फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूज'गोड व्‍याधी गोड गाणी’ २ मे रोजी

‘गोड व्‍याधी गोड गाणी’ २ मे रोजी

Advertisements

 

 

‘ऋतुराज’ संस्‍थेचा १३ वा वर्धापन दिन

नागपूर, ३० एप्रिल: ‘ऋतुराज’ संस्‍थेच्‍या १३ व्‍या वर्धापन दिनाचे औचित्‍य साधून सोमवार, २ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता ‘गोड व्‍याधी गोड गाणी’ हा ‘मधुमेहाचे नियोजन आणि प्रतिबंध’ या विषयावरील सांगितिक चर्चेचा कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला आहे.

श्रीमती कमलाबाई देशपांडे मेमोरियल ट्रस्‍ट, नागपूरच्‍या सौजन्‍याने सायंटि‍फीक सभागृह, लक्ष्‍मीनगर, आठ रस्‍ता चौक येथे हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाची संकल्‍पना मुग्‍धा तापस यांची असून डॉ. प्रभाकर के. देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

गुणवंत घटवाई, मंजिरी वैद्य-अय्यर, मुकुल पांडे हे गायक कलाकार विविध गीते सादर करणार असून परिमल जोशी, मोरेश्‍वर दहासहस्‍त्र, गौरव टांकसाळे, विशाल दहासहस्‍त्र व मुग्‍धा तापस साथसंगत करतील. कार्यक्रमाचे निवेदन किशोर गलांडे करणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या