Homeनागपूर न्यूजशांतीनगरच्या नागरिकांसाठी आभा पांडे यांचा एल्गार

शांतीनगरच्या नागरिकांसाठी आभा पांडे यांचा एल्गार

गेल्या सहा महिन्यांपासून नागरिकांची पाण्यासाठी फरफट:अनियमित आणि दूषित पाण्याचा पुरवठा

ओसीडब्ल्यूच्या अधिका-याला आभा पांडे यांनी धरले धा-यावर

नागपूर,ता.६ सप्टेंबर:प्रभाग २१ मधील अनेक भागात गेल्या ६ महिन्यांपासून अनियमित व दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे.पाणी ही मानवी जीवनासाठी मूलभूत गरज असताना व पाणी,मल निस्सारण,शिक्ष् ण,परिवहन व आरोग्य सुविधा पुरविण्याची सर्वस्वी जवाबदारी महानगरपालिकेवर असताना भाजप सत्ताधा-यांच्या पहील्याच कार्यकाळात, हेच नागरिकांच्या हक्काचे पाणी खासगी अश्‍या ’ऑरेंज सिटी वर्क्स‘(ओसीडब्ल्यू)ला विकण्यात आले,याचे दुष्परिणाम आता समस्त नागपूरकर नागरिक सातत्याने भोगत आहेत.प्रभाग २१ च्या नागरिकांचा जीव शुद्ध व नियमीत पाण्यासाठी वेठीस लागला असल्याचे कळताच राष्ट्रवादीच्या नेत्या व ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे यांनी अोसीडब्ल्यू तसेच मनपाच्या जलप्रदाय विभागाविरुद्ध स्थानिक नागरिकांना घेऊन एल्गार पुकारला.

आभा पांडे यांनी नागरिकांना घेऊन शांतीनगर जलकुंभ गाठताच कर्मचा-यांचे धाबे दणानले.काही वेळातच मनपाचे कार्यकारी अभियंता मनोज गणवीर व ओसीडब्ल्यूचे अधिकारी पोहोचले.आभा पांडे यांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले.आभा पांडे यांच्या इशा-यानंतर अधिका-यांनी लवकरच पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्‍वासन दिले.

प्रभाग २१ मधील शांतीनगर,गोंडपुरा,तेलीपुरा,बांगडे प्लाॅट,बस्तरवाडी,बिडी कारखाना,श्रीरामवाडी,लालगंज आदी परिसरात गेल्या ६ महिन्यांपासून पाणीपुरवठा अनियमित होत आहे.याशिवाय दूषित पाण्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले होते.

नगरसेविका आभा पांडे यांच्याकडे आज नागरिक पुन्हा तक्रार घेऊन गेले असता नागरिकांसह आभा पांडे यांनी तडक शांतीनगर जलकुंभ गाठले.पांडे यांनी प्रभाग २१ मधील नागरिकांना नियमितपणे पाणी पुरवठा करण्याची सूचना करीत कर्मचा-यांवर संताप व्यक्त केला.
मनपा जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज गणवीर तसेच ओसीडब्ल्यूच्या अधिका-याने लवकरच पाणी पुरवठ्याची समस्या निकाली काढण्याचे आश्‍वासन दिले.

Latest बातम्या