

कर्मचा-यांवर बडगा:विभाग प्रमुखांना अभय!
‘डोळे बंद करुन’ अति.आयुक्तांच्या स्वाक्ष-या
जनतेच्या कराच्या पैशांची ‘सरकारी लृट’
स्टेशनरी घोटाळा ‘हिमनगाचे फक्त एक टोक’
नागपूर,ता. १८ डिसेंबर: करोनासारख्या भयंकर महामारीमुळे अवघे जग हादरुन गेले असताना आणि या विषाणूच्या तीव्र गतीने होणा-या संसर्गामुळे नागपूरात हजारो कुटुंबातील आप्त-स्वकीय पटापट मृत्यूमुखी पडत असताना,नागपूर महानगरपालिकेत मात्र कोट्यावधींच्या नवीन फाईल्स बनवने,मंजूर करने,बिल बनवणे,वित्त विभागातून पारित करुन घेणे,बिलाचे पैसे हाती पडताच आपापल्या हिस्स्याचे पैसे वाटून घेणे ही ‘रात्रीस खेळ चाले’मालिका चांगलीच चालली,एकीकडे नागपूरकर नागरिक ऑक्सीजन अभावी घरात आणि रुग्णालयांसमोर बेड न मिळाल्याने तडफडून मरत असताना,मनपातील काही भ्रष्ट अधिका-यांना केंद्र व राज्याने नागरिकांचा जीव वाचवण्यासाठीच्या उपाययोजना करण्यासाठी दिलेल्या कोट्यावधींमधून, स्वत:ची तुंबडी भरण्याची किती घाई झाली होती याचे फक्त एक उदाहरण ६७ लाखांच्या स्टेशनरी घोटाळ्यामुळे पुढे आले आहे,हा घोटाळा एकमेव नसून, विविध विभाग मिळून जवळपास अडीच ते तीन कोटींचा घोटाळा झाला असल्याचा दावा मनपातील अनेक कर्मचारीच आता करीत आहेत,हे विशेष!
कुठल्याही प्रकारची स्टेशनरी व इतर साहित्य खरेदी न करता केवळ अधिका-यांच्या बोगस स्वाक्ष-यांवर जर लोखोंची रक्कम वित्त व लेखा विभागातील अधिकारी कुठलीही शहनिशा न करता मंजूर करुन संबधित एजंसींच्या खात्यात लोखा रुपयेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेे जमा करीत असतील तर मग असा हा ‘अफलातून’घोटाळा हिमनगाचे फक्त एक टोकच असू शकतं,अशी खासगीत चर्चा आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे या घोटाळ्याची चौकशी माननीय मनपा आयुक्त राधाकृष्णन.बी.यांनी ज्या अति.आयुक्तांवर सोपवली आहे त्यांनीच या अश्या सर्व बिलांवर ‘डोळे मिटून’स्वाक्षरी केल्याचे उघड झाले आहे.मात्र कारवाईचा बडगा नेहमीसारखाच कर्मचा-यांवर उगारला गेला.या महाघोटाळ्यात ई-गर्व्हनेसचं लॉगिन वापरण्यात आलं होतं ते बघून लेखा परिक्षकाने बिले पास केली.आता त्याला स्वाक्षरीच्या जागेवर स्वाक्षरी दिसली,ती खरी की खोटी हे तपासण्याचे काम कनिष्ठ कर्मचा-यांचे आहे का?बिलांचे ऑडिट झाले,प्रोव्हिजन ठप्पा आहे,सही आहे तर कर्मचारी हा नेहमीच्या सवयीप्रमाणे ते पुढील प्रोसिजरसाठीच पाठवणार ना?
जीएसटी,सिक्यूरिटी सगळी कागदपत्रे योग्य वाटत असल्याने त्याचे बिल निघाले.आता ते अधिका-यांच्या लॉगिनमधून पासवर्ड चोरुन फॉरवर्ड केले आहेत हे कनिष्ठ कर्मचा-यांनी कसे आेळखायचे?असा संताप आता मनपा कर्मचा-यांमध्ये उमटला आहे.
मुुंढेंचे उदाहरण-
माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे हे तर खोटी सही करुन ‘सही सलामत’सूटून निघूनही गेलेत,स्मार्ट सिटीच्या प्रकरणात त्यांनी महाराष्ट्र बँकेतून खोटी सही करुन १३ कोटींची रक्कम काढून परस्पर त्याचे वाटप ही केले. अधिकार नसताना बँकेने देखील त्यांचे पत्र मान्य केले होते.माजी महापौर संदीप जोशी यांनी तुकाराम मुंढे यांच्या या घोटाळ्याच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली होती,पुढे या प्रकरणाचे काय झाले?
खोटी सही करुन देखील आणि पोलिसात तक्रार दाखल होऊनही मुुंढे नागपूरातून छातीठोकपणे निघून गेेलेत,या ही प्रकरणात विभाग प्रमुखांचा दोष असताना कनिष्ठ कर्मचा-यांना निलंबित करण्यात आल्यामुळे कर्मचा-यांमध्ये चांगलाच रोष आहे.
आरोग्य विभागात सुरवातीला ६७ लाखांचा घोटाळा पुढे आला असला तरी बोगस फायलींबाबत ‘कोटीच्या कोटी उड्डाणे’गेल्या दोन वर्षातील करोना काळात या विभागात झाला असून,सुरवातीला ४० ‘बोगस’ फायली तयार करुन कंत्राट देण्यात आले त्यानंतर या फायलींची संख्या ९० इतकी झाली.या बोगस फायलींच्या मंजुरीतून १ कोटी १४ लाख रुपयांची बिले काढण्यात आली,त्यामुळेच हा घोटाळा तीन ते साढेतीन कोटींचा असल्याची चर्चा महापालिकेत चर्चिली जात आहे
सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे ज्या अति.आयुक्त राम जोशी व सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश धामेचा यांच्या बाेगस स्वाक्ष-या किवा संगणकामधील पासवर्ड चोरुन फाईल्स मंजूर करुन घेतल्याचा दावा केला जात आहे यावर एखादे शेंबडे पाेर देखील विश्वास ठेवण्यास तयार नाही.
करोना काळात केंद्र व राज्य सरकारकडून आपत्ती व्यवस्थापना करिता जो दीडशे कोटींचा निधी मनपाला मिळाला त्याचे ‘नियोजन’मनपा अधिका-यांनी नागपूरकर जनतेचे आरोग्य जपण्यासाठी किती ‘फूलप्रूफ‘पद्धतीने केले त्याचे हे ढळढळीत उदाहरण सांगता येईल.
करोनामुळे मनपाच्या प्रशासनावर पदाधिका-यांचे कोणतेही नियंत्रण नसून मनपा आयुक्तांकडे तिजाेरीच्या चाव्या मायबाप सरकारने सोपवल्या.त्या तिजोरीचे राखणदार आणि हिशेब राखणारे यांनींच ‘सहकारीतेतून’किती उत्कृष्ट नियोजन या पैशांचे केले हे पुन्हा एकदा नागपूरकर जनतेसमोर आले आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्या आभा पांडे यांनी मनपाच्या आरोग्य विभागातील याच भ्रष्ट कारभाराचे, पत्र-परिषद घेऊन वाभाडे काढले होते,कश्याप्रकारे रात्री-अपरात्री जागरण करुन नवनवीन फाईल्स तयार करुन नवनवीन कंत्राटांवर या अधिका-यांनी ’मेहनत’घेतली,आकड्यांची जगलरी केली,याचे सोउहारण पुरावे त्यांनी पत्रकारांसमोर उघड केले होते.
मात्र त्यावेळी देखील आरोग्य विभागाचा कार्यभार अति.आयुक्त राम जोशी यांच्याकडेच होता,माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना मनपातील व्यवस्थापन,शिस्त व भ्रष्टाचारमुक्त प्रशासनापेक्षा, राजकारणात व राजकीय डावपेचात जास्त रस असल्याने आपल्या ७ महिन्यांच्या कार्यकाळात त्यांनी ऐन करोनाच्या काळात प्रशासनावर वचक बसवलाच नाही उलट ’आंधळा विश्वास’केला.नवीन आयुक्तांनी देखील त्यांची ‘रि’ओढली,असे मनपा कर्मचा-यांचेच मत आहे.’तुमची चूक मी पोटात घालतो,माझी तुम्ही पोटात घाला’असा अलिखित करार मुंढे आणि सत्ताधा-यांमध्ये झाला असल्यानेच मुंढे हे फसवणूकीच्या इतक्या गंभीर आरोपातून सुखरुप सुटले आणि मार्गी लागले!मात्र कनिष्ठ कर्मचा-यांच्या नशीबात असे भाग्य कुठे?
राम जोशी यांची चंद्रपूरला झालेली बदली नुकतेच करोनाची तिसरी लाट आल्यास अनुभवी अधिकारी असावा या सबबीखाली राज्य शासनाकडून मनपा आयुक्तांनी ती रद्द करवून घेतली.एवढंच नव्हे तर पुन्हा त्यांच्याकडे त्यांच्या ‘अचूक अनुभवाच्या’आरोग्य खात्याचाच कारभार देण्यात आला. मनपातील अनेक विभागात १०-१०,२०-२० वर्षांपासून एकच अधिकारी ’पदसिद्ध’असल्याचे दिसून पडतं,त्यांच्या बदल्यांच्या मागे अनेकांचे ‘अर्थगणित’जुळलेले असल्याकारणाने काही पदाधिकारी व प्रशासकीय कर्मचा-यांचा बदल्या वर्षानुवर्षे नव्हे तर दशकानुदशके टाळल्या जातात.याबाबत नुकतेच माजी स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी पत्र परिषदेत उल्लेख केला.
जनतेच्या कराचा कष्टाच्या पैश्यांचा चुराडा ‘सर्वोत्तम पद्धतीने’ नागपूर महानगरपालिकेतील काही भ्रष्ट ‘अधिकारी’ व काही भ्रष्ट ‘सत्ताधारी’ कश्यारितीने करतात,याचे उदाहरण आपल्या भाषणात, इतर ही अनेक मुद्दांसोबतच या पुढे केंद्रिय मंत्री नितीन गडकरींनी द्यावे,असा देखील खोचक सल्ला गडकरींना मनपातील कर्मचारी देताना दिसतात.
माजी विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्य अायुक्त यांच्या एकदंरित भ्रष्ट कारभारावर अनेक वेळा पत्र परिषद घेऊन लाखोंच्या गैरव्यवहाराचे घोटाळे बाहेर काढले मात्र नागपूर महानगरपालिकेत अति.आयुक्त राम जोशी व सहाय्यक आयुक्त महेश धामेचा हे पदावर असेपर्यंत ’भ्रष्टाचा-यांचा’कोणी बाल भी बाकां करु शकत नसल्याचे उपरोधिकपणे बोलले जात असतं. धामेचा यांचा तर सुरक्षा रक्षक पद भरती घोटाळा असो वाहन पुरविण्याचे कंत्राटातील गौडबंगाल असाे,त्यांच्यावर किती ही पत्र परिषदा घेऊन किती ही पुरावे सादर केले तरी मनपा आयुक्तांकडून त्यांना साधा एक ‘मेमो’देखील जात नाही,यातच ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’चा सार दडलेला दिसून पडतो.
कोरोना काळात राम जोशी यांच्या सहीनिशी करार झालेल्या राधास्वामी सत्संग मंडळाचे ५ हजार बेड,गाद्या,उश्या,पंखे,खुर्च्या यांचा पाण्यात गेलेला ६० ते ७० लाखांचा हिशेब नागपूरकरांनी न विचारलेलाच बरा.
ग्रंथालय,जन्म मृत्यूूूूू विभागातील देखील समोर आलेले घोटाळे यांची चौकशी करणा-या समितीत देखील राम जोशी व धामेचा हेच अधिकारी आहेत.’धृतराष्ट्र’होऊन ज्यांनी कोट्यावधीच्या फाईल्सवर स्वाक्ष-या केल्या तेच चोरांचा सुगावा लावणार असल्याचा ‘चमत्कारिक’ निर्णय माननीय मनपा आयुक्तांनी घेतला असल्याने या संपूर्ण महा-घोटाळ्यांचे कोणतेही ‘फलित’ समोर येणार नसून,सामान्य प्रशासन विभागातील ज्या चार कर्मचा-यांना मोहन पडवंशी,वित्त विभागातील राजेश मेश्राम,अफाक अहमद,श्रीमती नागदिवे यांना निलंबित केले तसेच याच विभागातील निवृत्त अधिकारी कराळे यांच्या विरोधात उपविभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले,यातून काहीही साध्य होणार नसून,आजपर्यंंत असे शेकडो कर्मचारी भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे निलंबित झाले पुढे ‘यथावकाश’त्यांचे ‘पुर्नवसन’देखील झाल्याचे शेकडो उदाहरण मनपा कर्मचा-यांना ’मुखोद् गद’ आहेत.
कायदा सर्वांसाठी सारखा असताना,मधल्या फळीतील कर्मचा-यांविरुद्ध चौकशी,कनिष्ठ कर्मचा-यांना निलंबित करने तर विभाग प्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी हे चौकशी समितीत असा ‘अजब मनपात गजब कारभार’चालत असतो,अशी खोचक टिका ही खासगीत केली जात आहे.
कोट्यावधींच्या बनावट कंत्राटांचा घोळ हे किती गंभीर प्रकरण आहे याचीच दखल घेऊन माजी आरोग्य अधिकारी डॉ. सवाई,निवृत्त आरोग्य अधिकारी दासरवार,अति.आयुक्त राम जोशी,वित्त विभागाचे लेखापरिक्षक विजय कोल्हे,बिलिंग सेक्शनचे भातकूलकर(जे बोगस आकड्यांच्या जगलरीमध्ये निष्णात मानले जातात व त्यांच्यातील याच गुणामुळे, गेल्या अनेक दशकांपासून ते एकाच खात्यात असून भ्रष्ट अधिकारी व भ्रष्ट पदाधिका-यांच्या गुड फेथमध्ये असल्याचे मानले जातात)या सर्वांची देखील शासनाच्या नि:पक्ष चौकशी समितीकडून चौकशी व्हावी अशी मागणी पुढे येत आहे.
नुकतेच काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी मुख्यमंत्र्याना पत्र देऊन तशी मागणीच केली आहे,एवढंच नव्हे तर मनपा बर्खास्त करण्याची सिफारश त्यांनी केली आहे.
कूंपणानेच शेत खालले असताना व खात असताना पुन्हा, कूंपनावरच मनपा आयुक्तांनी, शेत राखण्याची जवाबदारी सोपवू नये,मनपाच्या चौकशी समितीत ज्यांच्यावर पत्र परिषदा घेऊन भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप लावण्यात आलेत,किमान त्यांना या समितीपासून दूर ठेवण्याची मागणी केली जात आहे.
मनपा आयुक्तांनी अति.आयुक्त दिपककुमार मीणा यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली आहे त्या समितीतच काही भ्रष्ट अधिकारी असल्याने या समितीकडून मनपा कर्मचा-यांना व नागपूरच्या जनतेला कोणत्याही न्यायाची अपेक्षा नसल्याचे उघडपणे बोलले जात आहे.




आमचे चॅनल subscribe करा
