फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजशहरभर डेंग्यूचा शोध... मनपाचा दिव्याखालीच अंधार

शहरभर डेंग्यूचा शोध… मनपाचा दिव्याखालीच अंधार

Advertisements

गांधीसांगर कृत्रिम विसर्जन टाके भयंकर दूषित:डेंग्यूचे ही वास्तव्य

एक कोटीच्या टाक्याची गेल्या ४ वर्षांपासून स्वच्छताच नाही!

भाजपचा प्रकल्प आणखी कसा असणार?परिसरातील नागरिकांचा संताप

नागपूर,ता. ३१ जुलै: एकीकडे घराघरात कूलर,टायर,कुंड्या स्वच्छ करा,पाणी साचत असेल तर कोरडे करा असे नागपूर महानगरपालिकेचे नागपूरवासीयांना दररोज केले जाणारे आवाहन त्याच धर्तीवर शहरात डेंगीने घातलेले थैमान रोखण्यासाठी महापौरांपासून तर जिल्हाधिका-यांपर्यंत ‘उच्चस्तरीय ’बैठकांचा दौर ही सुरु असताना दिव्याखाली अंधार या उक्तीची प्रचिती गांधीसागर तलावाजवळ गणपती विसर्जनासाठी ४ वर्षांपूर्वी १ कोटी रुपये खर्च करुन निर्माण करण्यात आलेले कृत्रिम टाके देत आहे. आज हेच टाके परिसरातील नागरिकांसाठी आता जीवघेणे ठरले असल्याचे चित्र उमटले आहे.

याबाबत सोशल मिडीयावर भाजप सत्ताधा-यांना तेथील जनता चांगलीच धारेवर धरत असून अगदी त्याच दुर्गंधीयुक्त तलावासमोर राहणारे भाजपचे नगरसेवक प्रमोद चिखले यांचा तर तेथील नागरिक दररोज शब्दसुमनांनी चांगलाच उद्धार करत असतात.स्वत: भाजपचे हे नगरसेवक या दुर्गंधीमुळे त्रस्त असले तरी टाक्याच्या स्वच्छतेसाठी मात्र हात वर करीत असल्यामुळे येथील नागरिकांचा चांगलाच रोष त्यांच्यावरही ओढवला आहे.

४ वर्षांपूर्वी मनपाच्या भाजप सत्ताधा-यांनी गांधी सागर तलावाच्या पर्यावरणीय संरक्ष् णासाठी या कृत्रिम तलावाचे निर्माणकार्य केले होते मात्र नागपूरकर नागरिकांच्या कष्टाच्या पैश्‍यातून निर्मित झालेली ही ९८ लाख रुपयांची निर्मिती आता येथील नागरिकांच्याच जीवावर उठली आहे.गांधी सागर तलावाचे पर्यावरण अबाधित राखण्यासाठी भाजपचा हा ‘पारलौकिक’प्रकल्प आता येथील रहीवाश्‍यांनाच ‘नरक’ नावाच्या परलोकाचा अुनभव देत धोकादायकरित्या त्यांच्या प्रकृतीच्या मूळावर उठला असल्याची टिका होत आहे.

मनपातील भाजपचे सत्ताधारी हे खाऊगल्ली असो किवा या टाक्याच्या निर्मितीसाठी घेतलेला पुढाकार असो, कोणत्याही प्रकल्पाचा शुभारंभ करण्यास ज्या जलद् गतीने कार्यरत होते ती वाखाण्यासारखी असते मात्र प्रकल्पाचे उद् घाटन झाले व प्रकल्पाची वास्तू उभी झाली की नंतर त्याचे काय झाले?याच्याशी या सत्ताधा-यांना काहीही एक कर्तव्य राहत नसल्याची बोचरी टिका ही समाजमाध्यमात उमटली आहे.जनतेच्या सुविधेसाठी असणारे मनपाचे हे प्रकल्प नंतर जनतेच्याच जीवावर कसे उठतात याची ही टाकी मूर्तीमंत उदाहरण असल्याचे सांगितले जात आहे.

विशेष म्हणजे या टाकीच्या निर्मितीची डिझाईन कंत्राटदाराच्या ज्या वास्तूबहाद्दरने तयार केली त्याला ‘नोबेल’पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी ही जोर धरत आहे.या टाकीमध्ये तलावाचे पाणी सतत झिरपत असतं एवढी खोली ठेवण्यात आली आहे.या टाकीत विसर्जित करण्यात आलेले निर्माल्य,तेल,दिवे,फूलवाती इ.संपूर्ण साहित्य अगदी जसे त्या तसे गांधीसागरमधील जलदेवतेला ‘समर्पित’होत असल्याने या टाकीचा मूळ उद्देश्‍यच काय आहे?हा प्रश्‍न अद्याप नागपूरकर भाविकांना पडला आहे?टाकी पेक्ष्ा सरळच मग गणेश मूर्ती गांधी सागरमध्ये विसर्जित करु द्या ना?कशाला एक कोटी रुपये पाण्यात घालवले?असा प्रश्‍न ही मनपा सत्ताधा-यांना विचारला जात आहे.
या टाक्याची निर्मिती झाली त्या दिवसापासून स्वच्छताच झाली नसल्याने तलावाशेजारी असणा-या गणेश मंदिरात,महादेव मंदिरात येणा-या भाविकांचा जीव ही दूर्गंधीमुळे कासाविस होतो.देवासमाेर नाकावर रुमाल कसा धरावा?देवतेचा अपमान होईल या भीतीने ती अतिशय घाणेरडी दूर्गंधी मंदिरात येणारे भाविक सहन करतात व आपल्या आराध्य देवतेचे दर्शन आटोपते घेत पळ काढताना दिसतात!

आज संपूर्ण शहरच डेंगीच्या विळख्यात सापडले आहे,अश्‍यावेळी मनपा मुख्यालयात बैठका घेतल्याने जनतेच्या आरोग्याचे प्रश्‍न सुटणार नसून मनपातील यंत्रणेला त्वरीत युद्धस्तरावर जुंपण्याची गरज असताना ,नागरिकांना मनपाच्या मलेरिया व फायलेरीया विभागाने कोविड-१९ प्रमाणेच ‘देवाच्या भरवश्‍यावर’ सोडल्याचे चित्र दिसत आहे.

३ महिन्यांपूर्वी रॅमवर चालत-चालत मोबाईलवर बोलत असताना एका सद् गृहस्थाचा पाय घसरुन ते या दूर्गंधीयुक्त टाक्यात पडले आणि त्यांचा जीवच गेला,असे येथील रहीवाशी सांगतात. टाकीत ऑक्सजीनच नसल्याने त्यांचा जीव गेला मात्र त्यांचा अपघाती मृत्यू नंतर आत्महत्या ठरवल्या गेल्याने मनपाचे पदाधिकारी हे‘निर्दोषच‘राहीले,अशी दबकी चर्चा ही ऐकू येते.
७-७ लाखांचे यंत्र ही गेले पाण्यात!

मनपाच्या भाजप सत्ताधा-यांनी या टाकीच्या निर्मितीप्रमाणेच गांधी सागर तलावातील ऑक्सीजन लेवल योग्य ठेवण्यासाठी ४ वर्षांपूर्वी तलावाच्या मधोमध दो यंत्रे बसवली होती.मात्र ही यंत्रे केवळ दोन महिने तग धरु शकली. आज ही ती यंत्रे पाण्यात तरंगताना दिसतात व नागरिकांच्या घामाच्या कराचा पैसा अर्थात १४ लाख रुपये हे देखील त्या पाण्यात गडप झाल्याचे अवशेष आता दृष्टिक्ष्ेपातही पडत नाही!गांधी सागर तलावातून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सातत्याने करणारे जगदीश खरे यांनी तर त्या दोन्ही यंत्राचे प्रेत काढण्यासाठी प्लेटफॉर्मच बनवले असल्याचे येथील रहीवाशी दररोजच बघतात…!

विशेष म्हणजे भाजप सत्ताधा-यांना ही यंत्रे बसवण्यासाठी अवघ्या भारतात गुजरातशिवाय इतर दुसरे राज्यच सापडले नव्हते,ही यंत्रे बसवण्यासाठी ‘खास‘पंतप्रधानांचे गृहराज्य असणा-या गुजरातच्या कंपनीकडून ही यंत्रे खरेदी करण्यात आली होती, हे विशेष.

हे ही काय कमी होते की मनपातील भाजप सत्ताधा-यांनी तलावात फव्वारेही बसविण्याचे कंत्राट गुजरातच्याच एका कंपनीला दिले ,आज ११-११ लाखांचे हे फाऊंटेनदेखील भर पाण्यात उभे असूनही विना पाण्याची शोभेची वस्तू म्हणून उभी आहेत.

नागपूरकर नागरिकांच्या घामाचा पैसा किती निर्दयतेने अश्‍या प्रकल्पांवर खर्च करण्यात आला,याची प्रचिती नागपूरकर जनतेला ऐन कोविड-१९ महामारीच्या काळात झाली.गेल्या १५ वर्षाच्या सत्ताकाळात हाच पैसा मनपाच्या दवाखान्यांवर,ऑक्सीजन,बेड्स,व्हेंटिलेटर्स आणि औषधांवर खर्च केला असता तर या शहरातील हजारो प्राण वाचवण्यास यश मिळाले असते.हाच प्रश्‍न समाज माध्यमांवर काँग्रेसच्या तत्कालीन मनपा सत्ताधा-यांनाही मोठ्या प्रमाणावर विचारला जात आहे.

हा तलाव चारही बाजूने खूला आहे. त्यामुळे किती ही निर्बंध घातले तरी कोणत्याही कोप-यातून भाविक गणेश विसर्जन करीत असतात.यामुळे येथील मासोळ्यांचे आरोग्य धोक्यात येतं.दरवर्षी गणेश विसर्जनानंतर मोठय्ा प्रमाणत मृत माश्‍यांचा थर येथील रहीवाश्‍यांना बघायला मिळतो व त्या ही दूर्गंधीचा सामना करावा लागत असतो.

श्रद्धेसमाेर पर्यावरण हतबल!
मूळात निसर्गाने माश्‍यांसाठीचे अन्न पाण्यातच निर्माण केले असतानाही येथील झूलेलाल मंदिरात येणारे भाविक मोठ्या प्रमाणात तलावातील माश्‍यांना ब्रेड खाऊ घालतात,मासे ते खाऊन तर घेतात मात्र यांनतर ते मृत पावतात कारण मैदा हे मासोळ्यांचे खाद्य नाही,येथील ‘गांधी सागर उद्यान कल्याणकारी सोसायटीचे’ अध्यक्ष् राजेश कुंभलकर यांनी यासाठी झूलेलाल मंदिरात ब्रेड विक्रीवर आक्ष् ेप ही नोंदवला होता.मोठे आंदोलन ही उभारले होते.त्यांचा लढा भाविकांविरुद्ध नसून पर्यावरणासाठीचा होता.

श्रद्धेच्या नावावर मासोळ्यांचा जीव घेण्याचा अधिकार आम्हाला कोणत्याही देवानेही दिला नसल्याचा तर्क ते देतात. तीच बाब गणेश मंदिरात व महादेवाच्या मंदिरात येणा-या भाविकांवरही लागू हाेते असे ते सांगतात.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या