
भाजपच्या ‘राष्ट्रवादावर’ जनतेने उत्तर मागावे
अमरावती,उदयपूरच्या हत्याकांडात भाजप पदाधिका-यांचाच सहभाग!
उमेश कोल्हे हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी इरफान खान राणा दाम्पत्याचा कार्यकर्ता!
नागपूर,ता. ९ जुलै २०२०:भारतीय जनता पक्षाचं अतिरेक्यांसोबत नातं असून या नात्याला तुम्ही काय नाव द्याल?काँग्रेस पक्षाने गुन्हे आणि गुन्हेगारीकरणावर कधीही राजकारण केले नाही.हा एक असा विषय आहे जो देश चालवताना कधीही एकत्रित असायला नको,त्यामुळेच देशातील सर्व राजकीय पक्षांनी देशहितासाठी या विरोधात आवाज उठवला पाहिजे.आज देशात जे काही घडतंय ते कोणापासूनही लपलेले नाही.आज डिजिटल युगात आपण वावरतोय,त्यामुळे काहीच लपून राहणे शक्य ही नाही.आज देशात एकानंतर एक ज्या काही हिंसक घटना घडत आहेत,त्या सर्व घटनांमध्ये भारतीय जनता पक्षाचा कुठे ना कुठे संबंध दिसून पडतोय, असा गंभीर आरोप आज काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अदिल बोपराई यांनी प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
मी आज एका अत्यधिक गंभीर विषयाला घेऊन तुमच्यासमोर आलो असून, हा गंभीर विषय देशाच्या जनतेपर्यंत प्रसार-प्रचार माध्यमातून पोहोचवण्यासाठी ही पत्र परिषद आयोजित केली असल्याचे त्यांनी सांगितले.काँग्रेस पक्षातर्फे संपूर्ण देशात हा विषय मांडल्या जात असल्याचे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले,की काँग्रेस (congress)पक्षाचे हे मत आहे की देशाच्या जनतेनी केंद्रिय सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला हे सर्व प्रश्न विचारायला हवे, की देशात आज ज्या काही हिंसक घटना घडत आहेत त्या सर्व घटनांमध्ये भाजपचाच संबंध कोणत्या ना कोणत्या स्वरुपात का पुढे येत आहे?भाजपची (bjp)ही जवाबदारी आहे की त्यांनी या सर्व गंभीर प्रश्नांचे उत्तर देशाला द्यावे.
भारतीय जनता पक्ष जी ‘राष्ट्रवादी’ पक्ष असल्याचा बनाव करते,राष्ट्रवादाचा मुखवटा धारण करुन राहते,या मुखवट्या मागे कोणती कटकारस्थाने सुरु असतात?
काही दिवसांपूर्वी उदयपूरमध्ये कन्हैयालाल यांची निघृर्ण हत्या झाली.त्या हत्याकांडातील मुख्य आरोपीला राजस्थान पोलिसांनी चार तासांच्या आत अटक केली.मुख्य आरोपी मोहम्मद रियाज अंसारी हा भाजपचाच कार्यकर्ता निघाला!या रियाज अंसारीने पक्षातील मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले होते.सोशल मिडीयात या संबंधीचे छायाचित्रही व्हायरल झाले आहेत.या मुख्य आरोपीला भाजपच्या अनेक कार्यकम्रात, भाजपच्या अनेक मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत अनेकांनी बघितले आहे.त्यामुळेच काँग्रेस पक्षाची मागणी आहे,भाजपने सांगावे मोहम्मद रियाज अंसारी जो भाजपचा पदाधिकारी आहे त्याच्यासोबत भाजपचा कोणता संबंध आहे?
जम्मू,काश्मीर मध्ये नुकतेच दोन लष्कर ए तय्यबाच्या अतिरेक्यांना एका गावातील गावक-यांनी पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले.या दोन अतिरेक्यांमधील एक अतिरेकी ज्याचे नाव तालीब हुसैन शाह आहे, तो देखील भाजपचाच पदाधिकारी निघाला!या दोन्ही अतिरेक्यांकडे शस्त्रास्त्रांचा मोठा साठा ही सापडला.या अतिरेक्याची देखील अनेक छायाचित्रे भाजपच्या मोठ्या नेत्यांसाेबत व्हायरल झाली आहेत.आता भाजपनेच खुलासा करावा,अश्या उग्रवाद्यासोबत भाजपचं नेमकं काय नातं आहे?उद्या जर अश्या घटनांमध्ये काँग्रेस किवा इतर पक्षातील कोणत्याही कार्यकर्त्याचा सहभाग आढळला, तर आम्हाला प्रश्ने विचारली जातील आणि आमचं हे कर्तव्य ही आहे त्या उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे माध्यमे व देशातील जनतेला देणे,मात्र भाजप असे करीत नाही.
एक अतिरेकी तालीब हुसैन शाह जो भाजपचा पदाधिकारी निघतो तर भाजपचे हे कर्तव्य नाही बनत का? त्यांनी उत्तर द्यावे की त्यांनी अश्या व्यक्तीला पक्षाचा पदाधिकारी का केला?त्याची पार्श्वभूमी तपासली की नाही, की फक्त सत्तेच्या लालसेपायी, कसे ही करुन साम,दाम,दंड,भेदाची रणनीती स्वीकारुन, काश्मीरमधील सत्ता मिळवण्यासाठी, एका अश्या व्यक्तीला जो देशाच्या विरोधात कारवायांमध्ये लिप्त होता, त्यालाच पक्षाचा पदाधिकारी बनवला! देशाला भाजप काही उत्तर देणार आहे की नाही?
भारतीय जनता पक्ष जो सतत राष्ट्रवादाची दवंडी पिटत असतो,राष्ट्रवादाच्या नावावर जनतेला मत मागत असतो,त्याच भाजपचा सरपंच, तारीक अहमद मीर त्यालाही देशविरोधी कारवार्यांमध्ये अटक होते!.जो भाजप उठसूठ इतर राजकीय पक्षांना राष्ट्रवादाच्या प्रश्नावर कटघ-यात उभे करीत असतो,त्या भाजपची राष्ट्रवादाच्याच प्रश्नावर उत्तर देण्याची कोणतीच जवाबदारी नाही का?असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
केंद्राकडे ईडी,सीबीआय,आयकर विभाग आहे तरी देखील या अश्या गंभीर प्रश्नांबाबत ते उत्तरदायी आहेत की नाही?लोकतंत्रात जे सत्ताधारी असतात ते उत्तर देण्यासाठी जवाबदार असतात.विरोधक नव्हे.मोहम्मद रियाज असंारी त्यांचा पदाधिकारी होता की नाही?याचे उत्तर भाजपने द्यावे,अशी मागणी त्यांनी केली.
अमरावतीमध्ये जी क्रूरता घडली ज्यात उमेश कोल्हेची निर्मम हत्या झाली, त्या घटनेत जो मुख्य आरोपी होता,त्या इरफान खानला अटक झाली, त्या इरफान खानचे राजकीय सबंध निघाले, ते अपक्ष खासदार व आमदारासोबत.हा योगायोग आहे का?
कुठे ना कुठे,जे आरोपी आहेत ज्यांना पोलिसांनी अटक केली त्यांचा संबंध भाजपसोबत किवा त्या पक्षाच्या सहका-र्यांसोबत समोर येत आहेत.भाजपचं अतिरेक्यांसोबतचं नातं काय सांगतो?महत्वाचे म्हणजे भाजप या सर्व विषयांवर का गप्प आहे?देशाला उत्तर देणे ही त्यांची जवाबदारी नाही का?हा देश महात्मा गांधी,पंडित नेहरु,सरदार पटेल यांचा आहे,अशी आठवण बोपराई यांनी करुन दिली.
विरोधकांना दरराेज प्रश्ने विचारली जातात,आम्ही त्याची उत्तरे ही देतो,पण या देशाचा कारभार जो पक्ष हाकतोय त्या पक्षाची,त्या सरकारची,त्या नेत्यांची देशातील नागरिकांना उत्तर देण्याची कोणतीच जवाबदारी नाही का?असा संतप्त सवाल त्यांनी केला.
भाजपचा अनेक अतिरेक्यांसोबत संबंध आहे. त्यांचा वापर राजकीय ध्रुवीकरणासाठी केला जात आहे. हाच भाजपचा खरा चेहरा असून राष्ट्रवादाच्या नावाखाली जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा अतिशय गंभीर आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आदील बोपराई यांनी याप्रसंगी केला.
उदयपूर येथे कन्हैयालाल यांच्या हत्येत सहभागी असलेला मोहम्मद रियाज अत्तारी हा आरोपी भाजपचा कार्यकर्ता असल्याचे उघडकीस आले आहे. भाजपच्या २०२० जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांना शस्त्राचा पुरवठा करणारा तारिक अहमद मीर हासुद्धा भाजपचा कार्यकर्ता होता. तो सरपंचसुद्धा होता. २०१७ मध्ये मध्यप्रदेशात आयएसआय या पाकिस्तानी अतिरेकी संघटनेला मदत करणाऱ्या ११ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांपैकी ध्रुव सक्सेना हा भाजपच्या आयटी सेलचा सदस्य होता. टेरर फंडिंगचा आरोपी असलेला बलाराम सिंग हा बजरंग दलाचा तर अतिरेक्यांना शस्त्रांचा पुरवठा केल्याचा आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा झालेला निरंजन होजाई हासुद्धा भाजपचा कार्यकर्ता आहे.
एवढेच नव्हे तर कुख्यात दहशतवादी अजहर मसूद याचा शिष्य असलेल्या मोहम्मद फारुक खान याला भाजपने श्रीनगरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक ३३ मधून उमेदवारी दिली होती. मात्र भाजपने आजवर याचे उत्तर कधीच दिले नाही. याबाबत विचारणा केली असता आम्हाला ‘देशद्रोही ’ठरवले जाते, असेही आदिल बोपराई यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला आमदार विकास ठाकरे, संदेश सिंगलकर, दिनेश बानाबाकोडे, संजय महाकाळकर आदी उपस्थित होते.




आमचे चॅनल subscribe करा
