
.
नागपूरात ५५ स्पॉट धोक्याचे: उद्यापासून ३१ चौकात जनजागृतीची मोहीम
नागपूर,ता. ४ सप्टेंबर: गेल्या ७ वर्षांपासून पर्यावरणसंबधीत उपक्रम नागपूरात राबवले.यात जल प्रदुषण असो,वृक्ष्ारोपणाची मोहीम असो,वीज बचतीचा उपक्रम असो,तलावाच्या स्वच्छेसंबधीचा तसेच कृत्रिम तलावात गणेश विसर्जनाचा उपक्रम असो सातत्याने राबवले,आता मात्र शहरातील धोक्याची पातळी ओलांडणा-या ‘ध्वनि’प्रदुषणाकडे मोर्चा वळवला असून या प्रदुषणामुळे नागपूरकर नागरिकांच्या आरोग्याला जो धोका निर्माण झाला तो आटोक्यात आणण्यासाठी उद्या ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते १२ व.दरम्यान ‘ग्रीन अर्थ’ संघटनेच्यावतीने शहरातील इतर काही सामाजिक संस्थांच्या मदतीने नागपूरातील एकूण ३१ अश्या अतिशय रहदारीच्या चौकात जनजागृतीपर उपक्रम राबविणार असल्याचे ‘ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन’चे अध्यक्ष् व माजी आमदार प्रा.अनिल सोले यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्र -परिषदेत सांगितले.
याप्रसंगी बोलताना ते म्हणाले,की ५ सप्टेंबर देशाचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती असून या दिवसापासूनच या उपक्रमाला सुरवात करण्यात येणार आहे तसेच जवळपास १ लाख घरापर्यंत देखील पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
नुकतीच या उपक्रमासंबंधी नीरीमध्ये बैठक पार पडली.बैठकीत नीरीचे संचालक डॉ.चंद्रशेखर यांनी सांगितले की महाराष्ट्रात एकूण २७ शहरात ध्वनि प्रदुषणाची समस्या असून नमुना म्हणून त्यांनी नागपूर आणि मुंबईची निवड केली.या संशोधनात त्यांना नागपूरात एकूण ५५ असे स्पॉट आढळले ज्या चौकात ध्वनि प्रदुषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
या ध्वनि प्रदुषणाचे दुष्परिणाम हे दृष्य स्वरुपात दिसत नसले तरी अवेळी बहीरेपण,मानसिक स्थिती खराब होणे,अस्वस्थता,चिडचिड,निद्रादोष,ह्दयविकार,उच्च रक्तदाब इ.असा मानवी शरिरावर विपरित परिणाम होतो.
आंतरराष्ट्रीय मानकप्रमाणे रात्री ४५ डेसीमल तर दिवसा ५५ डेसीमलपर्यंत आवाज असला पाहिजे मात्र नागपूर शहरात दिवसा ५५ पेक्ष्ा किती तरी अधिक ध्वनि प्रदुषण घडत आहे.एखाद्या रहदारीच्या चौकात दिवसभरात ७० ते ८० हजार हॉर्न वाजतात,यातील फक्त ६ ते ७ हजारच आवश्यक वेळी वाजवण्याची गरज असते.येथे तर नागपूरकर वाहनचालक रेड सिग्नल लागला तरी मागे उभे राहून पुढच्यांसाठी हॉर्न वाजवतात,याशिवाय ग्रीन सिग्नल लागताच पुढच्या वाहनचालकांनी गतीने पुढे निघावे म्हणून मागचे हॉर्न वाजवतच राहतात!
शक्यतोवर सिग्नलवर हॉर्नचा उपयोग करु नये,मी शांततेत प्रवास करेल,मी आहे जवाबदार नागरिक,असे स्टीकर आम्ही चौका-चौकात वाहनचालकांना मोफत देणार असल्याचे सोले यांनी सांगितले.
हा उपक्रम सतत चालू राहणार असून रोटरी क्लब,संती गणेशोत्व,शिक्ष् क परिषद,शिक्ष् क सहकारी बँक इ.संस्थांच्या मदतीने हा जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
या उपक्रमात आम्ही अनेक शाळांना देखील सहभागी होण्यास पत्र दिले असल्याचे ते म्हणाले.ऑन-लाईन शिकवणी वर्गाच्या दरम्यान अर्धा मिनिट थांबून शिक्ष् कांनी या उपक्रमाविषयी माहिती द्यावी व जवाबदार व जागरुक पिढी घडवावी,अशी विनंती शाळा संचालकांना केली आहे.
या जनजागृतीपर उपक्रमामुळे नागपूर निश्चितच पुढील वेळी ध्वनि प्रदुषणाच्या संदर्भात एक मानक खाली येईल,जवळपास ७ डेसीमलपर्यंतचे प्रदुषण या जनजागृतीपर उपक्रमामुळे कमी होऊ शकेल,असी अपेक्ष्ा त्यांनी व्यक्त केली.नागपूरकर जनतेने मोठ्या प्रमाणात या उपक्रमात सहभागी व्हावं व सहकार्य करावं असे आवाहन प्रा.सोले यांनी केले.
अलीकडे देशात अनेक विमानतळावर विमानाबाबतच्या घोषणा बंद केल्या असून प्रवाश्यांच्या मोबाईलवर फक्त सूचना येतात,सुरवातीला प्रवाश्यांना याचा खूप त्रास झाला मात्र ध्वनि प्रदुषण कमी करण्यासाठी पुढे त्यांचे ही सहकार्य मिळत गेले.
ध्वनि प्रदुषणाबाबत आपल्या देशात कठाेर कायदे देखील आहेत मात्र कायद्याच्या धाकापेक्ष्ा जनजागृतीमुळे प्रभावी परिणाम साधता येतो,असे ते म्हणाले.सुरवातीला नागपूरकर भाविकांनी कृत्रिम तलावांमध्ये गणपती मूर्तींच्या विसर्जनासाठी सहकार्य देण्यास मनाची तयारी दाखवली नव्हती आता मात्र अडीच लाख गणतपी मुर्तींचे कृत्रिम तलावांमध्येच विसर्जन केल्या जातं,असे उदाहरण त्यांनी दिले.




आमचे चॅनल subscribe करा
