फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशकेंद्रीय मंत्री भूपेंद्रसिंह यादव यांचा असाही ‘राजेशाही’ठाट!

केंद्रीय मंत्री भूपेंद्रसिंह यादव यांचा असाही ‘राजेशाही’ठाट!

Advertisements

दोन वेळा सहा स्वीय सहायकांसह विमानाचे तिकीट केले रद्द!

पंतप्रधान मोदी जनतेच्या कराचा पैसा मंत्र्यांकडून वसूलणार का?नागपूरकरांचा सवाल

नागपूर,ता.२५ जून २०२३: पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळाला ९ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सध्या केंद्रीय मंत्र्यांकडून महाजनसंपर्क अभियान देशभर राबविण्यात येत आहे.विदर्भातील सभेसाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्रसिंह यादव हे उपराजधानी नागपूरात मुक्कामी असताना त्यांनी काल शनिवार दिनांक २४ जून रोजी सायंकाळी साढे पाच वाजताचे दिल्लीचे तिकीट ऐनवेळी रद्द केले,यानंतर रात्री साढे आठ वाजता दुस-या विमानाचे तिकीट काढून,त्यांच्या स्वीय सहायकांनी बोर्डींग पास तपासणी पूर्ण केली असतानाही ती देखील वेळेवर रद्द केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे ते त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार अजय संचेती यांच्या निवासस्थानी भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी गेले होते असे त्यांच्या स्वीय सहायकांनीच भूपेंद्र सिंह यादव यांना भेटण्यासाठी दूपारी ४ वाजतापासून ताटकळत बसलेल्या आगंतूकांना दिली असल्याची माहिती समोर आली आहे.

या केंद्रीय मंत्र्यांचे व त्यांच्या स्वीय सहायकांसाठी वेळेवर हॉटेल रेडीसन ब्ल्यूमध्ये महागड्या खोल्या बूक करण्यात आल्या असल्याची माहिती आहे.एकीकडे पंतप्रधान मोदी हे सातत्याने जनसेवेचे व्रत व प्रधानसेवक असल्याची वल्गना करीत असताना त्यांच्याच सरकारमधील काही जनसेवक-शिलेदार हे कश्‍याप्रकारे जनतेच्या कराचे लाखो रुपये आपल्या बेताल वागण्यातून वाया घालवतात,याचीच चर्चा त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी घडत होती.

विशेष म्हणजे त्यांच्या स्वीय सहायकांमध्ये सर्वाधिक ‘यादव’च असल्याने ते त्यांचे जवळचे नातेवाईक असल्याचे देखील बोलले जात होते.पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या पहील्या कार्यकाळात, मंत्र्यांनी स्वीय सहायक म्हणून नातेवाईकांना न ठेवण्याचे आदेश दिले असताना,अनेक मंत्र्यांचा कारभार हा त्यांचे जवळचे नातेवाईकच सांभाळताना आढळून येताना दिसतात.

विशेष म्हणजे चंद्रपूर येथील दौ-यात काही पर्यावरणवाद्यांनी भूपेंद्र यादव यांना चंद्रपूर येथील प्रदुषणाबाबत सविस्तर अहवाल सादर केला.नागपूरातील अनेक प्रकल्पांबाबत नागपूरातील काही पर्यावरणवाद्यांनी न्यायालयाचे दार ठोठावले आहे.असे असताना त्यांना काल त्यांच्या भेटीची वेळच मिळू शकली नसल्याची माहिती आहे.

खा.अजय संचेती यांच्याकडे भोजनामुळे त्यांनी पर्यावरणवाद्यांची भेट चुकवली कि प्रकल्पांवरील चर्चेसाठी विमान चुकवले,यावरच मग बराच वेळ चर्चा झडत राहीली…………!

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या