

मनपाच्या १५१ जागा स्वबळावरच
नागपूर,ता. १२ जून:आमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी जयंत पाटील,विदर्भाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख,पक्षाचे देशातील नेते प्रफूल्ल पाटील यांनी जी माझ्यावर शहराध्यक्ष् पदाची जवाबदारी सोपवली ,पक्षाला नागपूरात मजबूत करण्याची ती मी पूर्ण क्ष् मतेने निभावणार असून येत्या सहा महिन्यात होणा-या नागपूर महानगरपालिकेच्या निवडणूकीत आमचा राष्ट्रवादी पक्ष् हा किती मजबूत आहे हे प्रत्यक्ष् पाहायला मिळेल,आता तर आमच्याकडे देशाचे सुप्रसिद्ध निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर आहेत त्यामुळे आता यानंतर समोरच्या सर्व पक्षांनी सांभाळून राहण्याची गरज असल्याचे विधान राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष् दुनेश्वर पेठे यांनी आज दि. १२ जून २०२१ रोजी प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत केले.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार तसेच राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांची कालच शुक्रवार दि. ११ जून रोजी मुंबईत शरद पवार यांच्या सिल्वहर ओक येथील निवासस्थानी तीन तासांपेक्षा अधिक काळ चर्चा चालली होती.पं.बंगालच्या नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणूकीत केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने पूर्ण ताकद पणाला लावूनही त्यांना यश प्राप्त झाले नाही तर ममता बॅनर्जी यांनी तिस-यांदा एकहाती बहूमत प्राप्त केले.तृणमूलच्या या रणनीतीत प्रशांत किशोर यांचा निवडणूक आराखडा कामी आल्याचा संदर्भ दुनेश्वर पेठे यांच्या या विधानामागे होता.
शहरात नव्या जोमाने सर्व पदाधिका-यांना सोबत घेऊन राष्ट्रवादीचे संघटन मजबूत करणार असल्याचे ते म्हणाले.शहराला भेडसावणारी प्रश्ने मग ते रस्ते असो,पाणयाचा प्रश्न असो,झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटपाचा प्रश्न असो किवा किवा नाग नदी प्रकल्पामुळे विस्थापित होणा-या नागरिकांचा असो सर्व लढाया लढू तसेच युवकांचा रोजगार व आरोग्य संबधी प्रश्ने सोडवली जाईल अशी हमी त्यांनी दिली.शहरात विशिष्ट समाजाचे काम थांबले याकडे देखील लक्ष् वेधले.
मनपाच्या येत्या निवडणूकीत एकदिलाने लढून पक्षाला यश मिळवून देणार असल्याची हमी त्यांनी दिली मात्र पक्ष्ात तर दोन गट कार्यरत अाहेत,माजी शहराध्यक्षांनी पत्र परिषदेत उघडपणे नाव न घेता तुमच्या नावाला विरोध केला होता,मग एक दिलाने कसे लढाल?असा प्रश्न विचारला असता हा अनुभव प्रत्येकच राजकीय पक्षात येतो ‘जेवढे मोठे डोके तेवढी मोठी डोकेदूखी’ माजी शहराध्यक्षांनी जे काही म्हटलं ते वेगळ्या उद्देशाने म्हटलं असेल,शेवटी माझं नाव त्यांनी सूचवलं व मी पदावर रुढ झालो असे ते म्हणाले.
येत्या मनपाच्या निवडणूकीत आघाडी की स्वबळावर पक्ष् लढणार?यावर बोलताना सध्या मनपात एकच नगरसेवक आहे त्यामुळे निवडणूकी आधीच पक्षाची स्थिती मजबूत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.गेल्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाने खूप मोठे प्रभाग केले,त्यामुळे आमच्या पक्षालाही अडचणींचा सामना करावा लागला.७५ हजार लोकसंख्येचा प्रभाग झाला होता.एवढ्या लोकसंख्येत तर गोवा सारख्या राज्यात विधानसभेची निवडणूक ही होत नाही.तिथे ७-७ हजार लोकसंख्येत आमदार निवडून जातात.४ वॉर्डाचा एक प्रभाग झाल्याने याचा फायदा भाजपलाच मिळाला.राष्ट्रवादी पक्ष् कमजोर नाही मात्र ४ वॉर्डाचा एक प्रभाग पद्धतीमुळे आमचे नुकसान झाले.यावेळी २ वॉर्डचा एक प्रभाग असणार आहे त्यामुळे राष्ट्रवादीला यश मिळू शकेल,आघाडीचा विचार वेळेवर केला जाईल,सध्या आमची तयारी ही स्वबळासाठीच असणार आहे.
भाजपने मनपा निवडणूकीची तयारी दोन वर्षांपूर्वीपासूनच केली असून काँग्रेसने देखील यात आघाडी घेतली आहे आता राष्ट्रवादीला फक्त ६ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे एवढा अवधी पुरेसा आहे का?या प्रश्नावर बोलताना आम्ही स्पीड वाढवून काम करु असे ते म्हणाले.पक्षात महिलांना ५० टक्के आरक्ष् ण हे धोरण निवडणूकांना बघून स्वीकारले का?यावर बालेताना पक्षाचे हे धोरण आधीपासूनच असल्याचे ते म्हणाले.
माजी शहराध्यक्षांनी विधानसभेच्या तीन जागांवर दावा सांगितला आहे याचे काय?यावर बोलताना ते विधानसभेच्या निवडणूकीच्या वेळेचे धोरण राहील सध्या आमचे लक्ष् हे मनपा निवडणूका असल्याचे त्यांनी सांगितले.
अजनीवनचा प्रकल्प याला शहरातील अनेक पर्यावरणवाद्यांनी विरोध केला आहे,तुमच्या पक्षाची भूमिका काय?यावर बोलताना आमचा पक्ष् विकासाच्या विरोधात नाही पण विकास करताना पर्यावरणाचे नुकसान होऊ नये,पर्यावरणाचे नुकसान करुन विकास साधण्यात काय फायदा?१० हजार कोटी खर्च करुन महामेट्रो शहरात आणली,याचा कोणाला फायदा झाला?आजपर्यंत हा भूर्दंड नागपूरकर जनता भरुन देत आहे.शहराचं पर्यावरण व्यवस्थित राखणार असाल तर विकासाला विरोध नसल्याचे ते म्हणाले.
राष्ट्रवादी पक्षातर्फे शहरात जी काही आंदोलन होतात त्यात फक्त मोजकी लोक राहतात,असे का?या प्रश्नावर बोलताना झालेल्या चूका विसरुन कम्यूनिकेशन गॅप भरण्यासाठीच कदाचित मला हे पद सोपवलं असल्याचे ते म्हणाले.पक्ष् श्रेष्ठींनी शहरात पक्ष् बळकट करणे व मनपाच्या १५१ जागांची तयारी करणे हाच संदेश देऊन पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी शहराध्यक्ष् अनिल अहिरकर पत्र परिषदेला का उपस्थित नाही?या प्रश्नावर बोलताना ते नाही आले तरी यात गटबाजी आहे असे तुम्ही समजू नका अश्या शब्दात त्यांनी हा प्रश्न टोलवून लावला.
नवीन कार्यकारीणी कधीपर्यंत घोषित करणार?यावर बोलताना शहरातील जूने-नवीन सर्वांचा विचार करुन नवीन कार्यकारिणी लवकरच घोषित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्र परिषदेतला पक्षाच्या सरचिटणीस आभा पांडे,प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे,माजी आ.प्रकाश गजभिये,आ.सलील देशमुख,प्रशांत पवार,शब्बीर विद्रोही,प्रदेश ओबीसी नेते किशाेर बाळबुधे,ग्रामीण महिला अध्यक्ष् लक्ष्मी सावरकर,वर्षा शामकुळे आदी उपस्थित होते.




आमचे चॅनल subscribe करा
