फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजपुनापूर नागनदीचा पूल वर्षभरापासून बंद!

पुनापूर नागनदीचा पूल वर्षभरापासून बंद!

Advertisements

दुरुस्तीच्या नावाखाली वर्षभरापासून लाऊन ठेवले कठडे

राष्ट्रवादी अर्बन सेल व नागरिकांचा मनपा सहायक आयुक्तांना घेराव

नागपूर,ता.२३ ऑगस्ट २०२३: शहराच्या आत दुर्गानगर ते भवानी माता मंदिर पुनापूर नागनदीवर असलेला पूल धोकादायक झाल्याने त्यावरून वाहतूक पूर्णपणे बंद आहे. पुलाच्या कामाच्या संदर्भात वारंवार मागणी करून कुठलीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे अर्बन सेल आणि स्थानिक नागरिकांनी आज लकडगंज झोन येथे सहायक आयुक्तांना घेराव घालून आंदोलन केले

क्षतिग्रस्त पुलाच्या संदर्भात वारंवार मागणी करून नागपूर महानगरपालिकेने कुठलीही दखल घेतली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेल आणि नागरिकांनी केला सहा.आयुक्तांचा घेराव. कार्यालयात टाळे ठोकण्याचा आणि आमरण उपोषणाचा दिला इशारा .

.शहरातील भरतवाडा मुख्य रस्त्यापासून दुर्गानगर गल्लीपासून पुढे गेल्यानंतर नागनदीचा पूल ओलांडला असता, भवानी माता मंदिर , पूनापुर आणि पारडी चौकाकडे जाणारा परिसर आहे. या सर्व परिसराला जोडणारा नागनदीवरील पूल कमकुवत झाला होता. मागील वर्षी महानगर पालिकेने तेथे जाऊन पुलाचा काही भाग जेसिबी लावून तोडत मार्ग बंद केला आणि नागरिकांना आश्वस्थ केले कि काही दिवसातच याच्या दुरुस्तीचे कार्य करून वाहतूक सुचारू करण्यात येईल परंतु आजवर कुठलेलंही कार्य या संदर्भात झाले नाही.

सदर पुलाच्या दोन्ही बाजूस कठडे बसवण्यात आले आहे त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून पुलाच्या पलीकडे राहणाऱ्या नागरिकांना दुसऱ्या बाजूने जाण्यासाठी मोठे अंतर वाढले आहे.जवळपास वर्षभरापासूनचा अधिक काळ हा पूल वाहतुकीसाठी पूर्णतः बंद झालेला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांची तसेच या भागात येणाऱ्या-जाणाऱ्यांची तसेच शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. मोठ्या लोकसंख्येचा हा भाग गणला जातो.

असे असले तरी, पालिका प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक नगरसेवक,आमदार, खासदार या प्रश्नाकडे फारसे गांभीर्याने बघताना दिसत नाही. सध्या पालिकेमध्ये प्रशासक राज सुरू आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मनावर घेतले तर हा प्रश्न सुटू शकतो. मात्र त्यांनाही सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यात स्वारस्य नसल्याचे दिसून पडतंय असे यावेळी बोलतांना श्रीकांत शिवणकर यांनी सांगितले .

त्यामुळे या प्रश्नात आता राष्ट्रवादी अर्बन सेलने लक्ष घातले असून पुलाच्या दुरुस्तीचे काम प्रशासनाने त्वरित सुरु करावे. अथवा यासाठी संघर्ष करावा लागेल, असा इशारा पूर्व विभागाचे अध्यक्ष एकनाथ फलके यांच्यातर्फे मनपा सहा . आयुक्त गणेश राठोड यांना देण्यात आला आहे.

प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास या प्रश्नासाठी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मोठे जन आंदोलन उभे केले होण्याची चिन्हे आहेत.या आंदोलनात या भागातील शेकडो नागरिकांनी लकडगंज झोन परिसरात एकत्र येऊन सहायक आयुक्तांचा घेराव केला आणि आयुक्त यांच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला.

येत्या आठदि वसात पुलाचे कार्य सुरु झाले नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे . या प्रसंगी अर्बन सेल तर्फे मेहबूब पठाण,एकनाथ फलके, हेमंत यादव, मंगेश सावरकर, अनिकेत डोये घनश्याम शाहू, राजन पटेल दिलीप शाहू, सचिन पाटील, ललित सिंह, संदीप सुरडकर, संजय जोशी, संदीप उके , संदीप खंगार, कार्यकर्ते आणि क्षेत्रातील दोनशेहून अधिक नागरिक सहभागी होते.

…………………………..

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या