Homeनागपूर न्यूजकंपनीच्या नावाने फक्त जावई पाळलेत:आभा पांडे यांचा मनपा प्रशासनावर घणाघाती हल्ला

कंपनीच्या नावाने फक्त जावई पाळलेत:आभा पांडे यांचा मनपा प्रशासनावर घणाघाती हल्ला

मास ट्रांसीस्ट कंपनीचा कारभार भोंगळ:वर्दळीचे रस्तेच योजनेत समाविष्ट नाहीत

नागपूर,ता. ४ ऑक्टोबर २०२१ :मागील मनपाच्या सभेत विषय पत्रिकेवर असणा-या शहरातील पार्कींग सुविधेची जवाबदारी सांभाळणा-या एम/एस मास ट्रांसीस्ट कंपनीला, सर्वच झोनमध्ये लोकप्रतिनिधींसोबत आधी सादरीकरण करण्याचे आदेश महापौरांनी दिले होते.या कंपनीने सतरंजीपुरा झोनमध्ये सादरीकरण केले असता त्यात इतवारी,गांधीबाग,सतरंजीपुरा इ.सारख्या अतिशय वर्दळीच्या ठिकाणावरील पार्कींगचे नियोजनच केले नसल्याची धक्कादायक बाब समाेर आली,घाईगडबडीत निविदा काढण्यात आल्या का?असा प्रश्‍न उपस्कंथित करुन कंपनीच्या नावावर मनपा प्रशासन हे जावईच पाळत असल्याची घणाघाती टिका ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे यांनी सोमवारच्या मनपाच्या सभेत केली.

या कंपनीला या व्यवस्थेसाठी २०१६ मध्ये ६० लक्ष १८ हजार रुपये देण्यात आले आहे.ऑन स्टेट ६६ लक्ष दिले तर १६.५२ लक्ष देण्याचे शिल्लक आहे.मूळात या कंपनीने सतरंजीपुरा येथे सादरीकरण करताना अतिशय वर्दळीच्या बाजारपेठा,आठवडी बाजारांचा समावेशच केला नसल्याची तक्रार त्यांनी मांडली.गांधीबाग व सतरंजीपुरा झोनमधील कोणते भाग योजनेत घेतले असे विचारले असता,एक ही भाग घेतले नसल्याचे कंपनी सांगते.ज्या भागात शहरातील सर्वात जास्त वर्दळ असते व ज्या भागात पार्कींच्या नियोजनाची सर्वात जास्त गरज आहे असा एक ही भाग कंपनीने आपल्या योजनेत समाविष्ट केला नसल्याचे आभा पांडे यांनी सांगितले.

एकीकडे प्रशासकीय अधिकारी श्रीकांत देशपांडे सांगतात वाहतूक कोंडी नाही झाली पाहिजे म्हणून कंपनीला काम दिले दूसरीकडे अतिशय वर्दळीच्या रस्त्यांवरील पार्कींग व्यवस्थाच ही कंपनी करत नाही. मग काय कंपनीच्या नावाने मनपा प्रशासनाने फक्त जावईच पाळले आहेत का?असा संताप त्यांनी व्यक्त केला.

यावर उत्तर देताना प्रशासनाने सांगितले की कंपनीने अभ्यास केला,आराखडा तयार केला,प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण केले मात्र १८ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांसाठी पार्कींगची योजना लागू केल्यास गर्दीमध्ये आणखीनच भर पडेल व वाहतूक कोंडी होईल असे कंपनीचे मत आहे,त्यामुळे सतरंजीपुरा,गांधीबाग येथील वर्दळीच्या भागाचे नियोजन नाही करण्यात आले.वाहतुकीची वर्दळ असलेल्या भागात एरिया बेस्ड डेव्हलपमेंटचा पर्याय कंपनीने सूचवला असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.जास्त वर्दळीचा विषय योजनेपासून वेगळा आहे असे कंपनीचे मत आहे.

मग या भागांसाठी पार्कींगची व्यवस्थाच ही कंपनी करणार नाही का?असा प्रश्‍न आभा पांडे यांनी उपस्थित केला.प्रशासन फक्त घुमवाघुमवीची उत्तरे देत असल्याचा आरोप त्यांनी केला.जिथे वाहतूक कोंडी होते,वर्दळीचे रस्ते आहेत तिथे पाकींगची व्यवस्था द्या,अशी मागणी आभा पांडे यांनी केली.

शहरात पार्कींगची समस्या सुटावी,याबाबत दुमत नसल्याचे आभा पांडे म्हणाल्या.परंतु घाईत कामे होऊ शकत नाही.कंनपीने आराखड्यात अनेक बाजारपेठ,आठवडी बाजारांना योजनेत समाविष्टच केले नाही.त्याच वर्दळीच्या भागात नेहमी अपघात होत असतात.वर्दळीच्या भागातील वाहतूक सुलभ व्हावी यासाठी सतरंजीपुरा,लकडगंज,गांधीबाग परिसरातील रस्त्यांचा ही समावे आराखड्यात करणे गरजेचे असल्याचे आभा पांडे म्हणाल्या.

यावर महापौरांनी मनुकुमार श्रीवास्तव असताना त्यंानी पार्कींग व्यवस्थेवर विस्तृत असा प्रस्ताव मांडला होता.महसूल उत्पन्न वाढीसाठी पार्कींग आवश्‍यक आहे.अंतर्गत भागात ऑफ स्ट्रीट पार्कींग होऊ शकत असेल तर नगरसेवकांनी जागा सूचवावी,पण येथे नाही केले तर इतर ही ठिकाणी पार्कींग व्यवस्था होऊ नये हे धोरण योग्य नसल्याचे ते म्हणाले.

ही सरकारी संस्था आहे.शासनाच्या निर्देशानुसार या कंपनीला शहरातील वाहतूकीचे काम देण्यात आले आहे.मात्र व्यवस्थेमध्ये सुधार होणे देखील तेवढेच गरजेचे आहे.नो पार्कींगमध्ये वाहने उभी केल्यास वाहनचालकांना दंड भरावा लागतो,ते आम्हाला जाब विचारतात, कुठे पार्कींग करायची?

नगरसेवकांनी त्यांना काय हवे आहे याची येत्या १५ दिवसात सूचना द्यावी त्यांच्या सूचनांचा आराखड्यात समावेश करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.

Latest बातम्या