फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजआणि...नवनियुक्त जिल्हाधिकारी यांनी काढला दारावरचा फलक!

आणि…नवनियुक्त जिल्हाधिकारी यांनी काढला दारावरचा फलक!

Advertisements

‘व्हिजिटर्स आर नाट अलाऊड’फलकाची गच्छंती:जनसेवेसाठी मी २४ तास उपलब्ध

पत्रकारांशी साधला जिल्हाधिकारी आर.विमला यांनी अनौपचारिक संवाद

नागपूर,ता. १४ जुलै: नवनियुक्त जिल्हाधिकारी आर.विमला यांनी आज बुधवार दि.१४ जुलै रोजी सायंकाळी ५ वा.पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला.यावेळी बोलताना त्यांनी करोनाची संभाव्य तिसरी लाट,संसर्गापासून लहान मुलांचे संरक्ष् ण,डेंग्यूचा प्रकाेप,गृहविलगीकरण,शासकीय कोविड केंद्रातील सुविधा इ.अनेक विषयांवर मत प्रकट केले.यावेळी बोलताना त्यांनी पदावर रुजू झाल्यानंतर सर्वप्रथम दारावरची ‘व्हिजिटर्स आर नॉट अलाऊड’ची पूर्वीची पाटी काढून टाकली असल्याचे सांगत जनसेवेसाठी मी माझ्या कक्ष्ात व फोनवर २४ तास उपलब्ध असल्याचे सांगून जनतेला सुखद धक्का दिला.

अर्थात जिल्हाधिकारी हे २४ तास अभ्यागतांमध्ये बिझी राहतील तर शासकीय कामकाज व बैठका कधी करणार?असा देखील टिकेचा सूर अनौपचारिक गप्पांनंतर ऐकू आला मात्र पूर्वीच्या जिल्हाधिका-यांपेक्ष्ा आर.विमला यांची कामकाजाची पद्धत ही सर्वस्वी वेगळी राहणार आहे,याची चूणूक ही मिळाली.

याप्रसंगी बोलताना आर.विमला म्हणाल्या,की करोनाची तिसरी लाट याची धास्ती जनसामान्यांमध्ये खोलवर आढळून येते.अनेकांनी करोनाच्या दुस-या लाटेत आपले आप्त-स्वकीय कायमचे गमावले आहे त्यांच्या ही मनात भीती आहे.मात्र नुकतेच कळमेश्‍वरचा दौरा केला तिथे ही नागरिकांनी सामाजिक अंतराचे पालन केल्याचे आढळून आले नाही,असे त्या म्हणाल्या.एक तर हा नियम जाणीवपूर्वक पाळला जात नाही तर दुसरीकडे जागेचा अभाव यामुळे देखील या नियमाची पायमल्ली होते.कराेनाला दूर ठेवण्याचे अगदी साधे नियम आहेत,हात वारंवार धूणे,सेनिटाईझ करने व सामाजिक अंतराचे पालन करने,याबाबत गेल्या दीड वर्षांपासून बरीच जनजागृती झाली आहे मात्र ही जनजागृती प्रत्यक्ष् व्यवहारातही उतरायला हवी.

दुसरी महत्वाची बाब म्हणजे गृहविलगीकरणापेक्ष्ा बाधितांनी शासकीय कोविड केअर केंद्रात विलगीकरण करने कधीही उत्तम असे त्यांनी सांगितले.यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांना बाधा होण्याचा धोका टळतो व बाधितांवर योग्य उपचार देखील होतो.मुंबईसारख्या शहरात गृहविलगीकरण हे मुळीच शक्य नाही.कम्यूनिटी टॉयलेट्सचा वापर केला जातो,वेगळे शौचालय अनेक कुटुंब अफोर्ड करु शकत नाही त्यामुळे देखील बाधितांची संख्या वाढते.

मात्र माझा हाच सल्ला आहे शासकीय कोविड केअर केंद्रात कितीही गैरसोय वाटत असली तरी गृहविलगीकरणापेक्ष्ा बाधितांनी लक्ष् णे दिसताच या केंद्रावर उपचार घ्यावे.

आणखी एक महत्वाची बाब म्हणजे लसीकरणाविषयी अद्यापही पुरेशी जनजागृती आढळून येत नाही.लसीकरणाविषयी अद्याप अनेक गैरसमजुती समाजात रुढ आहेत.ग्रामीण भागात शंकेचे प्रमाण जास्त आहे.लसीकरणामुळे ताप येतो,इतर लक्ष् णे उद् भवतात,मृत्यू ही होतो,दूर्देवाने अश्‍या शंका रुढ झाल्या आहेत मात्र लसीकरणामुळे रोग प्रतिकार शक्ती निर्माण होत असते जी करोना विषाणूच्या संसर्गाला चांगल्या रितीने लढा देते,असे त्यांनी सांगितले.

याशिवाय डेंगीचे प्रमाण वाढलेले आहे.पाऊस हवा तसा आला नसल्यामुळे आणखी समस्या उद् भवल्या.नागरिकांनी कूलर वगैरे कोरडे करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

लहान बालकांच्या लसीकरणाविषयी माहिती देताना नगरपरिषदेच्या माध्यमातून लवकरच पहील्यांदा हे लसीकरण सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले.पावसाळ्यात डायरियाचे प्रमाण देखील लक्ष् णीयरित्या वाढत असतं,आजपासून डायरियावर देखील उपाययोजनेच्या अंमलबजावणीस सुरवात झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी वाढीव दराने स्टॅम्प पेपरची विक्री यावर देखील त्यांना प्रश्‍न विचारण्यात आला.त्यांच्या काळातही यावर पायबंद बसेल असे आश्‍वासन त्यांनी दिले.२०० बालरोगतज्ज्ञ यांची नियुक्ती या विषयावर देखील त्यांना प्रश्‍न विचारण्या आला.सध्या मेडीकल व मेयोमध्ये बालरोग कक्ष्ांची निर्मिती झाली असून ग्रामीण भागात अश्‍या बालरोगतज्ज्ञांची नियुक्ती विषयी त्यांनी अनभिज्ञता व्यक्त केली.

माजी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी नुकतेच ३० जून रोजी सारथी ट्रस्टसोबत शहरातील किन्नर व ट्रांस जेंडर्स यांच्या शासकीय दरबारी नोंदणीचा उपक्रम हाती घेतला होता.या उपक्रमात किन्नर व ट्रांस जेंडर्सला शासकीय ओळखपत्र देण्यात आले मात्र त्यांना अद्याप संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळाला नाही,बीपीएल कार्ड ऐवजी त्यांना केसरी रेशन कार्ड उपलब्ध करुन देण्यात आले, ज्याचा त्यांना कोणताही लाभ होत नाही तसेच या समुदायासाठी कुठेही सार्वजनिक ठिकाणी स्वतंत्र शौचालय नसल्याकडे आर.विमला यांचे लक्ष् वेधले असता,लवकरच माजी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्यासोबत बोलून ही योजना समजून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काही प्रश्‍नांच्या बाबतीत ते प्रश्‍न महानगरपालिकेशी संबंधित असल्याने एकमेकांच्या क्ष्ेत्रात हस्तक्ष्ेप करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या