फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशपटोले गांधी परिवाराचे बटीक!

पटोले गांधी परिवाराचे बटीक!

Advertisements

ॲड.धर्मपाल मेश्राम यांची खोचक टिका

भगवान श्रीराम,जगद् गुरु शंकराचार्य तसेच समर्थ रामदास स्वामींशी केली राहूल गांधीची तुलना

नागपूर,ता. १५ सप्टेंबर २०२२: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतेच प्रभू श्रीराम,जगद् गुरु शंकराचार्य तसेच समर्थ रामदास स्वामी यांच्या पदयात्रेसोबत राहूल गांधी यांच्या ‘भारत जोडो‘पदयात्रेची केलेली तुलना ही केवळ हास्यापदच नव्हे तर पटोले हे गांधी घराण्याचे बटीक झाले असल्याची खोचक टिका भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी केली.

भगवान श्रीराम,जगद् गुरु शंकराचार्य तसेच समर्थ रामदास स्वामी यांच्यासारख्या महनीय विभूतींच्या रांगेत राहूल गांधींना नेऊन बसवणे हे अत्यंत हास्यासपदच असल्याचे सांगून, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष म्हणून राहूल गांधींचे किवा ,काँग्रेस पक्षाचे विचार पुढे नेणे अपेक्षीत असताना, पटोले मात्र गांधी कुटूंबियांची चाटूकारिता करीत असून गांधी कुटूंबियांचे बटीक झाले असल्याची खोचक टिका ॲड.मेश्राम यांनी केली.

एखाद्या कुटूंबियांचे बटीक होऊन राहणे,आश्रित होऊन राहणे आणि त्यांच्या कौतुकासाठी वाटेल त्या विभूतींसोबत त्यांची तुलना करने,हा प्रकार दूर्देवी असल्याचे ते म्हणाले.

पटोले यांच्याकडून महाराष्ट्राच्या जनतेला वेगळ्या अपेक्षा आहेत त्यामुळे त्यांनी गांधी कुटूंबाची चाटूकारिता करण्यासाठी इतरांचे आराध्य दैवत तसेच श्रद्धेय विभूतींसोबत राहूल गांधी यांची तुलना करु नये,असा सल्ला याप्रसंगी ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी दिला.

भगवान श्रीराम,पहिले शंकराचार्य तसेच रामदास स्वामी यांनी कन्याकुमारी ते काश्‍मीर पदयात्रा केली होती.त्यानंतर अशी यात्रा करणारे राहूल गांधी हे चौथे आहेत,असे मत नुकतेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूरात व्यक्त केले होते.राहूल गांधींची ही यात्राही लोककल्याणासाठीच आहे,राहूल गांधी हे देखील धर्माचेच कार्य करीत असल्याचे नाना म्हणाले होते.

त्यांच्या या विधानाचा भाजपचे प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी खरपूस समाचार घेतला.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या