

मिडीयाने देखील लावला अर्थपूर्ण हातभार
नागपूरता.१३ मे २०२२: कोरोना काळात काही वैद्यकीय तज्ज्ञ सतत प्रपोगंडापासून दूर राहण्याचे आवाहन करत असताना काही बोटावर मोजण्याएवढे वर्तमानपत्र सोडले तर भारतीय मीडिया मात्र कोरोनाच्याच बातम्या प्रसारित करत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये आणखी भीती निर्माण झाली, असा आरोप नवी दिल्ली येथील ज्येष्ठ पत्रकार व युनिव्हर्सल हेल्थ ऑर्गनायझेशनच्या वर्कींग कमिटीचे सदस्य आशुतोष पाठक यांनी शुक्रवारी प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केला.
पाठक म्हणाले, कोरोनाकाळात वैज्ञानिकांनी जे सत्य सांगितले, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. जगातील संशोधन सांगत आहे की, नागरिकांमध्ये कोरोना प्रतिबंधक प्रतिकार शक्तीत वाढ झाली असून सार्वत्रिक लसीकरण करण्याची काहीही गरज नाही. ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लस निर्माण केली, ते म्हणतात की ही लस फक्त आणिबाणीच्या काळातच देण्याची गरज आहे. कारण या लसीमध्ये अनेक दोष आहेत. डॉ. रॉबर्ट मलोन यांनी या लसीचा विरोध केला असता, त्यांच्यावरच प्रतिबंध टाकून त्यांचे म्हणणे दडपून टाकण्यात आले. गेटस फाऊंडेशनने ८० टक्के मेडिकल रिसर्चवर कब्जा केला, असा आरोपही पाठक यांनी याप्रसंगी केला.
ज्या वैज्ञानिकांनी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकारांनी कोरोना व्हायरस, लॉकडाऊन व लसीकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण केले, त्यांच्यावर मीडिया व सोशल मीडियावर प्रतिबंध घालण्यात आले. जर फौजी आणि गेटस् गँग खरे होते तर, या सर्व वैज्ञानिक व सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे का दाबून ठेवण्यात आले, असा सवालही त्यांनी केला. कोरोना आणि त्याच्या षडयंत्राच्या विरोधात जागतिक स्तरावर डॉ. राइनर पूलमिच यांच्या अध्यक्षतेखालील एक समिती चौकशी करत आहे. ही समिती लवकरच या षडयंत्राचा पर्दाफाश करेल, अशी अपेक्षाही पाठक यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

कोरोना विषाणूच्या उत्पत्तीची सखोल चौकशी करा: प्रकाश पोहरे
कोरोना हा आजार नैसर्गिक की अनैसर्गिक विषाणूपासून निर्माण झाला, याची चौकशी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन-तीन समिती स्थापन करण्यात आल्या. परंतु त्याचा अहवाल अद्यापपर्यंत बाहेर आला नाही. किमान भारत सरकारने याबाबतची सखोल चौकशी करावी. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करावी, अशी मागणी लोकनेते प्रकाश पोहरे यांनी याप्रसंगी केली.
कोरोना विषाणू हा नैसर्गिक असेल तर त्यावर अद्यापपर्यंत प्रतिबंध घालण्यात यश का आले नाही, असे स्पष्ट करुन पोहरे म्हणाले, हा विषाणू अनैसर्गिक असेल तर यामागे जागतिक फार्मा कंपन्यांचे षडयंत्र असल्याचा वास येत आहे. जगातील अनेक संस्था याचा शोध लावण्यासाठी योग्य दिशेने काम करत नाही. भारतात संसर्गजन्य रोगाचे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत. त्यांची एक समिती स्थापन केल्यास ते कोरोनाच्या विषाणूवर प्रकाश टाकू शकतात. कोरोनाकाळात अनेक निर्बंध लागू करण्यात आले. परंतु, त्या काळामध्ये लॉकडाऊन, मास्क व सोशल डिस्टसिंगचा प्रभाव राहिला नाही. या निर्बंधामुळे भारतात तर सरकारी अधिका-यांचेच चांगभले झाले. विनामास्क फिरणा-यांकडून कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल केला. महाराष्ट्राने त्यात अव्वल क्रमांक पटकावून अधिका-यांनी तर कोट्यवधींची माया गोळा केली, असा आरोपही त्यांनी केला.
मास्कमुळे फायद्यापेक्षा तोटाच अधिक झाला. सोशल डिस्टन्सिंगमुळे अर्थव्यवस्थेला जोरदार फटका बसला. कोट्यवधी लोकांना त्याचा आजही फटका बसत आहे. सिरम इन्स्टिट्यूचे मालक आधार पुनावाला यांनी २०२० मध्येच म्हणाले होते की, आम्ही २० रुपयांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस विक्री करण्यास तयार आहे. एवढेच नव्हे तर यावेळी पाच कोटी लस तयार असल्याचा दावाही त्यांनी केला होता. हा धागा पकडून पोहरे म्हणाले, ही लस २० रुपयामध्ये देण्यास तयार असताना प्रत्यक्षात ४०० ते ६०० रुपयांमध्ये कां विकण्यात आली. एकंदरित या प्रकरणामागे मोठे षडयंत्र दिसून येते. आम्ही सध्या जगातील फार्मा कंपन्यांच्या षडयंत्राला बळी पडत आहोत. सध्या मुलांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्याची काही आवश्यकता नाही. कारण त्यांच्यामध्ये नैसर्गिक प्रतिकारशक्ती जबरदस्त असते. असे असताना लस माफियांच्या दबावामुळे लहान मुलांचे लसीकरण केले जात असल्याकडेही पोहरे यांनी लक्ष वेधले. याप्रसंगी किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय संयोजक अविनाश काकडे प्रामुख्याने उपस्थित होते.
खोट्या प्रचारापासून सावध राहण्याचे आवाहन-
नवी दिल्ली येथील एम्समधील डॉ. अमिताभ बॅनर्जी यांनी या पत्रकार परिषेदत ऑनलाईन संवाद साधला. ते म्हणाले, सध्या लहान मुलांमध्येही कोरोना होत असल्याचे वृत्त असून ते संपूर्णपणे चुकीचे आहे. यातील ८० टक्क्यापेक्षा अधिक मुले ही विविध आजाराने ग्रस्त असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. त्यामुळे खोट्या प्रचारापासून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच आयआयटी मुंबई येथील डॉ. भास्कर रमन यांनी लसीकरणाच्या नावावर सध्या आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, लहान मुलांना कोरोनाची लागण होत नाही. कोरोना विषाणू नैसर्गिक की अनैसर्गिक, त्यानंतर सुरु करण्यात आलेल्या सार्वत्रिक लसीकरण प्रकरणाची केंद्र सरकारने सखोल चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी यापप्रसंगी ऑनलॉईन केली. हैद्राबाद येथील डॉ. प्रवीण सरदेसाई यांनीही कोरोनाच्या नावावर नागरिकांची लूट केल्याचा आरोप केला.




आमचे चॅनल subscribe करा
