फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजधक्कादायक!काेराडी औष्णिक वीज केंद्राचे प्रदुषण रामदासपेठपर्यंत!

धक्कादायक!काेराडी औष्णिक वीज केंद्राचे प्रदुषण रामदासपेठपर्यंत!

Advertisements

नीरीच्या अहवालातून स्पष्ट:माध्यमांसाठी ‘एअर क्वालिटी लिडरशीप’कार्यशाळा
हवेच्या गुणवत्तेचे निरिक्षण आणि नोंदणी यंत्रणेची नागपूर,चंद्रपूरमध्ये अत्यधिक गरज:चर्चेचा सूर
नागपूर,ता.२७ सप्टेंबर २०२२: सहसा हवेच्या प्रदुषणाबात प्रचार-प्रसार माध्यमांमध्ये नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात बातम्या प्रसिद्ध होतात या मागील कारण या काळात हवेची दिशा,दाब,उंची इत्यादी कारणे असून डिसेंबर महिन्यात काेराडी औष्णिक वीज केंद्राचा संपूर्ण धुआं अर्थात प्रदुषित घटके हे नागपूरातील रामदासपेठसारख्या पॉश वस्तीमध्ये देखील सहज पोहोचली असतात मात्र सर्वसामान्यांचा हाच समज असतो की आपण नागपूरकर कोराडीतील प्रदुषणापासून लांब असल्याने सुरक्ष्त आहोत,असे मत राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे(नीरी) ज्येष्ठ वैज्ञानिक के.व्ही.जॉर्च यांनी मांडले.
ते असर,सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि युसेड,अमेरिका या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल सेंटर पॉईंट येथे माध्यमांसाठी ‘एअर क्वॉलिटी लिडरशीप’कार्यशाळेच्या अायोजना प्रसंगी बोलत होते.याप्रसंगी दृष्यप्रणालीवर आपले संशोधन सादर करताना ते म्हणाले की आजची कार्यशाळा एका महत्वपूर्ण विषयावर आयोजित करण्यात आली असून,हवेच्या प्रदुषणाबाबत पुढे काय करायचे आहे?याचा उहापोह करण्यासाठी आहे.हे जर माहिती असंत तर आधीच नसते का केले?मात्र आपली सवयच ही आहे की आपण डॉक्टरकडूनच आपला रोग लपवित असतो!
आम्ही आपल्या समस्यांना कधी समजूनच घेतले नाही.जुन्या काळातील इमारती या खूप उंच राहत असत,यामुळे घराच्या उंचीप्रमाणे भिंतींमध्ये खेळती हवा राहत असे.जूनमध्ये हवा उष्ण असल्यामुळे ती पृथ्वीपासून जास्त अंतरावर असते त्यामुळे प्रदुषित घटकांचे हवेत मिसळण्याचे प्रमाण हे देखील कमी असतं.मात्र तेच डिसेंबर महिन्यात हेच प्रदुषित घटक हवा खाली असल्यामुळे मनुष्याच्या फुफुसापर्यंत सहज पोहोचण्यासाठी सज्ज असतता.७ नोव्हेंबर २०२१ रोजी ऐन करोनाच्या काळात जेव्हा रस्त्यांवर लॉक डाऊनमुळे गाड्यांचे प्रदुषणही नव्हते तरी देखील कोराडीच्या औष्णिक वीज केंद्रातील निघणारा प्रदुषित धुवा हा शहरातील वातावरणात सहज मिसळत होता!
आपली खरी समस्या हीच आहे की आम्ही आपल्या भितीला कमी करण्यासाठी या प्रदुषणाचे प्रमाण कमी करुन लपवित किवा दाखवित असतो.या औष्णिक वीज केंद्रांपासून होणारे प्रदुषण ही वीज केंद्रे देखील रोखू शकत नाही कारण त्यांच्याकडे देखील प्रदुषण रोखणा-या तांत्रिक ज्ञानाची कमतरता आहे.सूर्यास्ताच्या वेळी हवेत या वीज केंद्रांच्या प्रदुषित घटकांच्या मिसळण्याचे प्रमाण कमी असते.दिवसभर तर रस्त्यांवर गाड्यांची वर्दळ असते मात्र रात्री आपले शहर जरी मेट्रो सिटी म्हणून ओळखले जात असले तरी रात्र भर रस्त्यांवर इतर मेट्रो सिटीप्रमाणे गाड्यांची रेलचेल दिसत नाही म्हणूनच नागपूरला ‘स्लिपिंग सिटी’ही म्हटलं जातं.वीज केंद्रे मात्र चोवीस तास सुरुच असतात!
नागपूरात ऑगस्टच्या महिन्यात दोन हजार मीटर उंचीवर हे प्रदुषित घटक हवेत मिसळत असतात.दिल्लीचे वातावरण नागपूरपेक्षा वेगळे आहे.दिल्ली ऐवढे प्रदुषण नागपूरकर सहनही करु शकणार नाहीत.त्यामुळे औद्योगिकरण किती विस्तारित करायचे,हे आपल्यालाच ठरवावे लागेल.दिल्लीच्या ‘ऑड-ईव्हन’फॉम्युला विषयी बोलताना,या फॉम्युलामुळे दिल्लीतील प्रदुषणावर काही एक फरक पडला नसल्याचे त्यांनी सांगितले.दिल्लीत प्रदुषित घटक हवेत मिसळत राहण्याचा कालावधी नागपूरच्या तुलनेत हा फार जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.नागपूरात फक्त डिसेंबर महिन्यात प्रदुषणाचा निर्देशांक हा उच्च असतो.
नागपूर शहरात प्रदुषण सहन करण्याची एक ठराविक क्षमता आहे तरी देखील आमचे राजकीय नेते हे नागपूर शहराला ‘शांघाय’ किवा ‘सिंगापूर’बनविण्याची स्वप्ने दाखवित असतात,असा उपरोधिक टोला देखील सादरीकरणाच्या वेळी हाणला.डिसेंबर महिन्यातील पार्टिक्यूलेट मॅटर(पीएम)१० आणि पीएम २(हवेमध्ये असलेले विविध आकाराचे घन आणि द्रव सूक्ष्म कण स्वरुपातील प्रदूषक घटक यांचे प्रमाण शहरातील हवेत अत्यधिक असल्याची माहिती त्यांनी दिली.
मूळ समस्या हीच आहे की दिसतं काही आणि सांगितल्या काही जातं!हवेच्या प्रदुषणाबाबत डिसेंबर महिन्यात सांगितले जाणारे प्रमाण हे खरे किवा खोटे नसतातच मुळी.प्रत्येकाने सखोल आणि विस्तृतपणे याचा शास्त्रशुद्धपणे अध्ययन करने गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.आम्ही फक्त दोन महिन्यांच्या डेटासाठ हजारो कोटी खर्च करतोय?औष्णिक वीज केंद्रातून शहरात पसरणा-या विषारी घटकांची शास्त्रशुद्ध माहिती एकाच विशिष्ट ठिकाणी थांबवून दाखविण्यात आली.
या ऐवजी दर महिन्यातील पहील्या आठवड्यात एक कॅलेंडर मॅप प्रसिद्ध करावा.महिन्यातून किती दिवस नॉन अटेंडेट स्टेटस होते,यानंतर जानेवरीच्या पहील्या आठवड्यात याची आकडेवारी घ्यावी,मग वर्षभरातील दिवसांचा अभ्यास झाला पाहिजे.हिवाळ्यात या वीज केंद्रांचा संपूर्ण धूर शहराकडे येत असतो कारण हवेची दिशा त्या काळात शहराकडे असते.उन्हाळ्यात मात्र हवेची दिशा वेगळी असते.आम्ही एक मेगावॉट वीज निर्मितीसाठी एक कोटी रुपये खर्च करीत असतो.२ हजार मेगावॉट वीजनिर्मितीसाठी किती खर्च येत असेल?यातील सल्फर-डाई-ऑक्साईड नेमका जातो कुठे?
यासाठी आम्हाला नेमके काय करायला हवे?सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिल्लीत दोन ॲण्टी स्मोक टॉवर बसवण्यात आले.मात्र, हवा स्वच्छ करणे शक्य नसून प्रदुषणकारी घटका एकदा उत्सर्जित होऊन हवेत मिसळले तर त्यांचे विलगीकरण शक्य नसतं.नागपूर शहरात दिल्लीच्या तुलनेत वायू प्रदुषणाचा भार सध्या तरी कमी आहे,शहरातीत वायू प्रदुषण हे औष्णिक वीज केंद्रांमुळे अधिक असून डिसेंबर व एप्रिल महिन्यात याचे प्रमाण अत्याधिक असतं.केंद्र सरकारने वीज केंद्रात एफजीडी लावण्याची टाइमलाईन ठरविली आहे मात्र,ते किती उपयुकत ठरतील,हे येणारा काळच सांगू शकेल,असे मत त्यांनी व्यक्त केले.
नागपूरात एकच एअर क्वॉलिटी मॉनिटरिंग स्टेशन आहे.तीन नवे स्टेशन स्थापित केले जात असून व्हीएनआयटी,एलआयटी तसेच सिव्हिल लाईन्ससारख्या हिरवळीच्या क्षेत्रात जरी बसविले जात असले तरी शहरातील सर्व दिशांमधील वायूतील घटक मोजण्यास ते सक्षम असतील,यासाठी शहरातील सर्वाधिक प्रदुषित ठिकाणीच ती बसविण्यात आली पाहिजे,असा निग्रह चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले.कोट्यावधीची ही यंत्रे शासकीय इमारतीवरच बसवली जात असते,अशी पुश्‍ती ही त्यांनी जोडली.
जेवढे प्रदुषण तेवढी एनर्जी देने हाच वायू प्रदुषणावरील प्रभावी उपाय असल्याचे सांगून ‘ही बेबी स्टेज नसून बबल्स स्टेज’असल्याचा इशारा त्यांनी दिला.समुद्र मंथन हे आदर्शवत उदाहरण असून या मंथना उल्टं केल्या जाऊ शकत नव्हतं,हा नियम होता.यामुळेच नागपूर महानगरपालिकेला सहभाग नोंदवावाच लागेल,किमान त्यांनी वायू प्रदुषणाबाबत रोजच्या रोज एक्सल शीट तरी भरण्याचे काम प्रामाणिकपणे करावे,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.यामुळे थोडा-थोडा डेटा मिळत राहील व वर्षातील ३६५ दिवसांमधून शहरातील हवा किती दिवस किती प्रदुषित राहीली हे लक्षात येईल.चंद्रपूरमध्ये हेच प्रमाण ३६५ दिवसांपैकी २९९ दिवस आहे!बंगलोरमध्ये अशी १३ यंत्रे असून इतर शहरांमध्येही ही यंत्रे बसविण्यासाठी उद्योजकांनी समोर येण्याचे आवाहन त्यांनी केले.या यंत्रामुळे हवेच्या प्रदुषणाबाबत शास्त्रशुद्ध माहिती उपलब्ध होईल मात्र हवा शुद्ध होणार नाही,असे त्यांनी सांगितले.
केंद्राच्या ‘क्लिन एअर’उपक्रमावर १२ हजार कोटींचा खर्च-
प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून प्रदुषणाबाबतचा डेटा मिळत नाही.प्रदुषण किती?मृत्यू किती?परिणाम किती?महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत मृत्यू किती?महिलांच्या मृत्यूचे प्रमाण किती?हवेत पीएम.२.५ ची मात्रा किती?यासाठी नागरिकांनी आता आपल्या मोबाईलमध्येच ’एअर क्वालिटी इन्डेक्स’अपलोड करावा.यात प्रदुषणाबाबत विस्तृत माहिती मिळते.
नॅशनल क्लिनअर उपक्रमाअंतर्गत २०२४ पर्यंत सर्व प्रदुषित शहरांमधून वीस ते तीस टक्के पीएम२.५ चे प्रमाण कमी करण्याचे उद्धिष्ठ ठेवले आहे.देशातील १३० सर्वाधिक प्रदुषित शहरांची यादी यात प्रसिद्ध आहे.या सर्व शहरांना याबाबत संकल्पना राबवण्याची सूचना देण्यात आली आहे.या योजनेचे कार्यान्वयन कसे होईल?कोण करेल?किती अवधी मध्ये करेल?काय काय केले जाईल?
त्यामुळेच हवेच्या प्रदुषणाकडे आता नव्या नजरेतू बघण्याचा सल्ला देत हवेचे प्रदुषण हा प्रदुषणाचा प्रश्‍न नसून समानतेचा प्रश्‍न झाला असल्याचे,वायु गुणवत्ता अभ्यासक व दिल्लीच्या कौन्सिल ऑन एनर्जी एन्वाहर्नमेंट ॲण्ड वॉटरच्या तनुश्री गांगुली यांनी सांगितले.यावेळी त्यांनी वायु प्रदुषणासाठी कारणीभूत असलेल्या मूलभूत गोष्टींचे विश्‍लेषण केले.केंद्र शासनाच्या ’क्लिन एअर’उपक्रमाची माहिती देताना या उपक्रमावर १२ हजार कोटी खर्च केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
२०१९ ते २०२४ पर्यंत हे ध्येय गाठायचे असून महाराष्ट्रात हवेच्या प्रदुषणाबाबत खूप मोठा स्कोप असल्याचे त्या म्हणाल्या.राज्यातील ठाणे,मुंबई,नवी मुंबई,नागपूरसारख्या शहराला हा पैसा मिळाला असून मनपाकडे या उपक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.महाराष्ट्रातील प्रदुषित शहरांमध्ये चंद्रपूर व नागपूरचा समावेश असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
पश्‍चिमी देशात धूळीकण नाहीत-डॉ.गुफ्रान बेग
‘सफर‘चे संयोजक डॉ.गुफ्रान बेग यांनी आपल्या सादरीकरणात माहिती,उपाय व एक्शन या तीन गोष्टींवर भर दिला.प्रदुषित घटकांचे पाच भागांमध्ये वर्गीकरण करुन हवेत तीस ते चाळीस टक्के प्रदुषित धुळीकण असून पश्‍चिमी देशात धुळीकण नसल्याचे त्यांनी सांगितले.नागपूरात पीएम २.५ चे प्रमाण अद्याप तरी ४० टक्क्यांचा खाली असल्याचे ते म्हणाले.नागपूरसारख्या शहरात हवेतील गुणवत्ता मोजणारे एकच यंत्र सिव्हिल लाईन्स भागात अाहे.गाजियाबादसारख्या शहरात असे तीन यंत्र आहेत मात्र जगात पर्यावरणसंबंधी ज्या संस्थेचे नाव घेतले जाते ती ‘नीरी’ही संस्था नागपूरात असल्याचे उपरोधिक टोला त्यांनी हाणला.
जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार वातावरणातील सुक्ष्म धुळीकण मोजण्याकरिता शहरांमध्ये यंत्रे हवीत.चंद्रपूरसारख्या सर्वाधिक प्रदुषित शहरात देखील हे प्रदुषण मोजणारे यंत्रच नाही,याकडे त्यांनी लक्ष वेधले.२०२०-२१ मध्ये डॉ.अभिजित खानविलकर यांच्यासोबत या शहराचे सर्वेक्षण केले असता वर्षाच्या ३६५ दिवसांपैकी ९८ टक्के या शहरातील हवा सर्वाधिक प्रदुषित असते.त्यामुळेच या शहरातील नागरिकांमध्ये सर्वाधिक अस्थमा,न्यूमोनिया,कर्क रोग,लहान मुलांमध्ये ड्राय कफ,नाईट कफ,डोळ्यांचा त्रास,श्‍वाय घेण्यास त्रास असे आरोग्यविषय तक्रारी जाणवल्या.
चंद्रपुरातील औष्णिक वीज केंद्रांपासून पाच किलोमीटर परिसरातील नागरिकांमध्ये हे प्रमाण अधिक होते,असे ते म्हणाले.विदर्भातील नागपूर,चंद्रपूर,अकोला आणि अमरावतीसह राज्यातील एकुण १८ शहरांनी हवा गुणवत्ता मानकांची पूर्तता न केल्याची बाब उघडकीस आली आहे.हवा प्रदुषणाबाबतच्या उपक्रमांचे परिणाम हे दिर्घकालीन असून यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम(एनसीएपी)ने नॉन अटेनमेन्ट(राष्ट्रीय हवा गुणवत्ता मानके पूर्ण करु न शकणारी शहरे) शहरासांठी कालबद्ध नियोजन व धोरणांची प्रभावी अंमलबजावणी अत्यावश्‍यक असल्याचे ते म्हणाले.
वा-यावर उडणा-या रस्त्यावरील धुळीचे प्रमाण अधिक-डॉ.सरोज कुमार साहू

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या