
गुडधे यांच्या कार्यकाळात नियमांची पायमल्ली:एकाच ठेकेदाराला दिले काम:भोयर यांचा आरोप
नागपूर,ता. २८ सप्टेंबर: मनपाच्या कालच्या विशेष सभेत काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफूल्ल गुडधे पाटील यांनी विशेष सभेच्या औचित्याचा मुद्दा उपस्थित करतानाच भाजपच्या सत्ताकाळात निधीवाटपात कसा दूजाभाव केला जातो यावरही अतिशय परखड टिका केली होती,एका वृत्तपत्रातील वृत्ताचा दाखला देत स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी त्यांच्या प्रभागात ३-३ लाखांचे कामाचे तुकडे करीत एकाच ठेकेदाराला कसे काम दिले,ठेके देण्यापूर्वीच ‘टक्केवारी’कशी निश्चित झाली या विषयी गंभीर आरोप केले होते.यावर प्रकाश भाेयर यांनी इलेक्ट्रोनिक मिडीयाच्या प्रतिनिधींची आज पत्र परिषद घेऊन गुडधेंनी सभेत जे आरोप केले ते संपूर्णत: चुकीचे असून गुडधे यांनी केलेल्या आरोपांची सिद्धता करावी असे आव्हान केले.
याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की एक ते दीड महिन्यांपूर्वी एका वृत्तपत्रात बातमी आली होती.प्रत्येकच बातमीचं खंडण करणे योग्य नाही आणि माझ्या पक्षात ‘टक्केवारीची‘अशी भूमिका चालतही नाही.प्रफूल्ल गुडधेंनी काल सभेत जे आरोप केले त्याची सिद्धता करण्याचे काही पुरावे असतील तर ते समाेर आणावे फक्त हवेत गोळीबार करुन त्यांना काही फायद्या होणार नसल्याची टिका भोयर यांनी केली.
३-३ लाख रुपयांच्या कामाच्या बाबतीत जर काही सांगायचं झालं तर प्रफूल्ल गुडधेंच्या ही प्रभागात वॉर्ड निधीचे माझ्याकडे आकडे आहेत. वॉर्ड निधीचे जवळपास २-२ लाख रुपयांचे १३ ते १४ तुकडे त्यांनी केलेले आहेत आणि ते ही एकाच ठेकेदाराला दिले आहे,जर ते आमच्यावर आरोप करत असतील तर त्यांनी ठेकेदारांकडून किती ‘टक्केवारी’खालली?हे त्यांनी सांगावं आणि त्यानंतर आमच्यावर आरोप करावे,अशी टिका त्यांनी केली.
सत्ता पक्षातील नगरसेवकांची,पदाधिका-यांची अश्या पद्धतीने बदनामी करण्याचाच त्यांचा हेतू आहे. वास्तवतेत प्रफूल्ल गुडधे पाटील यांनी स्वत:आधी आरशात पहावं कारण गेल्या ४ वर्षांत स्थायी समितीच्या माध्यमातून त्यांना जवळपास ८ ते १० कोटींच्या वर निधी मिळाला आहे.जिथे स्कीम बनते तिथेच रस्ता ते कापत आहे.या पद्धतीने अनेक कोटींची त्यांच्या स्वत:च्या स्वार्थासाठी मनपाचा निधी खर्च झाला आहे.त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगू नये आणि आम्हाला शिकवू ही नये,अश्या शब्दात भोयर यांनी गुडधे यांना ठणकावले.
वास्तविक पाहता त्यांची खंत वेगळी असल्याचे भोयर म्हणाले. आजपर्यंत ४ स्थायी समितीमधून त्यांनी पैसे घेतले,गुडधे यांनी माजी सर्व स्थायी समिती अध्यक्षांकडून निधी मिळवला मात्र मी अध्यक्ष झाल्यानंतर माझ्याकडे ते आले नाहीत,याचे कारण असे आहे की मी एक सामान्य घरचा कार्यकर्ता आहे.जेव्हा विनोद गुडधे पाटील भाजपमध्ये होते त्यांच्या माध्यमातून आम्ही काम करीत होतो,त्यांनी पक्ष सोडला मात्र मी भाजपमध्येच कार्यकर्ता म्हणून राहीलो.त्यांनी पक्ष सोडल्यानंतर ४ वेळेचे ते नगरसेवक आहेत पण एक साधे सभापती देखील ते झाले नाहीत आणि मी पहील्यांदा नगरसेवक झालो,४ वेळा सभापती झालो आणि भारतीय जनता पक्षाने मला स्थायी समितीचा अध्यक्ष देखील बनवले.खंत त्यांना त्या गोष्टीची जास्त आहे ते नगरसेवक आहेत पण साधे सभापती देखील झाले नाही.त्यांनी या गोष्टीची खंत माझ्यावर काढू नये आणि एका सामान्य कार्यकर्त्यावर अश्या पद्धतीचे आरोप लावू नये कारण तुम्ही जर काही नसेल झाला तर ते तुमच्या आणि तुमच्या पक्षामुळे नाही झालात,माझ्या पक्षाने मला मोठं केलं, त्यांच्यात पाटीलकीचे गुण आहेत त्यामुळेच या वर्षी ते माझ्याकडे निधी घेण्यासाठी नाही आलेत पण मागच्या ४ स्थायी समितीकडून त्यांनी पैसे घेतले आहे कारण त्यांना माझ्याकडून पैसा घ्यायचा नव्हता त्यांना फक्त माझ्यावर आरोप करायचे होते,पण त्यात एक ही पैशाचे तथ्य नाही, माझा स्पष्ट आणि स्पष्ट निषेध त्यांच्या आरोपांबाबत आहे.
त्यांच्यात पाटीलकी आहे आणि त्यांच्या पाटीलकीला आता धोका निर्माण होऊन राहीला त्यामुळे एक सामान्य कार्यकर्ता जेव्हा मोठा होतो हे त्यांना पाहवत नसल्याची जळजळीत टिका केली.
आज पर्यंंतच्या इतिहासात गेल्या ५० वर्षांपासून याच पद्धतीने निधीचे वाटप करण्यात आले असल्याचे ते म्हणाले.जे जे नगरसेवक निधी मागतात त्यांचे काम पाहून त्या त्या पद्धतीचे पत्र देण्यात येतात.तो ठेकेदार कोणता काय आहे आमचा त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचे ते म्हणाले
.त्यांच्याच भागातील नगरसेविका प्रणीता शहाणे यासुद्धा माझ्याकडे ३ लाख रुपयाचे पत्र घेण्याकरीता आल्या मी त्यांना जवळपास ७ पत्र दिले.नागपूरातील सर्वच प्रभागांच्या ज्या ज्या नगरसेवकांनी त्यांना ३-३ लाख रुपयांचे डिमांड पत्र देण्याची मागणी केली त्या सर्वांनाच असे पत्र देण्याचा प्रयत्न झाला.शेवटी एकच ठेकेदार असेल तर त्यांनी सांगावं पण,सर्वांची मागणी तीच असते,एकच ठेकेदार असेल तर मनपा आयुक्त त्यासंबधी निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले.
गुडधे यांचा फक्त एक साधारण घरातील सामान्य कार्यकर्त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न आणि भारतीय जनता पक्षाला निवडणूकीच्या दृष्टिने अडचणीत आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत पण ते यशस्वी होणार नाही असा दावा ही भोयर यांनी केला.
मी त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही मात्र त्यांनी आरोप सिद्ध करावे अशी माझी मागणी असल्याचे ते म्हणाले.मी कधी प्रभाग क्र.३६ मध्ये एक कोटी रुपये खर्च केले ही माहिती त्यांनी कूठून आणली मलाच कळत नाही,त्यांनी दाखवावे,पुरावे द्यावे नाही तर मी काँग्रेसच्या सर्वच नगरसेवकांना किती निधी दिला आणि प्रफूल्ल गुडधेंना गेल्या ४-५ वर्षात किती निधी मिळाला याची संपूर्ण माहिती देईल,असे ते म्हणाले.

स्थायी समिती मला पैसा देत नाही-प्रफूल्ल गुडधे पाटील
सर्वात पहीली गोष्ट स्थायी समिती अध्यक्ष मला पैसे देणारे काेण?मला पैसा देण्याचा अधिकार स्थायी समितीच्या अध्यक्षांना आहे का?भोयर जर असे विधान करीत आहेत तर त्यांनी आधी स्वत:चा आरोप तपासून घ्यावा.ते स्वत: स्थायी समिती अध्यक्ष आहेत नगरसेवकांना त्यांना निधी देण्याचा अधिकार आहे का कायद्यायप्रमाणे?मी जर आधीच्या ४ स्थायी समितीच्या अध्यक्षांकडून निधी घेतला असे त्यांचे म्हणने आहे तो निधी महानगरपालिकेचा असतो तो विकासकामांसाठी असतो.याशिवाय अध्यक्षांकडे जो काही ४-५ कोटींचा स्वेच्छा निधी असतो मी कधीही तो निधी कोणत्याच अध्यक्षांकडून आजपर्यंत घेतला नाही.माझ्या प्रभागातील विकासकामे मी मनपाच्या पैश्यातून केली आहे.
राहीली गोष्ट पाटीलकीची तर त्यांना काय समजायचं आहे हा त्यांचा प्रश्न आहे.त्यांना जर पोलिस कारवाई करायची नसेल तरी त्यांनी स्वत:च्या अंर्तमनाला विचारावं की मी जो काही आक्षेप घेतला त्यात सत्य आणि तथ्य अाहे की?ते सिद्ध करायची गरज नाही त्यांचं अंर्तमनच त्यांना सांगेल.त्यांना जर असं वाटत असेल की त्यांचं चारित्र्यहनन होत आहे तर कायदेशीर मार्ग त्यांच्याकडे उपलब्ध आहेच.




आमचे चॅनल subscribe करा
