
आता तरुणाईच्या भावाना देखील ऐकण्याची वेळ
एक जिल्हाध्यक्ष ही नेमायचा असल्यास पक्षाच्या अध्यक्षांचे पत्र हवे: संघटनेत करणार बदल
नागपूरातील नेते नसले तरी माझ्यासोबत सामान्य कार्यकर्ते
गांधी परिवारासाठी कोणीही पुरस्कृत उमेदवार नाही:ते तटस्थ राहतील:थरुर यांचा विश्वास
नागपूर,ता. १ ऑक्टोबर २०२२: काँग्रेसच्या काही नेत्यांकडून खर्गे यांच्या उमेदवारीवरुन ‘दलित’ कार्ड खेळल्या जात असून पक्षाच्या सर्वोच्च पदावर एक दलित अध्यक्ष पक्षातर्फे दिला जात असल्याचा प्रचार केला जात आहे मात्र तब्बल ५१ वर्षांंनंतर काँग्रेसला दलित नेत्याची आठवण आली का?इतकी वर्ष काँग्रेस श्रेष्ठींना का नाही वाटलं पक्षाच्या सर्वोच्च पदी दलित अध्यक्ष असावा?या प्रश्नावर बोलताना, दलित नेते म्हणून खर्गे खूप चांगले आहेत.मी त्यांना तेव्हापासून ओळखतो जेव्हा ते कर्नाटकमध्ये मंत्री होते, त्यांच्यासोबत मी काम केले आहे.लोकसभेत विरोधी पक्ष नेते पदी असताना आम्ही सोबत खूप चांगलं काम केलं आहे.माझा हा ठाम विश्वास आहे की ही निवडणूक सहका-यांमधील निवडणूक असून जाती-पातीची नाही असे स्पष्टीकरण काँग्रेसचे अध्यक्ष पदाचे उमेदवार असणारे खासदार शशी थरुर यांनी दिले.
त्यांनी काल आपला उमेदवरी अर्ज भरल्यानंतर नागपूरातील दीक्षाभूमीवरुन आपल्या प्रचाराला सुरवात केली.यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. याप्रसंगी बोलताना या निवडणूकीत ना कोणी शत्रू ना प्रतिस्पर्धी असे सांगून हे काही युद्ध नाही,ही एक मैत्रीपूर्ण लढत असून उमेदवार हे आपापली भूमिका पक्षातील मतदारांसमोर मांडत आहे आणि त्यांचे समर्थन मागत असल्याचे ते म्हणाले.
नेत्यांना म्हणू द्या ते जे काय म्हणत असतील,असे सांगून,लोक तर हे ही म्हणतात की मी ’अंडर डॉग’असून माझ्यासाठी ही निवडणूक जास्त कठीण आहे,पण काठीण्यापासून मी कधीही दूर पळत नाही तर मला पक्षाच्या साधारण कार्यकर्त्यांनी ही निवडणूक लढण्यास प्रोत्साहन दिले आहे.माझा जो निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे त्यात १२ प्रदेशांचे लोक आहेत.माझ्यासोबत पक्षातील सर्वसाधारण कार्यकर्त्या आहेत.मी नामांकन भरताना त्यांनी ढोल वाजवले,नारे दिलेत.आमचा पक्ष मोठ्या नेत्यांचा पक्ष नाही.आम्ही मोठमोठ्या नेत्यांचा खूप सन्मान करतो मात्र आता तरुणाईच्या भावाना देखील ऐकण्याची वेळ आली आहे. मोठमोठे नेते हे सहा, सात, दहा असतीलही त्यांच्यासोबत मात्र साठ पैकी पन्नास सर्वसाधारण कार्यकर्त्या हे माझ्यासोबत आहे ज्यांना आता पक्षामध्ये परिवर्तन हवे आहे, मला त्यांचा आवाज बनायचा आहे.मी युवा काँग्रेसचा आवाज बनू इच्छितो,असे ते म्हणाले.
या निवडणूकीत मत देणारे ९ हजार १५० मतदार आहेत तुम्हाला काय वाटतं तुम्हाला किती मते मिळतील?या प्रश्नावर बोलताना,प्रचार आज पासून सुरु झाला असून ही संख्या मी आताच कशी सांगू शकेल?मला वेळ द्या,१७ तारखेला मतदान आहे १९ तारखेला निकाल लागेल,माझा हा विचार आहे मी चांगल्या मताधिक्याने विजयी होणार आहे,असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
तुम्हाला पक्षात काेणता बदल अपेक्षीत आहे?यावर बोलताना ते म्हणाले,की ते मी माझ्या जाहीरनाम्यात नमूद केले आहे . सत्तेचे विकेंद्रीकरण,मंडळ,राज्य,जिल्हास्तरावर अधिकार मिळावेत निर्णय घेण्याबाबत.प्रदेशाध्यक्षांना निर्णय घेण्यासाठीचे ’खरे’अधिकार मिळायला हवेत.सध्या प्रदेशाध्यक्षांच्या डोक्यावर एक सरचिटणीस बसवून ठेवला आहे,त्यांच्यावर सरचिटणीसांचे संगठन आहे,त्यांच्यावर अध्यक्ष आहेत.प्रदेशाध्यक्षांना साधा एक जिल्हाध्यक्ष ही नेमायचा असल्यास पक्षाच्या अध्यक्षांचे पत्र आणावं लागतं.या व्यवस्थेत परिवर्तनाची गरज त्यांनी प्रतिपादीत केली.अश्या प्रकारच्या संघटनेत सुधारणेची गरज असून सामान्य कार्यकर्त्यांना जास्त महत्व आणि संधी देण्याची तसेच एेकण्याची व ऐकवण्याची संधी मिळायला हवी,असे ते म्हणाले.
तुम्ही आज नागपूरात आले आहात मात्र तुमच्यासोबत शहरातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते,आमदार किवा माजी मंत्र्यांची उपस्थिती का नाही?या प्रश्नावर बोलताना, माझ्यासोबत सामान्य कार्यकर्ते असल्याचा टोला त्यांनी हाणला.मी जेव्हा नागपूरात आलो तेव्हा माझ्यासोबत सामान्य कार्यकर्ता, युवा काँग्रेस,महिला काँग्रेस आदी सर्वच सोबत होते.महत्वाचे म्हणजे पक्षांतर्गत होणारी ही निवडणूक ’एक मतपत्रिका एक मत‘या आधारवर लढली जात असून ते मत सामान्य कार्यकर्त्याचे असो किवा सर्वात मोठ्या नेत्याचे,त्या मतांचं एकच मूल्य असतं,त्यामुळेच नेते,मंत्री किवा आमदार यापेक्षा मतांची बेरिज आपण गृहीत धरु,असे विधान त्यांनी केले.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासोबत तुमची स्पर्धा ही थोडी सहज झाली असती का खर्गे यांच्या तुलनेत?या प्रश्नावर बोलताना थरुर म्हणाले की, ही सगळी चांगली माणसे आहेत,माझे मित्र देखील आहेत.ही व्यक्तींमधली लढाई नसून माझी विचारधारा माझ्या पक्षातील लोकांना आणि बाहेरच्यांनाही माहिती आहे.मी गेल्या चाळीस वर्षांपासून पुस्तके लिहीत आहो.यावर आशिष देशमुख यांनी ‘चुनके आयेंगे जरुर,शशी थरुर शशी थरुर’अशी गर्जना केली.कार्यकर्त्यांनीही त्यांच्या सूरात सूर मिसळला.
तत्पूर्वी,विमानतळावरुन मी सरळ सर्वात आधी पवित्र अश्या दीक्षाभूमीवर आलो असल्याचे त्यांनी सांगितले.या मागे दोन कारणे असून पहीले तर आमच्या अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने दलितांच्या उद्धारासाठी खूप भरीव असे कार्य केले असल्याचे ते म्हणाले.पक्षाचे मंत्री म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे काम हे महनीय असून त्यांनी या देशाला संविधान प्रदान केले आहे.दूसरे कारण म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवरील माझ्या नवीन पुस्तकाची प्रथम प्रत मी आज त्यांच्याच चरणी अपर्ण केली असूनया पुस्त्कात संक्ष्प्त मध्ये मी डॉ.बाबासाहेबांचे जीवन,विचारधारा,अनुभव,त्यांच्या महनीय-महनीय उपलब्धी,कार्यशैली आणि ते जो अमूल्य वारसा आपल्या साठी सोडून गेले आहेत,त्याचा उल्लेख या दोनशे पानी पुस्तकात असल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.
माझी तिन्ही गांधींसोबत भेट-
मल्लिकार्जून खर्गे यांना गांधी परिवाराचा उमेदवार मानला जात आहे,ते तर आपल्या विजयाविषयी इतके आश्वस्त आहेत की त्यांनी आज लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्याच्या पदवरुन राजीनामा दिला,यावर प्रश्न विचारला असता, पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी,राहूल गांधी व प्रियंका गांधी या तिन्ही गांधींसोबत मी भेट घेतली असून तिघांनी मला हेच वारंवार सांगितले की त्यांच्याकडून पक्षाध्यक्ष पदासाठी कोणीही ‘पुरस्कृत’अधिकृत’ उमेदवार नाही आहे आणि नसणार.ते निष्पक्ष राहणार असून पक्षाची निवडणूक संवैधानिकरित्याच होणार असल्याचे आश्वासन त्यांनी मला दिले आहे.पक्षाची यंत्रणा ही देखील निष्पक्ष व अलिप्त राहणार असून त्यांचीच ईच्छा आहे की काँग्रेस पक्ष देशात पुन्हा ताकदवर बनली पाहीजे.त्यामुळेच माझ्या पक्षाच्या माजी अध्यक्षच मला असे सांगत असेल तर माझ्या मनात या निवडणूकीला घेऊन कोणतेही किंतू-परंतू नाही.




आमचे चॅनल subscribe करा
