फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजआज संघटना उद्या कर्मचारी रस्त्यावर उतरतील:व्यापारी संघटनांचा सरकारला इशारा

आज संघटना उद्या कर्मचारी रस्त्यावर उतरतील:व्यापारी संघटनांचा सरकारला इशारा

Advertisements


२४ संघटनांनी काढली विशाल कार व बाईक रॅली

नागपूर,ता. २७ जुलै: करोनाच्या संभाव्य तिस-या लाटेच्या शक्यतेची आधीच धास्ती घेऊन राज्य सरकारने महाराष्ट्रात करोनासंबधी नवे ४ जून पासून निर्बंध लागू केले त्यात लेव्हल-३ मध्ये असू शकणा-या नागपूर जिल्ह्यावर देखील निर्बंध आले आणि व्यापारी संघटना सरकारच्या या निर्बंधांच्या विरोधात काल पासून रस्त्यावर उतरल्या.काल शहरातील २४ संघटनांनी संविधान चौकात सरकारला इशारा देत विशाल मोर्चा काढला तर आज मंगळवार दि. २७ जुलै रोजी हिस्लॉप कॉलेज पासून विशाल कार व बाईक रॅली काढली,याप्रसंगी अनेक संघटनांच्या संचालकांनी प्रसार-प्रचार माध्यमांशी बोलताना ‘आज व्यपारी वर्ग रस्त्यावर उतरला आहे,सरकाने निर्बंध तरीही नाही उठवले तर उद्या व्यापा-यांवर तसेच विविध संचालकांवर निर्भर असणारे लाखो कर्मचारी व कलावंत हे आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरतील तेव्हा मग कायदा व सुव्यवसथेची जवाबदारी ही सरकारवर असेल’,असा इशारा देण्यात आला.

शासनाने नागपूरात मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेल्या व्यापारी व विविध संघटनांच्या मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार करुन नागपूर जिल्ह्यात जिथे करोनाचा प्रादुर्भाव हा अतिशय कमी झाला आहे,तरी देखील लेव्हल-१ जिल्ह्याचे निर्बंध नागपूर जिल्ह्यावर लादण्यात आले ते मागे घेऊन व्यापारी वर्गाला सायंकाळी ७ पर्यंत व्यापार करण्याची परवानगी द्यावी,अशी मागणी केली आहे.जिल्ह्यातील रेस्टॉरेंटना रात्री १० पर्यंत सुरु ठेवण्याच्या परवानगीसह ऑस्कर सांस्कृतिक संगीत कला अकादमीचे अध्यक्ष् पी.कुमार तसेच विदर्भ लाईट्स अोनर्स असोशिएनचे मिथून मित्रा यांनी देखील गेल्या दीड वर्षांपासून सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी असल्यामुळे व लग्नसोहळ्यावर देखील फक्त ५० माणसे उपस्थित राहण्याचे निर्बंध असल्यामुळे या व्यवसायावर निर्भर असणा-या शेकडो कलावंत,ध्वनि व्यवस्थापक,प्रकाश व्यवस्थापक व त्यांच्या वर निर्भर कर्मचारी,या कर्मचा-यांचे कुटुंबिय,बॅक स्टेज कलावंत,कॅटरिंगचे व्यवसायी,फूलवाले,डीजेवाले इ.समाजाच्या या घटकांवर अक्षरश:उपासमारीची वेळ आली असल्याचे सांगत कार्यक्रमांवरील बंदी तातडीने उठवण्याची मागणी केली.

एकीकडे सरकार निर्बंधाचा कालावधी वाढवत जात आहे दूसरीकडे व्यापारी वर्गाचे आर्थिक कंबरडे मोडले असतानाही व कलावंत वर्ग हा अक्षरश: रस्त्यावर आल्यानंतर ही निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यास मायबाप सरकार इच्छूक नाही.संभाव्य तिस-या लाटेच्या भीतीपोटी राज्य सरकारने निर्बंध ‘जैसे थे‘ठेवले आहे तीच ‘री‘ओढत महानगरपालिकेने देखील निर्बंधामध्ये बदल केलेला नाही.त्यामुळे व्यापारी वर्ग पराकोटीचा नाराज आहे.

निर्बंधामुळे व्यापारी वर्ग आर्थिकदृष्टया कमकुवत झाला असून सणासुदीचा पुढील काळ बघता सरकारने निर्बंध शिथिल करणे आवश्‍यक आहेत,सध्याची बाधितांची संख्या बघता हे निर्बंध हटविणे सरकारला शक्य आहे.निर्बंध हटविल्यास आज आम्हाला व्यापार करता येईल,भविष्यात तिसरी लाट आलीच तर त्याच्या सामना करण्यासाठी अर्थसहाय्याची तजवीज ही आज होऊ शकणा-या व्यापारातून करता येईल,व्यापारच होणार नसेल तर व्यापारी वर्ग हा देखील तिस-या लाटेचा सामना कसा करेल?असा सवाल संघटनेच्या पदाधिका-यांनी उपस्थित केला.मूळात करोना हा बाजारातूनच पसरतो आहे का?असा सवाल व्यापा-यांनी केला तर मर्यादित प्रेक्ष् क संख्येत सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्यावी,अशी मागणी सांस्कृतिक कला क्ष्ेत्रातील संचालकांनी यावेळी केली.

हे पण वाचा…..

बंधने शिथिल करा अन्यथा झूगारुन देऊ:राज्य सरकारला व्यवसायी आंदोलकांचा इशारा

शहरातील व्यापारी व कला जगतातील संचालकांचा संयम हा पूर्णपणे ढासळला असून त्यांच्यावर निर्भर घटकांसाठी सरकार एक तर आर्थिक सहाय्य करीत नाही दूसरीकडे आत्मसन्मानाची रोजी-रोटी ही कमावू देत नसल्याची प्रचंड नाराजी आजच्या रॅली दरम्यान आंदोलकांमध्ये आढळली.४ वाजता दूकाने बंद करावी लागत आहे जी अत्यंत गैरसोयीची वेळ असल्याचे संघटनांचे म्हणने आहे.फक्त ३ तासांचा वाढीव वेळ आम्ही मागतो आहे,यामुळे बाजारात थोडी उलाढाल होईल,ग्राहकी होईल तर त्याचा फायदा ग्राहक आणि दूकानदार या सर्वांचे प्रश्‍न मिटण्यात होईल,असे त्यांचे म्हणने होते.

आजची कार व बाईक रॅली ही राज्य सरकारला ‘इशारा’ असल्याचे व्यापारी संघटनांनी सांगितले. रॅलीचा प्रारंभ हिस्लॉप कॉलेज पासून झाला.यानंतर कॉफी हाऊस चौक,शंकर नगर,बर्डी,मेहाडिया चौक,ग्रेट नाग रोड,सी.ए.रोड मार्गक्रमण करीत व्हेरायटी चौकात रॅलीचा समारोप झाला.याप्रसंगी २४ संघटनांनी मिळून स्थापित केलेल्या ‘सरकार जगाओ,वाणिज्य बचाओ’समितीचे संयोजक दीपेन अग्रवाल तसेच संघटनेचे अश्‍विन मेहाडीया यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यापर्ण केले.

यावेळी नागपूर पोलिस तसेच प्रशासनाकडून निषेध रॅलीदरम्यान कोणतेही अडथळे आणण्यात आले नाही यासाठी नागपूर पोलिस तसेच प्रशासनाचे आभार संघटनेने मानले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या