित्र वापरल्यास ते कायदेशीर कारवाई करतील.आता राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवार यांचा आहे यावर शिक्कामोर्तब झाल्यावर, त्यांनाच आता नवीन पक्ष नव्या निवडणूक चिन्हासह काढावा लागेल,त्यामुळे इतर कोण्या पक्षाच्या नेत्याचे छायाचित्र वापरणे योग्य नसल्यानेच आम्ही त्यांचे छायाचित्र झाकून ठेवले असल्याची स्पष्टोक्ती प्रशांत पवार यांनी दिली.

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर नागपूरात बजाज नगर येथे राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला.

………………………………………………

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या