फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमनपा अति.आयुक्त राम जोशी यांची अखेर बदली: आयुक्तांचा पदमुक्त करण्यास शासनाला नकार!

मनपा अति.आयुक्त राम जोशी यांची अखेर बदली: आयुक्तांचा पदमुक्त करण्यास शासनाला नकार!

Advertisements

६ आगस्ट रोजी शासन आदेश येऊन धडकले

चंद्रपूरमध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी पदावर नियुक्ती

नागपूर,ता. ९ ऑगस्ट: नागपूर महानगरपालिकेचे अति.आयुक्त राम जोशी यांचे बदलीचे आदेश अखेर मनपात येऊन धडकले.गेल्या ५ वर्षांपासून ते एकाच पदावर कार्यरत होते,विशेष म्हणजे त्यांच्यावर अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता मात्र ६ ऑगस्ट रोजी शासनाचे बदलीचे आदेश मनपात येऊन धडकले असले तरी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांनी त्यांना पदमुक्त करण्यास नकार दिला असल्याची मनपात चांगलीच चर्चा रंगली आहे.

जोपर्यंत त्यांच्या जागी इतर कोणाची नियुक्ती होत नाही तोपर्यंत राम जोशी यांना पदमुक्त करता येणार नसल्याचे पत्र आयुक्तांनी शासनाला पाठवले असल्याचे सांगितले जात आहे.

करोनाच्या तिस-या लाटेची शंका देशातील तज्ज्ञांनी वर्तवली असल्याने प्रशासनावर देखील त्याचा ताण येणार हे स्वाभाविक आहे अश्‍यावेळी राम जोशी यांचा सारखा अनुभवती अधिकारी राधाकृष्णन बी.यांना हाताशी असणे गरजेचे वाटत असल्यानेच त्यांनी शासनस्तरावर राम जोशी यांची बदली थांविण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे.

स्वत: आयुक्त पदी म्हणजे प्रशासनाच्या सर्वोच्च पदी विराजमान असताना तसेच इतरही अति.आयुक्त हाताशी असताना आयुक्तांना राम जोशी यांचा एवढा मोह का?मनपातील भाजप सत्ताधारी आयुक्तांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन गोळी चालवत असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.

करोना काळात आरोग्य विभागावर भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.केंद्र व राज्य सरकारकडून कोविड-१९ साठी मनपाला प्राप्त झालेल्या कोट्यावधी रुपयांचा हिशेब राम जोशी यांच्यासारख्या अनुभवी अधिका-यांनी लीलया सांभाळला,राष्ट्रवादीच्या नेत्या व ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे यांनी तर पत्र परिषद घेऊन आरोग्य विभागावर संपूर्ण पुराव्यानिशी गंभीर आरोपांची श्रृंखला मांडली होती.

आरोग्य विभागाचे प्रमुख म्हणून राम जोशी यांना भ्रष्ट कारभाराच्या कठघ-यात ही त्यांनी उभे केले होते.गेल्या ५ वर्षांपासून एकाच पदावर ठाण मांडून बसलेले राम जाेशी यांना मात्र शहरातील भाजपच्या मोठ्या नेत्यांकडून तसेच मनपातील भाजप सत्ता-यांकडून सातत्याने ‘अभय’प्राप्त झाले असल्याने त्यांचा पदावर कोणतीही गदा येऊ शकली नाही.

विशेष म्हणजे मनपाच्या सर्वसाधारण सभेत राम जोशी यांच्यावर तसेच आरोग्य विभागाच्या एकूणच अतिशय भ्रष्ट कारभारावर विरोधकांनी वारंवार कठोर तोशेरे ओढून देखील आयुक्त तुकाराम मुंढे पासून राधाकृष्णन बी.पर्यंत सर्वांनी राम जोशी यांची पाठराखणच केली असल्याचे नागपूरकरांनी पाहिले आहे.

भाजप सत्ताधा-यांसोबत राम जोशी यांचे अतिशय निकटचे ‘अर्थपूर्ण’ संबंध बघता राम जोशी यांची मनपातून गच्छंती सत्ताधा-यांनाही येत्या निवडणूकीचा काळ बघता परवडणारी नाही.दूसरीकडे आयुक्तांना स्वत:च्याच क्ष् मतेवर विश्‍वास नसल्यानेच त्यांना राम जोशी यांचा ‘आसरा’घ्यावा लागत असल्याची चर्चा देखील मनपात रंगली आहे.

तिसरी लाट आलीच तर नागपूरची संपूर्ण भौगोलिक स्थिती माहिती असणा-यां अधिका-याचीच आरोग्य विभागाला गरज आहे तसेच राम जोशी यांच्याशिवाय इतर अति.आयुक्तांचा अद्याप संबंध नागपूरकरांशी आला नसल्याचे कारण सांगून आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी राम जोशी यांच्या बदलीला शासन दरबारी विरोध दर्शवला असल्याचे बोलले जात आहे.

मनपात गेल्या दोन वर्षात दर महिन्यात ५० ते ५५ अधिकारी-कर्मचारी निवृत्त होत आहेत मात्र गेल्या अनेक वर्षांपासून भर्तीची प्रक्रिया पूर्णपणे बंद आहे त्यामुळे आधीच मनपात अधिका-यांची वाणवा आहे अश्‍यावेळी अनुभवी अधिकारी हे देखील बदली होऊन गेल्यास करोनाच्या काळात प्रशासकीयस्तरावर याचे चुकीचे पडसाद उमटतील,असा प्रतिवाद प्रशासकीयस्तरावर केला जात आहे.

मात्र याच पदावर रविंद्र कुंभारे,दांडेगावकर,नैना गुंडे,हेमंत पवार आदी यांच्यासारखे अधिकारी येऊन गेलेत व आपल्या कामाचा ठसा उमटवून गेलेत त्यांना कुठे नागपूरच्या भौगोलिक स्थितीची माहिती होती?असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

मनपाची निवडणूक येत्या सहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे अश्‍यावेळी सत्ताधा-यांचे तारणहार समजल्या जाणारे अति.आयुक्त राम जोशी यांची बदली चंद्रपूरमध्ये होणे ही आघाडी सरकारची सत्ताधारी भाजपवर आणखी एक कुरघोडी असल्याची देखील चर्चा चांगलीच रंगली आहे.

आयुक्त राधाकृष्णन बी. अति.आयुक्त राम जोशी यांची बदली रोखण्यास यशस्वी होतात का?याकडे आता नागपूरकरांचेही लक्ष् लागले आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या