फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूज‘मुहुर्ता’ची संकल्पना बाबासाहेबांच्या अनुयायांमध्ये नाही:१४ व १५ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमीवर येणे टाळावे

‘मुहुर्ता’ची संकल्पना बाबासाहेबांच्या अनुयायांमध्ये नाही:१४ व १५ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमीवर येणे टाळावे

Advertisements


दीक्षाभूमी स्मारक समितीचे आवाहन

१८ वर्षाखालील व ६५ वर्षांवरील अनुयायांना प्रवेश नाहीच

अनुयायांनी दोन्ही डोजचे लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक

नागपूर,ता. ८ ऑक्टोबर २०२१: केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्य शासनाने २४ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या आदेशाप्रमाणे ७ ऑक्टोबरपासून सर्वच धार्मिकस्थळे ही भाविकांसाठी खुली करण्यात आली.या आदेशाप्रमाणे दीक्षाभूमी स्तुपाचे सर्व दरवाजे तसेच बाबासाहेबांच्या अस्थिकळशाचे दर्शन ही अनुयायांसाठी खुली झाली असली तरी धम्मचक्र प्रर्वतन दिन व विजयादशमीचा सोहळा एकाच दिवशी आल्याने तसेच करोनाची दूसरी लाट अद्याप नागपूरातील काही जिलह्यात अजूनही संपुष्टात न आल्याने, दीक्षाभूमीवर अनुयायांनी गर्दी टाळावी,१४ व १५ ऑक्टोबर हे दोन दिवस दीक्षाभूमीवर येणे टाळावे कारण ‘मुहुर्ता’ची संकल्पना बाबासाहेबांच्या अनुयायांमध्ये नाही,अशी विनंती दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सुधीर फूलझेले यांनी आज पत्र -परिषदेत केली.

याप्रसंगी बोलताना, शासनातर्फे धार्मिकस्थळे उघडली जाणार की नाही याची शाश्‍वती नसताना देखील समितीतर्फे दोन्ही दृष्टिने धम्मचक्र प्रर्वतन दिन सोहळ्याची तयारी करण्यात आली होती,असे फूलझेले यांनी सांगितले.इंग्रजी तारखेनुसार १४ ऑक्टोबर रोजी बाबासाहेबांनी दीक्षा घेतली असल्यामुळे अनुयायी देखील याच दिवशी दीक्षाभूमीवर दर्शनासाठी येतात.परिणामी गर्दी जास्त झाली तर शासनाचे करोनाचे नियम काटेकोरपणे पाळणे स्मारक समितीला कठीण जाईल,असे ते म्हणाले.अजूनही करोनाची दूसरी लाट अनेक जिल्ह्यांतून संपली नाही,परिणामी इतर जिल्ह्यांमधून अनुयायींनी यंदा दीक्षाभूमीवर येण्याचे टाळावे,असे अावाहन त्यांनी केले.गर्दी वाढली तर करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता शासनाने वर्तवली आहे,करोनाच्या दुस-या लाटेदरम्यानची विदारक स्थिती बघता,गर्दी टाळणे हेच उचित असल्याचे ते म्हणाले.

सुरक्ष्ति अंतराच्या दृष्टिने यावेळी स्मारक परिसरात पुस्तक विक्रीची दूकाने नसणार कारण या ठिकाणी सुरक्ष्ति अंतर ठेऊन अनुयायांची एकच रांग असणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच शासनच्या सूचनेनुसार ज्यांनी करोना लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत त्यांना किवा ७२ तासांपूर्वी ज्यांनी आरटीपीसीआर करोना चाचणी केली किवां २४ तासांपूर्वी ज्यांनी रेपिड ॲण्टिजन चाचणी केली अश्‍या अनुयायांना प्रमाणपत्र दाखवूनच स्मारकात प्रवेश घेता येईल.

याशिवाय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे ज्यांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी तसेच ६५ वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांना स्मारकामध्ये प्रवेश नसणार आहे.इतरांनी आपल्या वयाचा दाखला म्हणून आधार कार्ड किवा तत्सम कागदपत्रे दाखवणे बंधनकारक असल्याची माहिती त्यांनी दिली.याशिवाय गरोदर माता तसेच आजारी व्यक्तींनी दर्शन टाळावे अशी विनंती स्मारक समितीतर्फे करण्यात आली.

दर वर्षी जेवढी पोलिस कुमूक या सोहळ्यासाठी असते तेवढीच या वेळी देखील असणार आहे.दर्शनासाठी येणा-या अनुयायांना एकूण सहा ठिकाणी शासनाने निर्देशित केलेल्या सूचनेप्रमाणे लसीकरणाचे प्रमाणपत्र तसेच चाचण्यांचे निकाल याचा पुरावा दाखवूनच प्रवेश मिळेल असे त्यांनी सांगितले.या कामात पोलिस विभागासोबत समता सैनिक दलाचे सैनिकही मदतीसाठी राहतील.या शिवाय इतर जिल्ह्यातून येणा-या अनुयायांची सोय शहरातील इतर मठांनी आपापल्या मठात केल्यास दीक्षाभूमीवर याचा भार पडणार नाही,असे ते म्हणाले. सर्व व्यवस्था करण्यास नागपूर महानगरपालिका,पोलिस प्रशासन,विद्युत विभाग,आरोग्य विभाग तसेच शासनाच्या इतर विभागांकडून हा सोहळा साजरा करण्यास मदत होते त्या सर्वांचे आभार समितीतर्फे फूलझेले यांनी मानले.

यंदा प्रसादवाटप नाही-
प्रसादवाटपाच्या ठिकाणी गर्दी नियंत्रित राहू शकत नाही याशिवाय एका रांगेत गर्दी उभी राहू शकत नसल्याने शासनाच्या नियमानुसार यंदा स्मारक परिसरात किवा रस्त्यावर प्रसादवाटपाचे अन्नदान छत्र नसणार आहेत.

दर्शनासाठी बराच अवधी लागणार, अनुयायांनी संयम ठेवावा-
शासननियमानुसार प्रत्येक दोन व्यक्तिंमध्ये ६-६ फूटांचे अंतर राखणे बंधनकारक आहे.त्यामुळे एकेरी रांग राहणार आहे,परिणामी दर्शन घेण्यासाठी बराच विलंब लागणार असल्याने अनुयायांनी कोणताही गोंधळ न घालता संयम ठेवण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आले.

१५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वा.होईल बुद्ध वंदना-
१५ ऑक्टोबर विजयादशमी दिनी सकाळी ९ वा.पुज्य भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या उपस्थितीत निवडक भिख्खू संघ व स्मारक समितीचे पदाधिकारी बुद्ध वदंना घेऊन बाबासाहेबांना मानवंदना देतील.या कार्यक्रमाचे थेट प्रसारण ‘युसीएन बुद्धा’,‘आवाज इंडिया’तसेच ‘लॉर्ड बुद्धा’चॅनलवर केल्या जाईल.

मदतीचे आवाहन-
दीक्षाभूमीची संपूर्ण व्यवस्था ही दानातून चालते मात्र करोनाकाळातील गेल्या दोन वर्षांपासून दानपेट्या या उघडण्यात आल्या नाहीत.परिणामी स्मारक समितीकडे एक पैसा देखील नाही.परिणामी दानशूरांनी पुढे येऊन सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले.
काही खासगी संस्था या समाजमाध्यमांध्ये खोटा प्रसार करुन दीक्षाभूमीच्या नावाने देणग्या गोळा करीत असल्याची माहिती समितीला मिळाली आहे,अश्‍या संस्थांना हे आवाहन आहे त्यांनी असा गैरप्रकार करु नये तसेच त्यांनी असा गैरप्रकार न थांबविल्यास त्यांच्यावर समितीतर्फे कायदेशीर कारवाई केली जाईल,असा इशारा याप्रसंगी फुलझेले यांनी दिला.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारक समितीला ३५० कोटी देण्याची घोषणा २०१४-१५ मध्ये केली होती,त्याचे काय झाले?असा प्रश्‍न विचारला असता त्यांनी निवडणूकीच्या वर्षात जाता-जाता ४० कोटीं प्रशासकीय विभागाला प्रदान केले असल्याचे फूलझेले यांनी सांगितले.शासनाचा पैसा हा स्मारक समितीला सरळ न मिळता तो नागपूर सुधार प्रन्यास ,सार्वजनिक बांधकाम विभाग किवा महानगरपालिका इ.सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडे जमा केला जातो.हे ४० कोटी देखील नासुप्रकडे पडून आहेत मात्र अनेकवेळा पाठपुरावा करुन देखील अद्याप याला प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या